8 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह Nokia T10 अँड्रॉइड टॅबलेट भारतात लाँच; किंमत फक्त 11,799 रुपये

Nokia T10 launched in india Price Specifications details

अँड्रॉइड टॅबलेट सेगमेंटमध्ये सध्या अनेक ब्रँड सक्रिय झाले आहेत, ज्यात HMD Global च्या मालकीच्या नोकिया ब्रँडचा देखील समावेश आहे. कंपनीनं भारतीय बाजारात नवीन नोकिया टॅबलेट डिवायस सादर केला आहे. हा टॅब Nokia T10 नावानं लाँच झाला आहे ज्याची प्रारंभिक किंमत फक्त 11,799 रुपये आहे. 8 इंचाचा HD display असलेल्या या नोकिया टी10 टॅबलेटच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, प्राइस व सेलसंबंधित संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Nokia T10 Specifications

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, नोकिया टी10 टॅबलेट 16:10 अ‍ॅस्पेक्ट रेशियावर सादर करण्यात आला आहे जो 800 x 1280 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 8 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. या डिवायसच्या स्क्रीनला मजबूती देण्यासाठी ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. Nokia T10 पॉलीकार्बोनेट बॉडीवर बनला आहे तसेच या आयपीएक्स2 रेटिंग मिळाली आहे. म्हणजे हा टॅबलेट पाणीच्या शिंतोड्यांपासून सुरक्षित राहू शकतो. हे देखील वाचा: 210GB डेटा आणि 105 दिवसांची वैधता असलेला BSNL चा स्वस्त प्लॅन; Airtel-Jio कडे नाही असा प्लॅन

Nokia T10 launched in india Price Specifications details

Nokia T10 अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो 2 वर्षांच्या ओएस अपडेटसह आला आहे. म्हणजे लवकरच हा Android 13 आणि त्यानंतर पुढे Android 14 वर अपडेट केला जाईल. विशेष म्हणजे नोकिया अँड्रॉइड अपडेटच्या बाबतीत इतर कंपन्यांच्या पुढे आहे, त्यामुळे या टॅबलेटला हे ओएस अपडेट सर्वात आधी मिळू शकतात. हा एक 4जी टॅबलेट आहे जो Unisoc T606 चिपसेटवर चालतो. या डिवायसमध्ये 512 जीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल.

फोटोग्राफीसाठी टॅबलेटच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टॅबलेट डिवायस 2 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी या टॅबमध्ये स्टीरियो स्पीकर, 3.5mm जैक आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट मिळतो. नोकियाने अजूनतरी आपल्या या टॅबलेट डिवायसच्या बॅटरी पावरची माहिती दिली नाही परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार यात 5250mAh ची बॅटरी आहे. नोकिया टी10 मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: उद्या लाँच होतेय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV; जाणून घ्या खासियत

Nokia T10 launched in india Price Specifications details

Nokia T10 Price

सर्वप्रथम किंमत पाहता, सध्या Nokia T10 (WiFi) मॉडेलच कंपनीनं लाँच केला आहे जो दोन व्हेरिएंट्समध्ये आला आहे. टॅबलेटच्या बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस 11,799 रुपये आहे. त्याचप्रमाणे Nokia T10 4GB RAM + 64GB Storage 12,799 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. कंपनी Nokia T10 (LTE + Wi-Fi) देखील लवकरच मार्केटमध्ये घेऊन येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here