Xiaomi Civi 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 09:47:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12GB रॅमसह Xiaomi Civi 2 चीनमध्ये लाँच; जोडीला 32MP चा ड्युअल सेल्फी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/32mp-dual-selfie-camera-phone-xiaomi-civi-2-launched-with-snapdragon-7-gen-1-check-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/32mp-dual-selfie-camera-phone-xiaomi-civi-2-launched-with-snapdragon-7-gen-1-check-price-specifications-details/#respond Wed, 28 Sep 2022 07:17:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13520 शाओमीनं आज टेक मार्केटमध्ये आपल्या कॅमेरा सेंट्रिक सिव्ही सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यासह Xiaomi Civi 2 ची टेक मंचावर एंट्री झाली आहे. या फोनमध्ये 32MP + 32MP Dual Selfie Camera सह 12GB RAM आणि Snapdragon 7 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे तसेच 67W fast charging चा देखील समावेश आहे. पुढे […]

The post 12GB रॅमसह Xiaomi Civi 2 चीनमध्ये लाँच; जोडीला 32MP चा ड्युअल सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीनं आज टेक मार्केटमध्ये आपल्या कॅमेरा सेंट्रिक सिव्ही सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यासह Xiaomi Civi 2 ची टेक मंचावर एंट्री झाली आहे. या फोनमध्ये 32MP + 32MP Dual Selfie Camera सह 12GB RAM आणि Snapdragon 7 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे तसेच 67W fast charging चा देखील समावेश आहे. पुढे Xiaomi Civi 2 Price आणि फुल स्पेसिफिकेशन्स डिटेल्स देण्यात आले आहेत.

Xiaomi Civi 2 चा सेल्फी कॅमेरा

शाओमी सिव्ही 2 स्मार्टफोनची मुख्य खासियत यातील सेल्फी कॅमेरा आहे. हा मोबाइल फोन 32MP + 32MP Dual Selfie Camera ला सपोर्ट करतो जे डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी ‘पिल शेप’ नॉचमध्ये देण्यात आले आहेत. दोन्ही सेल्फी सेन्सर 32 मेगपिक्सलचे ज्यात एक लेन्स एफ/2.0 अपर्चरवर चालते तर दुसरी 100डिग्री फिल्ड ऑफ व्यूला सपोर्ट करणारी वाइड अँगल लेन्स आहे. विशेष म्हणजे कंपनीनं फ्रंटला देखील दोन फ्लॅश दिले आहेत.

32MP Dual Selfie Camera phone Xiaomi Civi 2 launched with Snapdragon 7 Gen 1 check price specifications details

Xiaomi Civi 2 Rear Camera

फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी लेन्सचा समावेश आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेट! नोकिया-रियलमीला धोबीपछाड देण्यासाठी Redmi Pad 4G मैदानात

32MP Dual Selfie Camera phone Xiaomi Civi 2 launched with Snapdragon 7 Gen 1 check price specifications details

Xiaomi Civi 2 Specifications

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता या मोबाइल फोनमध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळतो, जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. हा मोबाइल फोन 1000निट्स ब्राइटनेस आणि 402पीपीआयला सपोर्ट करतो. फोनच्या स्क्रीनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.

32MP Dual Selfie Camera phone Xiaomi Civi 2 launched with Snapdragon 7 Gen 1 check price specifications details

Xiaomi Civi 2 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा शाओमी फोन एड्रेनो जीपीयूला सपोर्ट करतो.

32MP Dual Selfie Camera phone Xiaomi Civi 2 launched with Snapdragon 7 Gen 1 check price specifications details

शाओमी सिव्ही 2 ड्युअल सिमला सपोर्टसह बाजारात आला आहे जो 5जी टेक्नॉलॉजीवर चालतो. पावर बॅकअपसाठी इस मोबाइल फोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. विशेष म्हणजे हा शाओमी फोन stainless VC liquid cooling system टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. हे देखील वाचा: 8 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह Nokia T10 अँड्रॉइड टॅबलेट भारतात लाँच; किंमत फक्त 11,799 रुपये

Xiaomi Civi 2 Price

हा स्मार्टफोन चीनमध्ये तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस RMB 2,399 (जवळपास 27,299 रुपये) आहे. तसेच 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट RMB 2,499 (जवळपास 28,500 रुपये) आणि Xiaomi CIVI 2 12GB + 256GB RMB 2,799 (जवळपास 31,900 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. हा शाओमी फोन Black, Blue Silk, Silver आणि Pink कलरमध्ये विकत घेता येईल.

The post 12GB रॅमसह Xiaomi Civi 2 चीनमध्ये लाँच; जोडीला 32MP चा ड्युअल सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/32mp-dual-selfie-camera-phone-xiaomi-civi-2-launched-with-snapdragon-7-gen-1-check-price-specifications-details/feed/ 0