
Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन भारतात ठरल्याप्रमाणे सादर करण्यात आले आहेत. ही कंपनीची सर्वात प्रीमियम स्मार्टफोन सीरिज आहे जी सर्वप्रथम चीनमध्ये लाँच झाल्यांनतर आता भारतात आली आहे. या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये Zeiss ऑप्टिक्स देण्यात आले आहेत तर यातील Vivo X90 Pro मध्ये 1-इंचाचा Sony IMX989 सेन्सर आहे. दोन्ही फोन्समध्ये MediaTek Dimensity 9200 SoC, 120W फास्ट चार्जिंग, 120हर्ट्झ रिफ्रेश रेटसह अॅमोलेड डिस्प्ले आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
विवो एक्स 90 आणि एक्स 90 प्रो ची किंमत
- Vivo X90 च्या 8GB + 256GB मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे.
- Vivo X90 चा 12GB + 256GB मॉडेल 63,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.
- Vivo X90 Pro चा एकमेव व्हेरिएंट 12GB + 256GB सह येतो जो 84,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल
- 6.78″ FHD+ OLED display
- 12GB RAM + 256GB storage
- MediaTek Dimensity 9200
- 32MP Selfie Camera
- 120W Fast Charging
कंपनी या एचडीएफसीच्या क्रेडिट/डेबिट कार्ड ट्रँजॅक्शनवर 8,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देत आहे, तसेच 8,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 9 महिने नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे.
Vivo X90 Pro घेणाऱ्या ग्राहकांना 5,500 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंट HDFC आणि ICICI बँकेच्या डेबिट/क्रेडिट कार्डवर मिळेल, त्याचबरोबर 6,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 9 महिने नॉ कॉस्ट ईएमआय आणि मोफत 599 रुपयांचे XE710 हेडफोन्स. हे देखील वाचा: 32MP Selfie Camera सह OPPO A98 5G फोनचे फुल स्पेसिफिकेशन लीक; लवकरच येऊ शकतो बाजारात
विवो एक्स 90 आणि एक्स 90 प्रोचे स्पेसिफिकेशन्स
Vivo X90 मध्ये 6.78-इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, पंच होल कटआऊट, HDR10+, 300Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2,800×1,260 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. दुसरीकडे Vivo X90 Pro मध्ये 6.78- इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2K रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, पंच होल कटआऊट, 20:9 आस्पेक्ट रेशियो, 452 PPI, 2160Hz PWM, HDR10+, 300Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2,800×1,260 पिक्सल रिजोल्यूशन मिळते.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 9200 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. यात अँड्रॉइड 13 सह फनटचओएस देण्यात आला आहे. हे विवो स्मार्टफोन 12GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 4.0 storage ला सपोर्ट करतात.
Vivo X90 आणि X90 Pro स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. रियर कॅमेरा सेटअप पाहता एक्स90 मध्ये 50MP IMX866 प्रायमरी सेन्सरसह 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. तर एक्स90 प्रो 50MP IMX989 सेन्सरसह 12MP IMX663 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP IMX758 पोर्टरेट लेन्सला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर
दोन्ही विवो स्मार्टफोन 5G SA/ NSA आणि Dual 4G VoLTE ला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी Vivo X90 मध्ये 4,810एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तर Vivo X90 Pro स्मार्टफोन 4,870एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. दोन्ही मोबाइल फोन्स 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतात तसेच कंपनीनं आपला प्रो मॉडेल 50वॉट वायरलेस चार्जिंगसह सादर केला आहे.

















