Vodafone ने दिला मोठ सरप्राइज, FUP लिमिट काढून देशभरात फ्री केली कॉलिंग, त्याचबरोबर सादर केले 3 स्वस्त आणि फायदेशीर प्लान

Vodafone Idea भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे. दोन मोठ्या कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर आज भारतीय दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठा युजरबेस कंपनीकडे आहे. Vodafone Idea ने गेल्या 1 डिसेंबरला इतर सर्व कंपन्यांप्रमाणे आपल्या टॅरिफ रेट मध्ये वाढ करत नवीन प्लान्स सादर केले होता. सर्व कंपन्यांद्वारे प्लान्स महाग केल्यामुळे सामान्य मोबाईल यूजर रागात आहेत. पण आता Vodafone ने नवीन डाव टाकत आपल्या ग्राहकांना शानदार सरप्राइज दिले आहे. Vodafone ने घोषणा केली आहे कि आता त्यांच्या नंबर वरून कोणत्याही FUP लिमिटविना अनलिमिटेड कॉल करता येतील. तसेच Vodafone ने अजून तीन नवीन आणि स्वस्त प्लान पण बाजारात आणले आहेत.

Vodafone ने फक्त आपल्या यूजर्सना शानदार भेट दिली नाही तर Airtel आणि Reliance Jio सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना आव्हान दिले आहे. सर्वात आधी FUP लिमिट बद्दल बोलायचे तर Vodafone ने आतापर्यंत आपल्या यूजर्सना ऑन-नेटवर्क पूर्णपणे फ्री कॉलिंग दिली होती पण लेकिन ऑफ-नेटवर्क कॉलिंग म्हणजे Vodafone व्यतिरिक्त इतर कंपनीच्या नंबर वर कॉल करण्यासाठी ग्राहकांना 1,000 किंवा 3,000 कॉलिंग मिनिट्स मिळत होते. पण आता Vodafone ने स्पष्ट केले आहे कि आता कंपनी कोणतेही एफयूपी चार्ज घेणार नाही तसेच संपूर्ण देशात कोणत्याही नंबर वर अनलिमिटेड फ्री कॉलिंग करता येईल.

विशेष म्हणजे आतापर्यंत Airtel एकमेव अशी टेलीकॉम कंपनी होती जी आपल्या यूजर्सना सर्व कंपन्यांच्या नंबर वर फ्री कॉलिंगची सुविधा देत होती. Vodafone आणि Reliance Jio ग्राहकांना FUP limit अंतर्गत कॉलिंग मिनिट्स देत होते. पण आता Vodafone ने घोषणा केली आहे कि कंपनीच्या 2 दिवस वॅलिडिटी असलेल्या 19 रुपयांच्या प्लान पासून 365 दिवस वॅलिडिटी असलेल्या 2399 रुपयांच्या प्लान पर्यंत सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड नॅशनल कॉल मिळतील. या घोषणेसोबतच Vodafone ने अजून तीन नवीन प्लान बाजारात आणले आहेत जो कमी किंमतीत चांगले आहेत.

हे आहेत तीन नवीन प्लान

Vodafone 219 रुपये

वोडाफोनचा हा नवीन प्लान एक महिना म्हणजे 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. प्लान मध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचे तर Vodafone यूजर्सना रोज 1 जीबी 4G डेटा दिला जाईल. म्हणजे संपूर्ण प्लान अंतर्गत ग्राहक एकूण 28 जीबी डेटा वापरू शकतील. तसेच Vodafone च्या 219 रुपयांच्या प्लान अंतर्गत यूजर्सना रोज 100 एसएमएस पण मिळतील. तसेच कॉलिंगबद्दल बोलायचे तर कंपनी आता डेसातील कोणत्याही नंबर वर फ्री आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे.

https://img.hi.91mobiles.com/uploads/2017/01/voda-Photo-Credit.jpg

Vodafone 399 रुपये

वोडाफोनचा 399 रुपयांचा प्लान 56 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. विशेष म्हणजे टॅरिफ प्लान्स रिवाईज केल्यानंतर Vodafone ने 28 दिवसांच्या वॅलिडिटी असलेल्या प्लान सह थेट 84 दिवस आणि 365 दिवसांची वैधता असलेले प्लान पण सादर केले होते. 399 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना रोज 1.5 जीबी 4G डेटा दिला जाईल आणि तसेच 100एसएमएस रोज मिळतील. या प्लान मध्ये पण कॉलिंग पूर्णपणे फ्री आहे.

Vodafone 499 रुपये

499 रुपयांचा हा प्लान पण वोडाफोनने 56 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे. या प्लान अंतर्गत यूजर्सना रोज 2 जीबी 4G इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजे संपूर्ण वॅलिडिटी दरम्यान ग्राहकांना एकूण 112 जीबी डेटाचा फायदा घेता येईल. या प्लान मध्ये पण रोज 100एसएमएस मिळतील तसेच Vodafone यूजर दिसल कोणत्याही सर्कलच्या कोणत्याही नंबर वर पूर्णपणे फ्री अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here