OPPO करणार धमाका! 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या OPPO F21s Pro Series ची लाँच देतं ठरली

Oppo F21s Pro

OPPO F21s Pro Series India Launch: मोबाइल निर्माता Oppo नं आपल्या OPPO F21s Pro Series च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार नवीन सीरीजमध्ये मिड रेंज डिवाइस 15 सप्टेंबरला सादर होतील. तसेच या सीरीजबद्दल टिपस्टर पारस गुगलानीनं देखील खास माहिती शेयर केली आहे. विशेष म्हणजे फोनच्या डिजाइन आणि काही खास फीचर्स देखील समोर आले आहेत. त्यानुसार हा फोन Dawnlight Gold आणि Starlight Black सारख्या दोन शानदार कलर ऑप्शनमध्ये सादर होईल. फोनमध्ये खास मायक्रो लेन्स कॅमेरा 30x मॅग्निफिकेशन सपोर्टसह सादर करण्यात येईल. चला जाणून घेऊया OPPO F21s Pro Series ची लाँच डेट, फीचर्स आणि अन्य माहिती.

OPPO F21s Pro Series Launch Date

अगर ओप्पो F21 प्रो सीरीज 15 सप्टेंबरला भारतात लाँच होईल. याआधी आलेल्या लिक्सनुसार ही सीरिज 19 सप्टेंबरला सादर केली जाणार होती. लिक्स आणि रिपोर्ट्समधून या फोनच्या काही इमेज आणि फीचर्सचा देखील खुलासा झाला आहे. तसेच सीरीजमध्ये Oppo F21s आणि Oppo F21s Pro असे डिवाइस भारतीयांच्या भेटीला येतील. दोन्ही डिवाइसमध्ये फ्लॅट फ्रेम डिजाइन मिळेल. बेस मॉडेल Oppo F21s मध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप मिळेल. तर, प्रो डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.

OPPO F21s Pro Series Specifications

फोनबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, असं देखील सांगण्यात आलं आहे की डिवाइसमध्ये 64 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळेल. दोन्ही डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम + 128GB इंटरनल स्टोरेज असल्याचं समोर आलं आहे. F21s Pro डिवाइसमध्ये ऑर्बिट रिंग लाइट कॅमेरा सेन्सरच्या बाजूनं देण्यात येईल हे मात्र निश्चित आहे. तसेच फोनमध्ये anti-corrosion glass बॅक डिजाइन मिळेल.

फोनचे जे जो फोटोज समोर आले आहेत, त्यात Oppo F21s सीरीजमध्ये पावर बटन उजवीकडे दिसत आहे. तर डावीकडे वॉल्यूम बटन दिसत आहे. या आगामी ओप्पो फोन्समध्ये आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड 12 आधारित ColorOS 12.1 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. हे देखील वाचा: लकी नंबर, जन्मतारीख असलेला मोबाइल नंबर मिळवा फ्री; घरपोच Free VIP Mobile Number असलेलं सिम

काही दिवसांपूर्वी भारतात आलेला OPPO A57e

ओप्पो ए57ई 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह भारतीय ग्राहकांच्या भेटीला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: पहिल्याच सेलमध्ये मोठी सूट! स्वस्त Realme C33 झाला आणखी स्वस्त; सिंगल चार्जवर 37 दिवसांचा बॅकअप

OPPO A57e Blue color Variant

OPPO A57e स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित कंपनीच्या कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट, माली-जी57 एमसी2 जीपीयू, 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या डिवायसमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here