सॅमसंगला मागे टाकण्यासाठी आले हुआवई पी30 आणि पी30 प्रो, चार सेंसर सह प्रोफोशनल कॅमेऱ्या प्रमाणे क्लिक करता येतील फोटो

चीनी स्मार्टफोन कंपनी हुआवई ने पॅरिस मध्ये आयोजित इवेंट मध्ये आपल्या पी सीरीजचे दोन नवीन स्मार्टफोन हुआवई पी30 आणि हुआवई पी30 प्रो लॉन्च केले आहेत. कंपनीने इवेंट मध्ये सांगितले ‘’पी सीरीज मध्ये आतापर्यंतचा सर्वात ऍडव्हान्स कॅमेरा देण्यात आला आहे’’. तसेच कंपनी नुसार “या फोन्स मध्ये देण्यात आलेल्या सुपरस्पेक्ट्रम सेंसर आणि एक्सट्रीम ऑप्टिकल सुपरजूम लेंस सारख्या टेक्नॉलजीने कोणत्याही प्रोफेशनल कॅमेऱ्याला मात देता येईल”.

हुआवई पी30 आणि पी30 प्रो ची किंमत
हुआवई ने पी30 चा 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरियंट 799 यूरो (जवळपास 62,240 रुपये) मध्ये लॉन्च केला आहे. तसेच हुआवई पी30 प्रो च्या 6जीबी रॅम+128जीबी इंटरनल स्टोरेज वेरियंटची किंमत 999 यूरो (जवळपास 77,819 रुपये) आहे. तर याच्या 8जीबी रॅम+256जीबी इंटरनल स्टोरेज वेरियंटची किंमत 1099 यूरो (जवळपास 85,609 रुपये) आणि 8जीबी रॅम+512जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 1249 यूरो (जवळपास 92,294 रुपये) आहे.

वायरलेस ईयरफोन्स आणि पावर बँक पण झाले लॉन्च
या इवेंट मध्ये अपेक्षेप्रमाणे कंपनीने आपले वायरलेस ईयरफोन्स आणि पावर बँक लॉन्च केली. कंपनी ने इवेंट मध्ये 12,000एमएएच ची एक पावरबँक सादर केली जी फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह येते. तसेच हुवावे ने एक दमदार प्लग वायरलेस इयरफोन पण लॉन्च केला आहे. हा चार्ज करण्यासाठी कनेक्टर किंवा चार्जरची गरज नाही कारण हा डायरेक्ट फोनशी कनेक्ट करून चार्ज करता येईल.

हुआवई वॉच जीटी आला समोर
इवेंट मध्ये कंपनीने हुआवई वॉच जीटी चे दोन नवीन एडिशन लॉन्च केले. इवेंट मध्ये P सीरीज स्मार्टफोन सह हुआवई वॉच जीटी एक्टिव एडिशन आणि हुआवई वॉच जीटी एलिगेंट एडिशन सादर झाले.

हे देखील वाचा: भारत बनला जगातील चौथा सर्वात मोठा स्पेस शक्ती देश, लॉन्च केला अवकाशात मारा करणारा मिसाईल

हुआवई पी30 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
हुआवई पी30 स्मार्टफोन पाहता यात 6.1-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन (1080 x 2340 पिक्सल) आहे. फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरियंट देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये लेटेस्ट किरिन 980 एसओसी आहे जो 7एनएम चिपसेट असून ड्यूल-एनयूपी ला सपोर्ट करतो. हा चिपसेट गेल्या वर्षी लॉन्च केल्या गेलेल्या मेट 20 सीरीजच्या स्मार्टफोन मध्ये होता.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये लीसा पावर्ड ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. फोन मध्ये 40 मेगापिक्सल (एफ/1.8 अपर्चर) प्राइमरी सेंसर, 16-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड ऐंगल सेंसर (एफ/2.2 अपर्चर) आणि एक टेलिफोटो 8-मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,650एमएएच ची बॅटरी आहे जी 40वॉट सुपर चार्जला सपोर्ट करते.

हे देखील वाचा: जियो गीगाफाइबर वर मिळेल प्रत्येक महिन्याला 100जीबी सुपर फास्ट इंटरनेट, जियो होम टीवी पण लवकर होईल लॉन्च

हुआवई पी30 प्रो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
पी30 प्रो बद्दल बोलायचे तर यात 6.47-इंचाचा ओएलईडी फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन (1080x 2340 पिक्सल) आहे. स्मार्टफोन मध्ये लेटेस्ट किरिन 980 एसओसी देण्यात आला आहे जो 7एनएम चिपसेट असून ड्यूल-एनयूपी ला सपोर्ट करतो. फोन 6जीबी रॅम+128जीबी इंटरनल स्टोरेज वेरियंट, 8जीबी रॅम+256जीबी इंटरनल स्टोरेज वेरियंट आणि 8जीबी रॅम+512जीबी स्टोरेज वेरियंट मध्ये सादर केला गेला आहे.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये चार कॅमेरा देण्यात आले आहेत. यात 40-मेगापिक्सलचा वाइड एंगल सेंसर, 20-मेगापिक्सल अल्ट्रावाइड एंगल सेकेंडरी सेंसर, 8 मेगापिक्सल टेली फोट कॅमेरा सेंसर आणि शेवटी टाइम-ऑफ-फ्लाइट (टीओएफ) डेफ्थ सेंसर आहे. फोन मध्ये 4,200एमएएच ची बॅटरी आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here