सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेट! नोकिया-रियलमीला धोबीपछाड देण्यासाठी Redmi Pad 4G मैदानात

Redmi Pad 4G Specs Details

Redmi Pad 4G: लॉकडाउनच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेसमुळे मोठी स्क्रीन असलेल्या डिवाइसची मागणी वाढली. त्यामुळे बरीच वर्ष दुर्लक्षित असलेल्या अँड्रॉइड टॅबलेट सेगमेंटकडे स्मार्टफोन ब्रॅण्ड्स लक्ष देऊ लागले. आता फक्त सॅमसंग नव्हे तर शाओमी, रियलमी, मोटोरोला आणि नोकिया सारख्या ब्रँड्सनी आपले टॅबलेट सादर केले आहेत. तसे 4G Smartphone मार्केटमध्ये नाव कामवाल्यानंतर Xiaomi कंपनी आता आपल्या रेडमी ब्रँडसह टॅबलेट बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी तयार आहे. काही दिवसांपूर्वी रेडमीच्या 5G टॅबलेटची माहिती आली होती परंतु आम्हाला आज Redmi Pad 4G ची माहिती मिळाली आहे.

शाओमी द्वारे लाँच करण्यात येण्याआधीच आता रेडमी पॅड 4जीचे फोटो व स्पेसिफिकेशन एक्सक्लूसिव्हली 91मोबाइल्स हिंदीला मिळाले आहेत ज्यात Redmi Pad 4G Tablet च्या फुल स्पेसिफिकेशन आणि कलर व्हेरिएंटचा खुलासा करण्यात आला आहे. या इमेज आणि माहिती भारतातील प्रमुख टिपस्टर सुधांशूनं शेयर केले आहेत. रेडमीचा हा टॅबलेट MediatTek के Helio G99 चिपसेटवर चालतो जो एक 4G प्रोसेसर आहे. तसेच यात तुम्हाला 10.61 इंचाची मोठी स्क्रीन मिळेल. फोनची इतर माहिती आम्ही पुढे दिली आहे.

Redmi Pad 4G Specs Details

Redmi Pad 4G चा डिस्प्ले

सर्वप्रथम रेडमी पॅड 4जीची स्क्रीन पाहता, लीकनुसार हा टॅबलेट डिवायस 10.61 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाईल. टॅबची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली असेल जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मिळालेल्या माहितीनुसार हा टॅबलेट 1बिलियन+ कलर्स, 400nits ब्राइटनेस आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोसह येईल.

Redmi Pad 4G Specs Details

विशेष म्हणजे रेडमी पॅड 4जी Low Visual Fatigue Certification मिळवणारा जगातील पहिला टॅबलेट असेल. तसेच या टॅबलेट डिवायसमध्ये बिल्ट-इन ब्लू लाइट रीडक्शन सारखे अ‍ॅडव्हान्स फीचर देखील देण्यात येईल. डिस्प्लेच्या चारही बाजूंना नॅरो बेजल्स असतील ज्या फोटोमध्ये देखील दिसत आहेत. हे देखील वाचा: 210GB डेटा आणि 105 दिवसांची वैधता असलेला BSNL चा स्वस्त प्लॅन; Airtel-Jio कडे नाही असा प्लॅन

Redmi Pad 4G चे स्पेसिफिकेशन्स

रेडमी टॅब 4जीचे अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार या टॅबलेट डिवायसमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट दिला जाईल जो 4G LTE नेटवर्कवर चालेल. हा डिवायस अँड्रॉइड 12 वर लाँच होईल जो मीयुआय व्हर्जनवर काम करेल. पावर बॅकअपसाठी 8,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. लीकनुसार टॅबलेटच्या बॉक्समध्ये कपंनी 22.5W चार्जर देखील देईल.

Redmi Pad 4G Specs Details

मिळालेल्या माहितीनुसार Redmi Pad 4G तीन व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये एंट्री घेईल. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज दिली जाईल तर दुसरा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि सर्वात मोठा Redmi Pad 5G 6GB RAM + 128GB Storage वर लाँच होईल. सर्व मॉडेल LPDDR4X + UFS 2.2 टेक्नॉलॉजी वर चालतील.

फोटोग्राफीसाठी रेडमी पॅड 4जीच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाईल तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टॅबलेट डिवायस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो फोकस फ्रेम टेक्नॉलॉजीसह येईल. या रेडमी टॅबलेटमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस क्वॉड स्पिकर्स देण्यात येतील. हे देखील वाचा: 8 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह Nokia T10 अँड्रॉइड टॅबलेट भारतात लाँच; किंमत फक्त 11,799 रुपये

Redmi Pad 4G Specs Details

Redmi Pad 4G मेटल यूनिबॉडी डिजाइनसह सादर करण्यात येईल ज्याचे डायमेंशन 250.38×73.70×7.05एमएम आणि वजन 445 ग्राम असेल. लीकनुसार रेडमी पॅड 4जी टॅबलेट डिवायस मार्केटमध्ये Grey, Silver आणि Green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. या आगामी रेडमी टॅबलेटची किंमत मात्र समोर आली नाही, परंतु हा नक्कीच शाओमीचा सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेट असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here