Xiaomi Foldable Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 14 Aug 2019 12:40:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi च्या फोल्डेबल फोन मध्ये असेल ट्रिपल रियर कॅमेरा, पेटेंट झाला फाइल https://www.91mobiles.com/marathi/xiaomis-first-foldable-phone-could-have-triple-rear-cameras/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomis-first-foldable-phone-could-have-triple-rear-cameras/#respond Wed, 14 Aug 2019 12:39:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5041 या पेटेंट मध्ये फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

The post Xiaomi च्या फोल्डेबल फोन मध्ये असेल ट्रिपल रियर कॅमेरा, पेटेंट झाला फाइल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षीच्या सुरवातीला शाओमीच्या फोल्डेबल फोनची माहिती समोर येत आहे. तसेच मार्च मध्ये कंपनीने अधिकृतपणे एका वीडियो मध्ये शाओमीच्या फोल्डेबल फोनची झलक दाखवली होती, ज्यावरून निश्चित झाले आहे कि कंपनी आपला फोल्डेबल फोन सादर करण्याची तयारी करत आहे. आता शाओमीच्या पहिल्या डिवाइसचा पेटेंट फाइल झाला आहे.

या पेटेंट वरून माहिती समोर आली आहे कि फोल्डेबल फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. हे पेटेंट यूरोपियन यूनियन इंटलेक्चुअल पॉपर्टी आफिसच्या डेटा मधून समोर आले आहे. या पेटेंट मध्ये डिवाइसचे अनेक फोटो वेगवेगळ्या अँगल्स मधून समोर आले आहेत.

फोटज नुसार फोल्डेबल फोन मध्ये सिंगल डिस्प्ले असेल जो बाहेरील बाजूस घडी होईल. डिवाइस घडी केल्यानंतर तुम्ही हा फोन सिंगल स्क्रीन फोन प्रमाणे वापरू शकत. घडी केल्यानंतर हा फोन कॉम्पॅक्ट दिसतो. या पेटेंट मध्ये फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

फोटो मध्ये तुम्ही बघू शकता कि फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. हा कॅमेरा सेटअप वर्टिकली प्लेस्ड आहे. हा कॅमेरा फोनच्या मिडल सेक्शन मध्ये आहे. या पेटेंट मध्ये फोनचा फ्रेंट कॅमेरा दिसत नाही. तसेच फोनची डिजाइन अधिकृतपणे टीज केल्याप्रमाणे आहे.

शाओमीने हा पेटेंट ओरिजनली 1 मार्च 2019 ला सादर केला होता जो 25 मार्चला रजिस्टर केला गेला होता. तसेच कंपनीच्या या पेंटेट मध्ये लिहिण्यात आले आहे कि हा 1 मार्च 2024 ला संपेल. अशा आहे कि फोन लवकरच लॉन्च केला जाईल. हा फोन Xiaomi MIX Flex आणि Dual Flex च्या नावाने सादर केला जाऊ शकतो.

The post Xiaomi च्या फोल्डेबल फोन मध्ये असेल ट्रिपल रियर कॅमेरा, पेटेंट झाला फाइल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomis-first-foldable-phone-could-have-triple-rear-cameras/feed/ 0
सॅमसंगला चोख उत्तर देण्यासाठी तयार आहे शाओमी, लवकरच येत आहे फोल्डेबल फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomis-foldable-smartphone-new-official-video-teaser/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomis-foldable-smartphone-new-official-video-teaser/#respond Thu, 28 Mar 2019 10:52:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3953 शाओमीचा फोल्डेबल फोन 74,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो.

The post सॅमसंगला चोख उत्तर देण्यासाठी तयार आहे शाओमी, लवकरच येत आहे फोल्डेबल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वीच शाओमीच्या फोल्डेबल फोनचा लीक वीडियो समोर आला होता. हा वीडियो इतर कोणी नव्हे तर शाओमीचे को-फाउंडर लिन बिन यांनी आपल्या ऑफिशियल वीबो अकाउंट वर शेयर केला होता. या विडियो मध्ये शाओमीचा फोल्डेबल फोन दाखवण्यात आला होता, ज्यावरून निश्चित झाले कि कंपनी आपला फोल्डेबल फोन सादर करण्यासाठी तयारी करत आहे. आता या डिवाइसचा अजून एक वीडिया लीक झाला आहे. हा वीडियो समोर आल्यानंतर बोलले जात आहे कि कंपनी लवकरच हा डिवाइस सादर करू शकते.

पण आधीप्रमाणे या वीडियो मध्ये पण फक्त फोनची सुपर फ्लेक्सिबल स्क्रीन दाखवण्यात आली आहे. आणि डिवाइस बद्दल कोणतीही माहिती शेयर करण्यात आलेली नाही. यावेळी पण 10 सेकंदांचा हा वीडियो कंपनी ने चीनच्या माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट वीबो वर स्वतः शेयर केला आहे.

10 सेकंदांच्या या वीडियो मध्ये सर्वात आधी एक मोठा टॅबलेट दिसतो, त्यानंतर वीडियो मध्ये फोन दोन्ही बाजूंनी फोल्ड करताना दाखवण्यात आला आहे. दिसायला हा सॅमसंगच्या फोल्डेबल फोन सारखा वाटत आहे. पण शाओमीच्या या फोल्डेबल फोनची स्क्रीन उजवीकडून आणि डावीकडून घडी होऊन मागे करता येते. घडी केल्यानंतर हा फोन कॉम्पॅक्ट दिसतो.

हे दिखील वाचा: चार रियर कॅमेरा आणि कोणत्याही बटण विना येईल सॅमसंग गॅलेक्सी नोट 10

डिवाईसचे दमदार स्पेसिफिकेशन्स
काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि शाओमी ने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन वर काम सुरु केले आहे आणि हा लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच एक बातमी अजून आली होती ज्यामुळे यूजर्सची एक्साइटमेंट वाढली होती ती अशी होती कि शाओमीचा फोल्डेबल फोन 74,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी फोल्डची किंमत जवळपास 1,40,000 रुपये आहे. तर एमडब्लूसी 2019 मध्ये सादर झालेल्या हुआवईच्या फोल्डेबल फोन मेट एक्स ची किंमत भारतात 1,85,000 रुपये असू शकते.

शाओमीच्या फोल्डेबल फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. पण बोलले जात आहे कि कंपनी यात स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट देऊ शकते. फोनचा डिस्प्ले विजनॉक्सने बनवला आहे.

हे दिखील वाचा: सॅमसंगला मागे टाकण्यासाठी आले हुआवई पी30 आणि पी30 प्रो, चार सेंसर सह प्रोफोशनल कॅमेऱ्या प्रमाणे क्लिक करता येतील फोटो

याआधीच्या एका पोस्ट मध्ये बिन यांनी लिहिले होते कि शाओमीचा डबल फोल्डिंग मोबाईल फोन येत आहे. बिन यांच्यानुसार हा जगातील पहिला दोन्ही बाजूंना घडी होणारा मोबाईल फोन असला पाहिजे. ते म्हणाले कि हा अजूनतरी एक इंजीनियरिंग मशीन आहे, जी सर्वांना बघता यावी म्हणून पाठवण्यात येत आहे. तसेच त्यांनी या वीडियो वर प्रतिक्रिया देण्यास सांगितले होते. ते म्हणले कि जर तुम्हाला हा आवडला तर आम्ही हा भविष्यात सादर करण्याचा विचार करू.

सोर्स

The post सॅमसंगला चोख उत्तर देण्यासाठी तयार आहे शाओमी, लवकरच येत आहे फोल्डेबल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomis-foldable-smartphone-new-official-video-teaser/feed/ 0