WhatsApp Features - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 05 Jun 2023 13:01:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक कसं करायचं? अशी आहे प्रोसेस https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-chat-lock-how-to-use-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-chat-lock-how-to-use-in-marathi/#respond Mon, 05 Jun 2023 13:01:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21397 व्हॉट्सअ‍ॅप वेळावेळी आपल्या युजर्ससाठी अ‍ॅडव्हान्स फीचर घेऊन येतं. नवीन अपडेट फक्त अ‍ॅपचा अनुभव सुधारत नाहीत तर अनेक सुविधा देखील देतात. ह्यात Meta च्या मालकीच्या WhatsApp नं नवीन Chat Lock फीचर सादर केलं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी होणारी चॅटिंग लपवता येऊ शकते आणि ती तुमच्या परवानगी शिवाय कोणीही वाचू शकत नाही. ह्या चॅट लॉक फीचरचा वापर […]

The post फक्त एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक कसं करायचं? अशी आहे प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
व्हॉट्सअ‍ॅप वेळावेळी आपल्या युजर्ससाठी अ‍ॅडव्हान्स फीचर घेऊन येतं. नवीन अपडेट फक्त अ‍ॅपचा अनुभव सुधारत नाहीत तर अनेक सुविधा देखील देतात. ह्यात Meta च्या मालकीच्या WhatsApp नं नवीन Chat Lock फीचर सादर केलं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी होणारी चॅटिंग लपवता येऊ शकते आणि ती तुमच्या परवानगी शिवाय कोणीही वाचू शकत नाही. ह्या चॅट लॉक फीचरचा वापर कसा केला जाऊ शकतो आणि ह्याचे फायदे कोणते, ही माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फिचर वापरण्याची पद्धत

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅट लॉक कसं करायचं

स्टेप 1 : सर्वप्रथम तो कॉन्टेक्ट ओपन करा ज्याची चॅट तुम्हाला लॉक करायची आहे.

स्टेप 2 : इथे कॉन्टेक्ट इंफोमध्ये तुम्हाला Chat Lock चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : चॅट लॉकमध्ये ‘Lock this Chat with Fingerprint’ ऑप्शनवर टॅप करून ऑन करा.

स्टेप 4 : आता तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅन करावा लागेल, ह्यासाठी फिंगरप्रिंट सेन्सरवर टॅप करा.

स्टेप 5 : फिंगरप्रिंट सेन्सर सबमिट होताच त्या कॉन्टेक्टची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक होईल आणि तुमच्याव्यतिरिक्त कोणीही ओपन करू शकणार नाही.

लॉक चॅट कसं वाचायचं

स्टेप 1 : व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फीचरच्या माध्यमातून प्रायव्हेट केलेले मेसेज बघण्यासाठी Chats ची लिस्ट खाली स्क्रॉल करा.

स्टेप 2 : चॅट्स लिस्ट स्क्रॉल डाउन करताच Locked Chats चं फोल्डर सर्वात वर दिसेल, त्यावर टॅप करा.

स्टेप 3 : लॉक्ड चॅट फोल्डर उघडण्यासाठी तुमचा फिंगरप्रिंट स्कॅन नोंदवा.

स्टेप 4 : फिंगरप्रिंट स्कॅन होताच लॉक केलेल्या चॅट्सचा संपूर्ण फोल्डर ओपन होईल आणि लॉक केलेलं सर्व कॉन्टेक्ट समोर येतील.

स्टेप 5 : ज्या कॉन्टेक्टशी चॅटिंग करायची आहे त्यावर टॅप करा आणि नेहमीप्रमाणे मेसेज पाठवा.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फीचरचे फायदे

  • हे पासवर्ड प्रोटेक्टेड फीचर आहे ज्याचा वापर पूर्णपणे सुरक्षित आहे.

    एकाच वेळी अनेक कॉन्टेक्ट्सची चॅट सुरक्षित लॉक करता येतात.

  • चॅट लॉक फीचर असलेले सर्व कॉन्टेक्ट एकाच फोल्डरमध्ये सेव्ह राहतात.
  • तुमच्या पासवर्ड किंवा फिंगरप्रिंटविना कोणीही ते ओपन करू शकत नाही.
  • लॉक केलेल्या कॉन्टेक्ट्सचा नोटिफिकेशनमध्ये मेसेज प्रीव्यू दिसत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फीचरची घोषणा कंपनीनं केली आहे जे पुढील काही दिवसांत मोबाइल युजर्सना मिळण्यास सुरुवात होईल. हे फीचर अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयओएस असलेल्या अ‍ॅप्पल आयफोन दोन्हीवर चालेल. ह्या फीचरमध्ये जर एखाद्या लॉक्ड कॉन्टेक्टनं तुम्हाला कॉल केला तर नोटिफिकेशन्स नेहमीप्रमाणे येईल. हे फीचर सध्या फक्त मोबाइलवर वापरता येईल डेस्कटॉपवर ह्याचा फायदा मिळणार नाही.

The post फक्त एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक कसं करायचं? अशी आहे प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-chat-lock-how-to-use-in-marathi/feed/ 0
आता एकच WhatsApp नंबर वापरता येईल वेगवेगळ्या मोबाइल फोन्सवर, आलं दमदार फीचर https://www.91mobiles.com/marathi/new-whatsapp-feature-one-account-now-across-multiple-phones/ https://www.91mobiles.com/marathi/new-whatsapp-feature-one-account-now-across-multiple-phones/#respond Wed, 26 Apr 2023 09:33:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20489 असं म्हटलं जातं की भारतात ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे त्याच्याकडे व्हॉट्सअ‍ॅप नक्की मिळेल. आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी Meta देखील वेळोवेळी नवीन अपडेट व फीचर्स सादर करत असते जे अ‍ॅडव्हान्स तसेच उपयुक्त असतात. असंच एक नवीन WhatsApp Feature कंपनीनं सादर केलं आहे ज्यामुळे एकह व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट अनेक फोन्समध्ये एकाच वेळी वापरता येईल. व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असणाऱ्या टेक कंपनी मेटाचा […]

The post आता एकच WhatsApp नंबर वापरता येईल वेगवेगळ्या मोबाइल फोन्सवर, आलं दमदार फीचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • WhatsApp multi-device फीचर ऑफिशियली सादर झालं आहे.
  • याची अनाउंसमेंट Meta CEO Mark Zuckerberg नं Facebook वर केली आहे.
  • आता एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट अनेक फोन्सवर एकत्र वापरता येईल.

असं म्हटलं जातं की भारतात ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे त्याच्याकडे व्हॉट्सअ‍ॅप नक्की मिळेल. आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी Meta देखील वेळोवेळी नवीन अपडेट व फीचर्स सादर करत असते जे अ‍ॅडव्हान्स तसेच उपयुक्त असतात. असंच एक नवीन WhatsApp Feature कंपनीनं सादर केलं आहे ज्यामुळे एकह व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट अनेक फोन्समध्ये एकाच वेळी वापरता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असणाऱ्या टेक कंपनी मेटाचा सीईओ Mark Zuckerberg नं Facebook वर पोस्ट करत नवीन WhatsApp multi-device फिचर अधिकृतपणे सादर केलं आहे. हे फीचर अ‍ॅपच्या नवीन अपडेट मधून युजर्सना पाठवलं जाईल. कंपनीनुसार, आगामी काही दिवसांत हे नवीन फीचर व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मिळण्यास सुरुवात होईल. हे देखील वाचा: 7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर

व्हॉट्सअ‍ॅप मल्टी-डिवायस फीचर म्हणजे काय आणि कसं वापरायचं?

  • या नवीन फीचरची खासियत म्हणजे याच्या माध्यमातून एकच WhatsApp account अनेक वेगवेगळ्या मोबाइल फोन्समध्ये वापरता येईल.
  • हे फीचर फक्त स्मार्टफोनच नव्हे तर व्हॉट्सअ‍ॅप वेब ब्राउजर, टॅबलेट आणि कम्प्यूटर्सवर देखील वापरता येईल.
  • सर्व डिवायसवरील व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटमधील सर्व मेसेज, मीडिया व कॉल्स एंड-टू-एंट एन्क्रिप्टेड असतील.
  • दोन फोन बाळगणाऱ्या लोकांसाठी हे फीचर सर्वाधिक फायदेशीर ठरेल. त्यामुळे एका डिवायसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी दुसऱ्यातून लॉग आऊट करावं लागणार नाही.
  • WhatsApp multi-device फीचरमुळे एकच मोबाइल नंबरच्या माध्यमातून अनेक फोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येईल. हे फिचर बिजनेस ग्रुप्समध्ये देखील वापरता येईल.
  • हे देखील वाचा: Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची दणक्यात एंट्री; 12GB RAM सह मिळतोय शानदार कॅमेरा

  • लिंक केलेल्या सर्व फोन्सवर एक सारखी चॅटिंग सुरु राहील, कधीही कोणत्याही डिवायसमध्ये आपली चॅट तिथूनच सुरु करता येईल जिथे दुसऱ्या डिवायसमध्ये सोडली होती.
  • जर प्रायमरी डिवायस बराच काळ इनअ‍ॅक्टिव्ह राहिलं तर त्या फोनसह इतर लिंक्ड डिवाइसेजवर देखील अकाऊंट लॉग आउट केलं जाईल.
  • नवीन फीचरवर अपडेट केल्यामुळे एक व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट एकाच वेळी जास्तीत जास्त चार डिवायसवर अ‍ॅक्टिव्ह ठेवता येईल.
  • The post आता एकच WhatsApp नंबर वापरता येईल वेगवेगळ्या मोबाइल फोन्सवर, आलं दमदार फीचर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/new-whatsapp-feature-one-account-now-across-multiple-phones/feed/ 0
    WhatsApp वापरायचं असेल तर नवीन फोन घ्या! Apple, Samsung, LG आणि SONY च्या 49 मोबाइल्सवर नाही चालणार लोकप्रिय मेसेंजर https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-support-from-49-mobile-phones/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-support-from-49-mobile-phones/#respond Wed, 01 Mar 2023 03:29:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18247 WhatsApp भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. याचा वापर फक्त चॅटिंगसाठी नाही तर ऑडियो कॉल, व्हिडीओ कॉल आणि मीडिया व फाइल ट्रांसफरसाठी देखील होतो. Meta च्या मालकीचं हे अ‍ॅप वेळेनुसार बदलत देखील आहे. एकीकडे अ‍ॅपमध्ये नवीन अपडेट्स येत आहेत, तर दुसरीकडे जुन्या मोबाइल फोन्स व ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट बंद केला जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपनं घोषणा […]

    The post WhatsApp वापरायचं असेल तर नवीन फोन घ्या! Apple, Samsung, LG आणि SONY च्या 49 मोबाइल्सवर नाही चालणार लोकप्रिय मेसेंजर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • WhatsApp ने 49 स्मार्टफोन्सवरील सपोर्ट बंद केला आहे.
    • हे सर्व जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेले मोबाइल फोन्स आहेत.
    • यात Apple, Samsung, LG आणि SONY सारख्या ब्रँड्सचा समावेश देखील आहे.

    WhatsApp भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. याचा वापर फक्त चॅटिंगसाठी नाही तर ऑडियो कॉल, व्हिडीओ कॉल आणि मीडिया व फाइल ट्रांसफरसाठी देखील होतो. Meta च्या मालकीचं हे अ‍ॅप वेळेनुसार बदलत देखील आहे. एकीकडे अ‍ॅपमध्ये नवीन अपडेट्स येत आहेत, तर दुसरीकडे जुन्या मोबाइल फोन्स व ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट बंद केला जात आहे.

    व्हॉट्सअ‍ॅपनं घोषणा केली आहे की ते वेगवेगळ्या ब्रँडच्या एकूण 49 स्मार्टफोन्सचा सपोर्ट बंद करत आहेत. कंपनीनं या फोन्सची लिस्ट शेयर केली आहे आणि आता या मोबाइल फोन्सवर WhatsApp वापरता येणार नाही. या यादीत Apple, Samsung, LG आणि SONY सारख्या ब्रँड्सचा समावेश देखील आहे. पुढे तुम्ही पाहू शकता की कोणत्या मोबाइल फोनवर आता व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही.

    या स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप:-

    iPhone 5
    iPhone 5c
    Samsung Galaxy Ace 2
    Samsung Galaxy Core
    Samsung Galaxy S2
    Samsung Galaxy S3 mini
    Samsung Galaxy Trend II
    Samsung Galaxy Trend Lite
    Samsung Galaxy Xcover 2
    Huawei Ascend D
    Huawei Ascend D1
    Huawei Ascend D2
    Huawei Ascend G740
    Huawei Ascend Mate
    Huawei Ascend P1
    LG Optimus 4X HD
    LG Optimus F3
    LG Optimus F3Q
    LG Optimus F5
    LG Optimus F6
    LG Optimus F7
    LG Optimus L2 II
    LG Optimus L3 II
    LG Optimus L3 II Dual
    LG Optimus L4 II
    LG Optimus L4 II Dual
    LG Optimus L5
    LG Optimus L5 Dual
    LG Optimus L5 II
    LG Optimus L7
    LG Optimus L7 II
    LG Optimus L7 II Dual
    LG Optimus Nitro HD
    LG Enact
    LG Lucid 2
    Sony Xperia Arc S
    Sony Xperia miro
    Sony Xperia Neo L
    Wiko Cink Five
    Wiko Darknight ZT
    Lenovo A820
    HTC Desire 500
    Archos 53 Platinum
    Grand S Flex ZTE
    Grand X Quad V987 ZTE
    Quad XL
    Memo ZTE V956

    उपरोक्त यादी त्या स्मार्टफोन्सची आहे ज्यांच्यावर व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट बंद झाला आहे. या मोबाइल फोन्सवरील WhatsApp अपडेट करता येणार नाही आणि प्ले स्टोरवरून देखील नवीन अ‍ॅप व्हर्जन डाउनलोड व इन्स्टाल करता येणार नाही. ही ग्लोबल लिस्ट आहे आणि यादीत अनेक मोबाइल फोन असे आहेत जे भारतीय बाजारात उपलब्ध देखील नाहीत.

    The post WhatsApp वापरायचं असेल तर नवीन फोन घ्या! Apple, Samsung, LG आणि SONY च्या 49 मोबाइल्सवर नाही चालणार लोकप्रिय मेसेंजर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-support-from-49-mobile-phones/feed/ 0