Vodafone 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 09 Dec 2019 12:42:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vodafone ने दिला मोठ सरप्राइज, FUP लिमिट काढून देशभरात फ्री केली कॉलिंग, त्याचबरोबर सादर केले 3 स्वस्त आणि फायदेशीर प्लान https://www.91mobiles.com/marathi/vodafone-fup-limit-removed-india-unlimited-free-voice-calling-three-new-plan-launched-rs-219-399-499-airtel-jio/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-fup-limit-removed-india-unlimited-free-voice-calling-three-new-plan-launched-rs-219-399-499-airtel-jio/#respond Mon, 09 Dec 2019 12:42:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6011 आता कंपनी कोणतेही एफयूपी चार्ज घेणार नाही तसेच संपूर्ण देशात कोणत्याही नंबर वर अनलिमिटेड फ्री कॉलिंग करता येईल.

The post Vodafone ने दिला मोठ सरप्राइज, FUP लिमिट काढून देशभरात फ्री केली कॉलिंग, त्याचबरोबर सादर केले 3 स्वस्त आणि फायदेशीर प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vodafone Idea भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे. दोन मोठ्या कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर आज भारतीय दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठा युजरबेस कंपनीकडे आहे. Vodafone Idea ने गेल्या 1 डिसेंबरला इतर सर्व कंपन्यांप्रमाणे आपल्या टॅरिफ रेट मध्ये वाढ करत नवीन प्लान्स सादर केले होता. सर्व कंपन्यांद्वारे प्लान्स महाग केल्यामुळे सामान्य मोबाईल यूजर रागात आहेत. पण आता Vodafone ने नवीन डाव टाकत आपल्या ग्राहकांना शानदार सरप्राइज दिले आहे. Vodafone ने घोषणा केली आहे कि आता त्यांच्या नंबर वरून कोणत्याही FUP लिमिटविना अनलिमिटेड कॉल करता येतील. तसेच Vodafone ने अजून तीन नवीन आणि स्वस्त प्लान पण बाजारात आणले आहेत.

Vodafone ने फक्त आपल्या यूजर्सना शानदार भेट दिली नाही तर Airtel आणि Reliance Jio सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना आव्हान दिले आहे. सर्वात आधी FUP लिमिट बद्दल बोलायचे तर Vodafone ने आतापर्यंत आपल्या यूजर्सना ऑन-नेटवर्क पूर्णपणे फ्री कॉलिंग दिली होती पण लेकिन ऑफ-नेटवर्क कॉलिंग म्हणजे Vodafone व्यतिरिक्त इतर कंपनीच्या नंबर वर कॉल करण्यासाठी ग्राहकांना 1,000 किंवा 3,000 कॉलिंग मिनिट्स मिळत होते. पण आता Vodafone ने स्पष्ट केले आहे कि आता कंपनी कोणतेही एफयूपी चार्ज घेणार नाही तसेच संपूर्ण देशात कोणत्याही नंबर वर अनलिमिटेड फ्री कॉलिंग करता येईल.

विशेष म्हणजे आतापर्यंत Airtel एकमेव अशी टेलीकॉम कंपनी होती जी आपल्या यूजर्सना सर्व कंपन्यांच्या नंबर वर फ्री कॉलिंगची सुविधा देत होती. Vodafone आणि Reliance Jio ग्राहकांना FUP limit अंतर्गत कॉलिंग मिनिट्स देत होते. पण आता Vodafone ने घोषणा केली आहे कि कंपनीच्या 2 दिवस वॅलिडिटी असलेल्या 19 रुपयांच्या प्लान पासून 365 दिवस वॅलिडिटी असलेल्या 2399 रुपयांच्या प्लान पर्यंत सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड नॅशनल कॉल मिळतील. या घोषणेसोबतच Vodafone ने अजून तीन नवीन प्लान बाजारात आणले आहेत जो कमी किंमतीत चांगले आहेत.

हे आहेत तीन नवीन प्लान

Vodafone 219 रुपये

वोडाफोनचा हा नवीन प्लान एक महिना म्हणजे 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. प्लान मध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचे तर Vodafone यूजर्सना रोज 1 जीबी 4G डेटा दिला जाईल. म्हणजे संपूर्ण प्लान अंतर्गत ग्राहक एकूण 28 जीबी डेटा वापरू शकतील. तसेच Vodafone च्या 219 रुपयांच्या प्लान अंतर्गत यूजर्सना रोज 100 एसएमएस पण मिळतील. तसेच कॉलिंगबद्दल बोलायचे तर कंपनी आता डेसातील कोणत्याही नंबर वर फ्री आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे.

https://img.hi.91mobiles.com/uploads/2017/01/voda-Photo-Credit.jpg

Vodafone 399 रुपये

वोडाफोनचा 399 रुपयांचा प्लान 56 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. विशेष म्हणजे टॅरिफ प्लान्स रिवाईज केल्यानंतर Vodafone ने 28 दिवसांच्या वॅलिडिटी असलेल्या प्लान सह थेट 84 दिवस आणि 365 दिवसांची वैधता असलेले प्लान पण सादर केले होते. 399 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना रोज 1.5 जीबी 4G डेटा दिला जाईल आणि तसेच 100एसएमएस रोज मिळतील. या प्लान मध्ये पण कॉलिंग पूर्णपणे फ्री आहे.

Vodafone 499 रुपये

499 रुपयांचा हा प्लान पण वोडाफोनने 56 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे. या प्लान अंतर्गत यूजर्सना रोज 2 जीबी 4G इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजे संपूर्ण वॅलिडिटी दरम्यान ग्राहकांना एकूण 112 जीबी डेटाचा फायदा घेता येईल. या प्लान मध्ये पण रोज 100एसएमएस मिळतील तसेच Vodafone यूजर दिसल कोणत्याही सर्कलच्या कोणत्याही नंबर वर पूर्णपणे फ्री अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील.

The post Vodafone ने दिला मोठ सरप्राइज, FUP लिमिट काढून देशभरात फ्री केली कॉलिंग, त्याचबरोबर सादर केले 3 स्वस्त आणि फायदेशीर प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-fup-limit-removed-india-unlimited-free-voice-calling-three-new-plan-launched-rs-219-399-499-airtel-jio/feed/ 0
वोडाफोन देत आहे दुप्पट फायदा, 84 दिवसांसाठी मिळेल 235.2जीबी 4जी डेटा https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs-458-prepaid-plan-data-benefits-double-235-gb-4g-data-for-84-days-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs-458-prepaid-plan-data-benefits-double-235-gb-4g-data-for-84-days-in-marathi/#respond Fri, 20 Jul 2018 11:58:12 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1354 महत्वाची बाब म्हणजे वोडाफोन कडून हा अपडेट सध्या फक्त काही निवडक ग्राहकांना देण्यात आला आहे. हा प्लान त्या सर्कल्स मध्ये अपडेट करण्यात आला आहे जिथे वोडाफोन आपली 4जी सर्विस देत आहे.

The post वोडाफोन देत आहे दुप्पट फायदा, 84 दिवसांसाठी मिळेल 235.2जीबी 4जी डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वोडाफोन ने याच आठवड्यात जियो व एयरटेल ला टक्कर देत आपला 199 रुपयांचा प्लान अपडेट केला होता. या प्लान मध्ये मिळणारा डेटा डबल करत वोडाफोन 1.4जीबी डेटा ऐवजी आता 2.8जीबी 4जी डेटा देत आहे. टेलीकॉम बाजारावर आपली पकड मजबूत व्हावी यासाठी वोडाफोन ने आता अजून एक प्लान अपडेट केला आहे. वोडाफोन ने 458 रुपयांच्या प्लान मध्ये बदल केला आहे आणि त्यामुळे कंपनी पुन्हा एकदा जियो च्या 449 रुपये आणि एयरटेल च्या 448 रुपयांच्या प्लान ला टक्कर देत आहे.

वोडाफोन चा 458 रुपयांचा प्लान प्रीपेड पॅक आहे. हा प्लान 84​ दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. वोडाफोन या प्लान मध्ये आता पर्यंत रोज 1.4जीबी 4जी डेटा देत होती. पण नवीन बदला नंतर एका दिवसात 2.8जीबी 4जी डेटा दिला जात आहे. वोडाफोन ने आपल्या या प्लान मध्ये मिळणारा इंटरनेट डेटा दुप्पट केला आहे पण पॅक ची किंमत तीच ठेवली आहे.

वोडाफोन 458 रुपयांच्या प्लान मध्ये आता पर्यंत एकूण 117.6जीबी 4जी डेटा मिळत होता पण आता झालेल्या नवीन बदलामुळे त्याच किंमतीत 235.2जीबी 4जी इंटरनेट डेटा मिळेल. वोडाफोन ने आधीच्या किंमतीत आपले बेनिफिट दुप्पट केले आहेत. प्लान मधील इतर फायदे पाहता यात अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल मिळत आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतील. त्याचबरोबर या प्लान मध्ये रोज 100 एसएमएस मिळतील.

महत्वाची बाब म्हणजे वोडाफोन कडून हा अपडेट सध्या फक्त काही निवडक ग्राहकांना देण्यात आला आहे. हा प्लान त्या सर्कल्स मध्ये अपडेट करण्यात आला आहे जिथे वोडाफोन आपली 4जी सर्विस देत आहे. त्यामुळे वोडाफोन कडून मिळणारे डबल डाटा बेनिफिट पण सर्व यूजर्स साठी उपलब्ध नाहीत. वोडाफोन प्रीपेड ग्राहक माय वोडाफोन अॅप वर जाऊन याची माहिती मिळवू शकतात की त्यांना दुप्पट डेटा मिळेल की नाही.

जियो चा 448 रुपयांचा प्लान पाहता या प्लान मध्ये यूजर्सना 84 दिवसांसाठी 2जीबी डाटा प्रतिदिन मिळतो. तर एयरटेल च्या 448 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 82 दिवसांसाठी रोज 1.4 जीबी 4जी डेटा मिळत आहे.

The post वोडाफोन देत आहे दुप्पट फायदा, 84 दिवसांसाठी मिळेल 235.2जीबी 4जी डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs-458-prepaid-plan-data-benefits-double-235-gb-4g-data-for-84-days-in-marathi/feed/ 0
वोडाफोन देत आहे त्याच किंमतीत दुप्पट 4जी डाटा, अपडेट केले प्लान्स, मिळेल 4,498 रुपयांपर्यंतचा फायदा https://www.91mobiles.com/marathi/vodafone-red-plans-revised-red-399-red-499-double-data-amazon-prime-membership-free-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-red-plans-revised-red-399-red-499-double-data-amazon-prime-membership-free-offer-in-marathi/#respond Fri, 22 Jun 2018 08:20:48 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1014 भरपूर इंटरनेट डाटा सह वोडाफोन च्या या प्लान्स मध्ये संपूर्ण देशात अनलिमिटेड वॉयस कॉल पूर्णपणे फ्री मिळत आहेत.

The post वोडाफोन देत आहे त्याच किंमतीत दुप्पट 4जी डाटा, अपडेट केले प्लान्स, मिळेल 4,498 रुपयांपर्यंतचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम बाजारातून सतत बातम्या येत आहेत की कंपन्या आपले प्लान्स अपडेट करत आहे. रिलायंस जियो, एयरटेल भारती आणि भारत संचार निगम लिमिटेड ने आपल्या जुन्या प्लान्स मध्ये बदल करून त्यांना अपडेट केले आहे ज्यामुळे त्याच किंमतीत जास्त फायदा मिळत आहे. या रेस मध्ये उशिरा का होईना पण पूर्ण तयारी सह वोडाफोन ने पण एंट्री घेतली आहे. वोडाफोन जुन्या प्लान्स मध्ये दुप्पट इंटरनेट डाटा सह अनलिमिटेड कॉलिंग आणि अमेजॉन प्राइम सारखे फायदे देत आहे.

वोडाफोन ने आपल्या पोस्टपेड रेड प्लान्स मध्ये बदल केले आहेत. कंपनी च्या 399 रुपयांच्या रेड प्लान मध्ये आधी यूजर्सना एक महिन्यासाठी एकूण 20जीबी 4जी डाटा दिला जात होता, त्याजागी आता त्याच किंमतीत ग्राहकांना 40जीबी 4जी डाटा मिळेल. हा इंटरनेट डाटा रोलओवर होत राहील. म्हणजे जर यूजर एका महिन्यात 40जीबी डाटा यूज करू शकला नाही तर उरलेला डाटा आपोआप पुढील महिन्याच्या 40जीबी डाटा मध्ये जोडला जाईल.

त्याचप्रमाणे वोडाफोन च्या 499 रुपयांच्या प्लान मध्ये आधी एक महिन्यासाठी 40जीबी 4जी डाटा मिळत होता पण अपडेट नंतर कंपनी आपल्या या प्लान मध्ये आता 75जीबी इंटरनेट डाटा देत आहे. हा डाटा पण रोलओवर होईल तसेच नवीन बिलिंग सायकल मध्ये जोडला जाईल. पण या दोन्ही प्लान्स मध्ये रोलओवर होणार्‍या डाटा ची अधिकतम लिमिट 200जीबी इतकीच आहे. म्हणजे उरलेला डाटा 200जीबी पर्यंतच जोडला जाईल.

भरपूर इंटरनेट डाटा सह वोडाफोन च्या या प्लान्स मध्ये संपूर्ण देशात अनलिमिटेड वॉयस कॉल पूर्णपणे फ्री मिळत आहेत. वोडाफोन 399 रुपयांच्या रेड प्लान मध्ये 1,498 रुपयांचे तसेच 499 रुपयांच्या प्लान मध्ये 4,498 रुपयांपर्यंतचे बेनिफिट देत आहे. यात 999 रूपयांच्या 1 वर्षाच्या फ्री अमेजन प्राइम मेंबरशिप आणि 499 रुपयांच्या वोडाफोन प्ले च्या फ्री सर्विसचा समावेश आहे. यात शॉपिग कूपन्स सोबत 499 रेड प्लान मध्ये 3,000 रुपयांचे डिवाइस प्रोटेक्शन पण मिळत आहे.

The post वोडाफोन देत आहे त्याच किंमतीत दुप्पट 4जी डाटा, अपडेट केले प्लान्स, मिळेल 4,498 रुपयांपर्यंतचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-red-plans-revised-red-399-red-499-double-data-amazon-prime-membership-free-offer-in-marathi/feed/ 0
वोडाफोन 569 रुपयांमध्ये देत आहे 84 दिवसांसाठी 252जीबी डाटा सह अनलिमिटेड वॉयस कॉल फ्री, जियो-एयरटेल ला मिळणार टक्कर https://www.91mobiles.com/marathi/vodafone-india-offer-3gb-daily-data-rs569-and-2gb-daily-data-rs511-84days-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-india-offer-3gb-daily-data-rs569-and-2gb-daily-data-rs511-84days-in-marathi/#respond Tue, 19 Jun 2018 07:32:48 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=954 वोडाफोन ने रिलायंस जियो आणि एयरटेल ला टक्कर देत 569 रुपये आणि 511 रुपयांचे दोन प्लान सादर केले आहेत.

The post वोडाफोन 569 रुपयांमध्ये देत आहे 84 दिवसांसाठी 252जीबी डाटा सह अनलिमिटेड वॉयस कॉल फ्री, जियो-एयरटेल ला मिळणार टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने कालच 168 दिवस वॅलिडिटी वाला नवीन प्लान सादर केला आहे जो 10 जीबी डाटा सह अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा देतो. टेलीकॉम जगातील स्पर्धेत पुढे येत आता वोडाफोन ने पण दोन शानदार प्लान सादर करत आपले पारडे जड केले आहे. वोडाफोन ने रिलायंस जियो आणि एयरटेल ला टक्कर देत 569 रुपये आणि 511 रुपयांचे दोन प्लान सादर केले आहेत जे जास्त वैधते साठी चांगले बेनिफिट देत आहेत.

वोडाफोन 569 रुपयांचा प्लान
वोडाफोन ने सादर केलेला हा प्लान 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान अंतर्गत वोडाफोन आपल्या यूजर्सना रोज 3जीबी 4जी डाटा देत आहे. 84 दिवस 3जीबी डाटा या हिशोबाने प्लान च्या पूर्ण अवधी मध्ये यूजर्सना एकूण 252 जीबी डाटा मिळेल. रोज 3जीबी 4जी डाटा सह वोडाफोन या प्लान मध्ये यूजर्स लोकल व एसटीडी नंबर वर अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा पण देत आहे. सोबतच 84 दिवसांसाठी रोज 100एसएमएस पण मिळतील.

वोडाफोन 511 रुपयांचा प्लान
वोडाफोन ने आपला हा प्लान पण 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे. वोडाफोन यूजर्सना या प्लान अंतर्गत रोज 2जीबी 4जी डाटा मिळेल. रोज 2जीबी डाटा या हिशोबाने ग्राहकांना संपूर्ण वॅलिडिटी साठी एकूण 168जीबी 4जी डाटा मिळेल. रोज 2जीबी 4जी डाटा सह वोडाफोन या प्लान मध्ये यूजर्सना रोज 100एसएमएस आणि लोकल व एसटीडी नंबर वर अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा पण देत आहे.

पण वोडाफोन चे हे दोन्ही प्लान अजूनतरी संपूर्ण देशात लागू करण्यात आले नाहीत. कंपनी ने हे दोन्ही प्लान्स निवडक सर्कल्स मध्ये जाहीर केले आहेत. तुमच्या सर्कल मध्ये या प्लान्स ची उपलब्धता वोडाफोन अॅप मधून बघता येईल.

The post वोडाफोन 569 रुपयांमध्ये देत आहे 84 दिवसांसाठी 252जीबी डाटा सह अनलिमिटेड वॉयस कॉल फ्री, जियो-एयरटेल ला मिळणार टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-india-offer-3gb-daily-data-rs569-and-2gb-daily-data-rs511-84days-in-marathi/feed/ 0