Xiaomi Blast - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 12 Sep 2022 11:19:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू https://www.91mobiles.com/marathi/redmi-6a-blast-woman-dies-while-sleeping-in-xiaomi-phone-explode/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-6a-blast-woman-dies-while-sleeping-in-xiaomi-phone-explode/#respond Mon, 12 Sep 2022 11:19:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13028 Mobile Phone सध्या माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे, त्यामुळे सतत आपल्या आजूबाजूला फोन असतोच. कधी हातात, तर कधी खिशात आणि झोपताना उशाला देखील आपण स्मार्टफोन ठेवतो. परंतु दिवस-रात्र आपल्या सोबत असलेली वस्तू बॉम्ब प्रमाणे फुटत असली तर काय होईल? चीनी कंपनी Xiaomi चा मोबाइल फोन पुन्हा एकदा बॉम्ब बनला आहे. Redmi 6A Blast झाल्याची […]

The post पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Mobile Phone सध्या माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे, त्यामुळे सतत आपल्या आजूबाजूला फोन असतोच. कधी हातात, तर कधी खिशात आणि झोपताना उशाला देखील आपण स्मार्टफोन ठेवतो. परंतु दिवस-रात्र आपल्या सोबत असलेली वस्तू बॉम्ब प्रमाणे फुटत असली तर काय होईल? चीनी कंपनी Xiaomi चा मोबाइल फोन पुन्हा एकदा बॉम्ब बनला आहे. Redmi 6A Blast झाल्याची बातमी नुकतीच आली आहे आणि या दुर्घटनेत एका झोपेत असलेल्या महिलेचा मृत्यू देखील झाला आहे.

Xiaomi Phone Blast

रेडमी 6ए ब्लास्टची बातमी एका व्यक्तीनं आपल्या ट्वीटर हँडलवर पोस्ट केली आहे. या ट्वीटमध्ये मनजीत नावाच्या व्यक्तीनं काही फोटोज शेयर करत दावा केला आहे की त्यांच्या काकीचा मृत्यु Xiaomi Redmi 6A Blast मुळे झाला आहे. आपल्या ट्वीटमध्ये मनजीतनं ब्लास्ट झालेल्या मोबाइल फोनच्या फोटो सोबतच मृत महिलेचा फोटो देखील शेयर केला आहे ज्यात मृतदेह स्पष्ट दिसत आहे. हे देखील वाचा: OPPO करणार धमाका! 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या OPPO F21s Pro Series ची लाँच देतं ठरली

हे ट्वीट खूप संवेदनशील आहे त्यामुळे विवेक बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.

रेडमी फोनमध्ये स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आपला रेडमी 6ए स्मार्टफोन बिछान्यावर उशीला कडेला ठेऊन झोपली होती. महिला जेव्हा झोपेत होती तेव्हा अचानकपणे तिच्या उशीवर ठेवण्यात आलेल्या शाओमी फोनमध्ये ब्लास्ट झाला आहे. हा स्फोट इतका जबरदस्त होता की तेव्हा महिलेच्या डोक्याला मार बसला होता तसेच अंथरुणातच तिचा मृत्यू झाला. शेयर केलेल्या फोटोजमध्ये बिछान्यावर रक्त दिसत दिसत आहे. तसेच फोन देखील पूर्णपणे जळाला आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला मोटोरोलाचा दणका! स्वस्त आणि मस्त Moto E22 ची माहिती लीक; असा दिसेल हँडसेट

xiaomi Redmi 6a Blast

शाओमीनं व्यक्त केला शोक

ट्वीटवर रेडमी तसेच कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना टॅग केल्यानंतर कंपनीकडून उत्तर आलं आहे तसेच या प्रकरणाचा तपास करण्याचा दिलासा देण्यात आला आहे. परंतु या मोठ्या दुर्घटनेनंतर कंपनी मृतकाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देईल की नाही हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. त्यापेक्षाही मोठी बाब अशी आहे की Xiaomi Redmi 6A Blast च्या मागे कंपनी आपल्या प्रोडक्ट मधील दोष मान्य करेल की युजरची चूक म्हणून खापर युजरवर फोडेल, ही देखील महत्वाची बाब म्हणता येईल.

The post पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-6a-blast-woman-dies-while-sleeping-in-xiaomi-phone-explode/feed/ 0
Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये घडली हि दुर्घटना https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-blast-in-gujarat-india-battery-fire-smoke/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-blast-in-gujarat-india-battery-fire-smoke/#respond Tue, 04 Feb 2020 12:43:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6499 Xiaomi Redmi Note 6 Pro मध्ये ब्लास्ट झाला आणि हि संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली.

The post Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये घडली हि दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हा स्मार्टफोन मध्ये आग लागण्याची एखादी घटना घडते तेव्हा आपण सावध होतो. कारण फोन आपल्या सर्वात जवळ असतो आणि यात सर्वात जास्त शारीरिक नुकसान होण्याची भीती असते. आज पुन्हा एकदा मोबाईल फोन ब्लास्टची घटना समोर आली आहे. हि बातमी गुजरात मधील जामनगर मधून आली आहे जिथे मोबाईल रिपेरिंग शॉप वर एक फोन अचानक ब्लास्ट झाला. फोन Xiaomi चा होता आणि मॉडेल होता Redmi Note 6 Pro. शाओमी फोन ब्लास्ट होण्याची घटना याआधी पण भारतात अनेकदा झाली आहे. आम्हाला जी बातमी मिळाली त्या नुसार ग्राहकाच्या फोन मध्ये काही तरी बिघाड होता आणि तो रिपेयर केला जात होता. जेव्हा फोनचा बॅक पॅनल उघडण्यात आला, तेव्हा अचानक Xiaomi Redmi Note 6 Pro मध्ये ब्लास्ट झाला आणि हि संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली.

हि बातमी सर्वात आधी खबरगुजरात ने प्रकाशित केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया वर या सीसीटीवी मध्ये कैद झालेला वीडियो टाकला आहे. त्याचबरोबर ज्या मोबाईल रिपेरिंग शॉप वर हि घटना घडली तिथल्या एका फेसबुक यूजर कुनाल सोनी याने पण आपल्या फेसबुक अकाउंट वर वीडियो अपडेट केला आहे. त्यांनी वीडियो मध्ये अशी माहिती दिली आहे कि मोबाईल टेक्निशियन किशनने जेव्हा फोन चेक करण्यासाठी तो उघडला तेव्हा बॅक पॅनल उघडल्याने फोन मध्ये धूर येऊ लागला आणि फोन ब्लास्ट झाला. फोन रिपेयरिंगचे काम ध्रुती मोबाईल द्वारे केले जात होते आणि तिथेच हि घटना घडली. फोन मध्ये आग लागताच धूर येऊ लागला आणि गोंधळ उडाला. हा फोन कोणत्या यूजरचा होता आणि यासाठी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे कि नाही याची माहिती अजूनतरी समोर आली नाही. परंतु फोन ब्लास्टच्या बातमीने लोकांना नक्कीच घाबरवले आहे.

Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग, Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये झाली दुर्घटना#RedmiNote6Pro #PhoneBlast

91mobiles मराठी यांनी वर पोस्ट केले मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

Redmi Note 6 Pro मध्ये आग लागल्याचे वीडियो मध्ये स्पष्ट दिसत आहे. बॅक पॅनल उघडताना फोन मधून धूर येऊ लागला. तेव्हा फोन टेक्निशियनच्या हातात होता. घाबरून टेक्निशियनने फोन लगेच काउंटर वर ठेवला आणि धूर वेगाने वाढू लागला. यावेळी मोबाईलचा मालक पण तिथे उभा होता. जेव्हा धूर अचानक वाढला तेव्हा टेक्निशियनने फोन खाली जमिनीवर फेकून दिला.

Kunal Soni यांनी वर पोस्ट केले सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

सुदैवाने Xiaomi Redmi Note 6 Pro टेक्निशियनच्या हातात ब्लास्ट झाला नाही आणि या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. हे प्रकरण समोर आल्यामुळे सर्विस सेंटर वरील लोक Xiaomi ब्रँड आणि त्याच्या प्रोडक्ट वर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. आतापर्यंत याबाबत कंपनीचे कोणतेही विधान आले नाही. एक मोठी दुर्घटना टळली पण आता हे बघावे लागेल कि Xiaomi या घटनेसाठी कोणाला जबाबदार ठरवते सर्विस सेंटर कि एखादी व्यक्ती कि आपल्या प्रोडक्ट्स वर सेफ्टी साठी काही खास काम करेल.

The post Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये घडली हि दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-blast-in-gujarat-india-battery-fire-smoke/feed/ 0
Xiaomi Redmi Note 7S मध्ये लागली आग, महाराष्ट्रात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7s-caught-fire-in-thane-maharashtra-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7s-caught-fire-in-thane-maharashtra-india/#respond Wed, 20 Nov 2019 07:14:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5815 हि घटना जेव्हा Xiaomi ला समजली, तेव्हा ते म्हणाले कि, ‘ते बदल्यात नवीन स्मार्टफोन देऊ शकत नाहीत’.

The post Xiaomi Redmi Note 7S मध्ये लागली आग, महाराष्ट्रात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल फोन मध्ये आग लागणे आणि बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना समोर येत असतात. काही दुर्घटनांचे कारण यूजरची चूक असते, ज्यामुळे प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याला नवीन शिकवण मिळते. जेव्हा चूक यूजरची असते तेव्हा त्याला समजावले जाते, पण जेव्हा कोणतीही चूक नसताना तुमच्या स्मार्टफोनला आग लागली तर काय होईल? आणि त्यापेक्षाही मोठी बाब म्हणजे फोन विकत घेऊन फक्त एक महीनाच झाला असेल आणि ब्रँड न्यू स्मार्टफोन मध्ये ठेवल्या जागी आग लागली तर? अशीच एक घटना महाराष्टातून समोर आली आहे जिथे एका तरुणाच्या नव्या कोऱ्या स्मार्टफोनला आग लागली. आणि तो स्मार्टफोन होता Xiaomi चा Redmi Note 7S!

Xiaomi Redmi Note 7S ला आग लागण्याची घटना ठाणे जिल्ह्यातील आहे. Redmi Note 7S चा वापर ईश्वर चव्हाण नावाचा यूजर करत होता. चव्हाण यांच्यानुसार गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबरला त्याने स्वतःसाठी नवीन Xiaomi Redmi Note 7S आर्डर केला होता. ऑनलाईन शॉपिंग साइटवरून फोन मागवल्यानंतर Redmi Note 7S ऑक्टोबरच्या तीन तारखेला तारीख त्याला मिळाला. ईश्वर एक महिनाभर कोणत्याही अडचणीविना आपला शाओमी स्मार्टफोन वापरत होता.

पण 3 नोव्हेंबरला जेव्हा ईश्वर आपल्या ऑफिस मध्ये काम करत होता तेव्हा त्याला अचानकपणे काहीतरी जळाल्याचा वास आला. जेव्हा त्याने आजूबाजूला बघितले तेव्हा बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या त्याच्या Redmi Note 7S स्मार्टफोन मधून धूर येत होता. बघता बघता त्याच्या फोन मध्ये आग लागली. काही लक्षात येण्याआधी त्याच्या फोनचा प्लास्टिक कवर वितळून गेला होता आणि फोन खूप गरम असल्यामुळे उचलता पण येत नव्हता.

ईश्वरचे नशीब चांगले होते म्हणून Redmi Note 7S स्मार्टफोनला फक्त आग लागली पण त्याचा स्फोट झाला. जर फोन मध्ये स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना झाली असती. सुदैवाने ईश्वर किंवा आजूबाजूच्या इतर कोणालाही कोणतीही हानी झाली नाही. ईश्वरने स्पष्ट केले कि त्याने फोन चार्जिंगला लावला नव्हता किंवा फोन कुठेही पडला नव्हता. आग लागली तेव्हा फोन बाजूला ठेवलेले होता, तो फोन कोणी वापरत पण नव्हतं.

फोन जळाल्यामुले ईश्वराला आपला सिम कार्ड पण काढता आले नाही. Redmi Note 7S ला आग लागल्याची हि घटना जेव्हा Xiaomi ला समजली, तेव्हा ते म्हणाले कि, ‘ते बदल्यात नवीन स्मार्टफोन देऊ शकत नाहीत’. Xiaomi कडून मिळालेल्या या प्रतिसादामुळे फक्त ईश्वर नाही तर इतर शाओमी व रेडमी फोन यूजर्सना पण मोठा धक्का बसला आहे.

Source : gizchina

The post Xiaomi Redmi Note 7S मध्ये लागली आग, महाराष्ट्रात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7s-caught-fire-in-thane-maharashtra-india/feed/ 0