फक्त एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक कसं करायचं? अशी आहे प्रोसेस

व्हॉट्सअ‍ॅप वेळावेळी आपल्या युजर्ससाठी अ‍ॅडव्हान्स फीचर घेऊन येतं. नवीन अपडेट फक्त अ‍ॅपचा अनुभव सुधारत नाहीत तर अनेक सुविधा देखील देतात. ह्यात Meta च्या मालकीच्या WhatsApp नं नवीन Chat Lock फीचर सादर केलं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी होणारी चॅटिंग लपवता येऊ शकते आणि ती तुमच्या परवानगी शिवाय कोणीही वाचू शकत नाही. ह्या चॅट लॉक फीचरचा वापर कसा केला जाऊ शकतो आणि ह्याचे फायदे कोणते, ही माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फिचर वापरण्याची पद्धत

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅट लॉक कसं करायचं

स्टेप 1 : सर्वप्रथम तो कॉन्टेक्ट ओपन करा ज्याची चॅट तुम्हाला लॉक करायची आहे.

स्टेप 2 : इथे कॉन्टेक्ट इंफोमध्ये तुम्हाला Chat Lock चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : चॅट लॉकमध्ये ‘Lock this Chat with Fingerprint’ ऑप्शनवर टॅप करून ऑन करा.

स्टेप 4 : आता तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅन करावा लागेल, ह्यासाठी फिंगरप्रिंट सेन्सरवर टॅप करा.

स्टेप 5 : फिंगरप्रिंट सेन्सर सबमिट होताच त्या कॉन्टेक्टची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक होईल आणि तुमच्याव्यतिरिक्त कोणीही ओपन करू शकणार नाही.

लॉक चॅट कसं वाचायचं

स्टेप 1 : व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फीचरच्या माध्यमातून प्रायव्हेट केलेले मेसेज बघण्यासाठी Chats ची लिस्ट खाली स्क्रॉल करा.

स्टेप 2 : चॅट्स लिस्ट स्क्रॉल डाउन करताच Locked Chats चं फोल्डर सर्वात वर दिसेल, त्यावर टॅप करा.

स्टेप 3 : लॉक्ड चॅट फोल्डर उघडण्यासाठी तुमचा फिंगरप्रिंट स्कॅन नोंदवा.

स्टेप 4 : फिंगरप्रिंट स्कॅन होताच लॉक केलेल्या चॅट्सचा संपूर्ण फोल्डर ओपन होईल आणि लॉक केलेलं सर्व कॉन्टेक्ट समोर येतील.

स्टेप 5 : ज्या कॉन्टेक्टशी चॅटिंग करायची आहे त्यावर टॅप करा आणि नेहमीप्रमाणे मेसेज पाठवा.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फीचरचे फायदे

  • हे पासवर्ड प्रोटेक्टेड फीचर आहे ज्याचा वापर पूर्णपणे सुरक्षित आहे.

    एकाच वेळी अनेक कॉन्टेक्ट्सची चॅट सुरक्षित लॉक करता येतात.

  • चॅट लॉक फीचर असलेले सर्व कॉन्टेक्ट एकाच फोल्डरमध्ये सेव्ह राहतात.
  • तुमच्या पासवर्ड किंवा फिंगरप्रिंटविना कोणीही ते ओपन करू शकत नाही.
  • लॉक केलेल्या कॉन्टेक्ट्सचा नोटिफिकेशनमध्ये मेसेज प्रीव्यू दिसत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फीचरची घोषणा कंपनीनं केली आहे जे पुढील काही दिवसांत मोबाइल युजर्सना मिळण्यास सुरुवात होईल. हे फीचर अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयओएस असलेल्या अ‍ॅप्पल आयफोन दोन्हीवर चालेल. ह्या फीचरमध्ये जर एखाद्या लॉक्ड कॉन्टेक्टनं तुम्हाला कॉल केला तर नोटिफिकेशन्स नेहमीप्रमाणे येईल. हे फीचर सध्या फक्त मोबाइलवर वापरता येईल डेस्कटॉपवर ह्याचा फायदा मिळणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here