यावर्षीच्या सुरवातीला शाओमीच्या फोल्डेबल फोनची माहिती समोर येत आहे. तसेच मार्च मध्ये कंपनीने अधिकृतपणे एका वीडियो मध्ये शाओमीच्या फोल्डेबल फोनची झलक दाखवली होती, ज्यावरून निश्चित झाले आहे कि कंपनी आपला फोल्डेबल फोन सादर करण्याची तयारी करत आहे. आता शाओमीच्या पहिल्या डिवाइसचा पेटेंट फाइल झाला आहे.
या पेटेंट वरून माहिती समोर आली आहे कि फोल्डेबल फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. हे पेटेंट यूरोपियन यूनियन इंटलेक्चुअल पॉपर्टी आफिसच्या डेटा मधून समोर आले आहे. या पेटेंट मध्ये डिवाइसचे अनेक फोटो वेगवेगळ्या अँगल्स मधून समोर आले आहेत.
फोटज नुसार फोल्डेबल फोन मध्ये सिंगल डिस्प्ले असेल जो बाहेरील बाजूस घडी होईल. डिवाइस घडी केल्यानंतर तुम्ही हा फोन सिंगल स्क्रीन फोन प्रमाणे वापरू शकत. घडी केल्यानंतर हा फोन कॉम्पॅक्ट दिसतो. या पेटेंट मध्ये फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
फोटो मध्ये तुम्ही बघू शकता कि फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. हा कॅमेरा सेटअप वर्टिकली प्लेस्ड आहे. हा कॅमेरा फोनच्या मिडल सेक्शन मध्ये आहे. या पेटेंट मध्ये फोनचा फ्रेंट कॅमेरा दिसत नाही. तसेच फोनची डिजाइन अधिकृतपणे टीज केल्याप्रमाणे आहे.
शाओमीने हा पेटेंट ओरिजनली 1 मार्च 2019 ला सादर केला होता जो 25 मार्चला रजिस्टर केला गेला होता. तसेच कंपनीच्या या पेंटेट मध्ये लिहिण्यात आले आहे कि हा 1 मार्च 2024 ला संपेल. अशा आहे कि फोन लवकरच लॉन्च केला जाईल. हा फोन Xiaomi MIX Flex आणि Dual Flex च्या नावाने सादर केला जाऊ शकतो.




















