Xiaomi Mi 7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 18 May 2018 13:08:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी साजरा करत आहे आपला 8वा वर्धापन दिन, लॉन्च करणार एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन मी 8, अॅप्पल-सॅमसंग ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-celebrating-8th-anniversary-special-anniversary-edition-smartphone-mi-8-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-celebrating-8th-anniversary-special-anniversary-edition-smartphone-mi-8-in-marathi/#respond Fri, 18 May 2018 13:08:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=538 फोन मध्ये अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल त्याचबरोबर फोन मध्ये 3डी फेस स्कॅनिंग फीचर असेल.

The post शाओमी साजरा करत आहे आपला 8वा वर्धापन दिन, लॉन्च करणार एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन मी 8, अॅप्पल-सॅमसंग ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी कंपनी टेक बाजारात इतक्या वेगाने पुढे जात आहे की काही वर्षांमध्ये मोठया कंपन्यांना पण तिने मागे टाकले आहे. भारतीय मोबाईल बाजार वर अनेक वर्ष राज्य करणार्‍या सॅमसंग ला पण शाओमी ने धक्का दिला आहे. शाओमी अस्तित्वात येऊन 8 वर्ष झाली आणि या 8 वर्षांमध्ये कंपनी ने फक्त इंडियन स्मार्टफोन बाजारात आपले राज्य स्थापन केले नाही तर अंर्तराष्ट्रीय बाजारात पण वेगाने प्रगती केली आहे. आपला 8वा वाढदिवस शाओमी खास पद्धतीने साजरा करणार आहे आणि यानिमित्ताने शाओमी आपला स्पेशल स्मार्टफोन सादर करणार आहे.

शाओमी च्या या स्मार्टफोन बद्दल आता पर्यंत फक्त लीक्स आणि गॉसिप समोर आले होते पण आता शाओमी च्या या एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन ची आॅफिशियल टीजर ईमेज पण समोर आली आहे. शाओमी ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन ची घोषणा केली आहे. शाओमी ने एक ईमेज शेयर केली आहे ज्यात मोठा ‘8’ लिहिण्यात आला आहे. शाओमी च्या या ईमेज वरून स्पष्ट झाले आहे की कंपनी आपला 8वा वर्धापनदिन स्पेशल एडिशन स्मार्टफोन सादर करेल.

शाओमी च्या 8व्या एनिर्वसरी वाल्या स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या इमेज वरून समजले आहे की हा स्मार्टफोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. या फोन मध्ये अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल त्याचबरोबर फोन मध्ये 3डी फेस स्कॅनिंग फीचर असेल. शाओमी ने कंपनी च्या एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन चे नाव सांगितले नाही पण अंदाज लावला जात आहे की हा फोन मी 8 नावाने लॉन्च केला जाईल, तर काही लीक्स मध्ये एनिर्वसरी स्पेशल एडिशन मी 7 प्लस नावाने लॉन्च केला जाण्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे येणार्‍या 23 मे ला शाओमी चीन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मध्ये कंपनी आपला एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन सादर करेल. 23 मे ला चीनी बाजारात सादर केल्यानंतर हा स्मार्टफोन 27 मे पासून तिथे प्री-आॅर्डर साठी उपलब्ध होईल. चर्चा अशी पण आहे की या फोन सोबत शाओमी मी बँड 3 पण सादर करणार आहे आणि एनिर्वसरी सेलिब्रेशन म्हणून कंपनी काही लकी यूजर्सना 100 मी 8 फोन गिफ्ट देईल.

The post शाओमी साजरा करत आहे आपला 8वा वर्धापन दिन, लॉन्च करणार एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन मी 8, अॅप्पल-सॅमसंग ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-celebrating-8th-anniversary-special-anniversary-edition-smartphone-mi-8-in-marathi/feed/ 0
शाओमी साजरा करत आहे आपला 8वा वर्धापनदिन, या महिन्यात सादर करेल 6.01-इंचाचा ओएलईडी डिसप्ले आणि 8जीबी रॅम वाला ‘स्पेशल’ स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-8th-anniversary-special-smartphone-mi-7-plus-along-with-mi-7-mi-band-3-might-launch-on-23-may-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-8th-anniversary-special-smartphone-mi-7-plus-along-with-mi-7-mi-band-3-might-launch-on-23-may-in-marathi/#respond Fri, 11 May 2018 15:47:19 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=428 हा फोन खुप खास असेल आणि शाओमी चा हा पहिला स्मार्टफोन असेल ज्यात 3डी फेशिअल रेक्ग्नेशन टेक्निक असेल.

The post शाओमी साजरा करत आहे आपला 8वा वर्धापनदिन, या महिन्यात सादर करेल 6.01-इंचाचा ओएलईडी डिसप्ले आणि 8जीबी रॅम वाला ‘स्पेशल’ स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या वर्षी अॅप्पल ने आयफोन चा दहावा वर्धापनदिन साजरा केला होता. ही एनिवर्सरी सेलिब्रेट करताना कंपनी ने आयफोन 10 लॉन्च केला होता ज्यामुळे संपूर्ण टेक जगात नॉच डिसप्ले चा ट्रेंड सुरू झाला. त्याचप्रमाणे यावर्षी चीन मधील अॅप्पल म्हणून ओळखली जाणारी टेक कंपनी शाओमी पण आपला 8वा वर्धापनदिन साजरा करत आहे. अॅप्पल नंतर आता शाओमी पण आपली एनिवर्सरी नवीन ‘स्पेशल’ एडिशन सह सेलिब्रेट करणार आहे. बातमी आली आहे की या महिन्यात शाओमी तिन नवीन डिवाईस टेक बाजारात सादर करणार आहे. यात मी बँड 3, मी 7 स्मार्टफोन आणि एक एनिवर्सरी स्पेशल स्मार्टफोन असेल.

शाओमी च्या बाबतीत आलेल्या हा रिपोर्ट चीनी वेबसाइट मायड्रायवर ने पब्लिश केला आहे. या रिपोर्ट नुसार शाओमी मे महिन्याच्या शेवटी आपला स्पेशल एडिशन स्मार्टफोन सादर करेल जो कंपनीच्या आठव्या वर्धापनदिना निमित्त येणार आहे. अंदाज लावला जात आहे की येणार्‍या 23 मे ला शाओमी चीन मध्ये एक ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी आपला हा स्पेशल एडिशन लॉन्च करू शकते.

विशेष म्हणजे 23 मे ला शाओमी मी 7 स्मार्टफोन लॉन्च केला जाईल या अर्थाचे अनेक लीक्स आले आहेत. त्यामुळे याच दिवशी शाओमी मी 7 स्मार्टफोन आणि मी बँड 3 पण सादर करू शकते. रिपोर्ट नुसार शाओमी चा हा एनिवर्सरी स्पेशल फोन मी 7 प्लस नावाने बाजारत येईल. हा फोन खुप खास असेल आणि शाओमी चा हा पहिला स्मार्टफोन असेल ज्यात 3डी फेशिअल रेक्ग्नेशन टेक्निक असेल.

शाओमी मी 7 प्लस बद्दल बोलले जात आहे की या फोन मध्ये 6.01-इंचाचा ओएलईडी डिसप्ले मिळू शकतो ज्या खाली अदृश्य फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. कंपनी कडून फोन मध्ये 8जीबी ची रॅम मेमरी दिली जाऊ शकते त्याचबरोबर हा फोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. पण या स्पेशल एनिवर्सरी स्मार्टफोन बद्दल शाओमी ने मौन बाळगले आहे, त्यामुळे कंपनी च्या घोषणेची वाट बघणे योग्य ठरेल.

The post शाओमी साजरा करत आहे आपला 8वा वर्धापनदिन, या महिन्यात सादर करेल 6.01-इंचाचा ओएलईडी डिसप्ले आणि 8जीबी रॅम वाला ‘स्पेशल’ स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-8th-anniversary-special-smartphone-mi-7-plus-along-with-mi-7-mi-band-3-might-launch-on-23-may-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 7 चा 6जीबी रॅम वेरिएंट आला समोर, लॉन्च च्या आधी फोटो झाले वायरल https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-7-6gb-ram-live-photos-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-7-6gb-ram-live-photos-features-specifications-in-marathi/#respond Wed, 09 May 2018 14:21:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=378 यातील एक फोटो मध्ये शाओमी मी 7 चा सेटिंग मेन्यू पण ओपन करून दाखविण्यात आला आहे, ज्यात फोन चे स्पेसिफिकेशन्स चीनी भाषेत लिहिण्यात आले आहेत.

The post शाओमी मी 7 चा 6जीबी रॅम वेरिएंट आला समोर, लॉन्च च्या आधी फोटो झाले वायरल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी शाओमी च्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन मी 7 बद्दल बातमी आली होती की कंपनी हा स्मार्टफोन येणार्‍या 23 मे ला आपल्या होम बाजारात म्हणजे चीन मध्ये लॉन्च करेल. पण कंपनी ने मी 7 च्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती दिलेली नाही परंतु लॉन्च च्या आधी आज शाओमी मी 7 चे काही लाईव फोटो इंटरनेट वर वायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्याने शाओमी च्या या शानदार फोन च्या लुक आणि डिजाईन ची माहिती मिळाली आहे सोबत मी 7 च्या स्पेसिफिकेशन ची पण माहिती मिळाली आहे.

शाओमी मी 7 चे हे लाईव फोटो चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करण्यात आले आहेत. फोटो मध्ये शाओमी मी 7 चे दोन मॉडेल दाखविण्यात आले आहेत ज्यांच्या साईज मध्ये फरक आहे. फोन च्या बॅक पॅनल वर वर्टिकल आकाराचा डुअल रियर कॅमेरा दिसत आहे जो डावीकडे आहे, तसेच फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. मी 7 चा फ्रंट पॅनल पण अॅप्पल आयफोन 10 प्रमाणे बेजल लेस आहे तसेच वरच्या बाजूस नॉच देण्यात आला आहे. फोटो वरून समोर आले आहे की शाओमी मी 7 चा रियर पॅनल कर्व्ड असेल कोपरे राउंड असतील.

यातील एक फोटो मध्ये शाओमी मी 7 चा सेटिंग मेन्यू पण ओपन करून दाखविण्यात आला आहे, ज्यात फोन चे स्पेसिफिकेशन्स चीनी भाषेत लिहिण्यात आले आहेत. या सेटिंग मध्ये सांगण्यात आले आहे की हा फोन शाओमी च्या मीयूआई 9.8.5.2 वर आधारित असेल तसेच फोन मध्ये एंडरॉयड 8.1 ओरियो देण्यात आला आहे. फोटो मधील मी 7 च्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी आहे तसेच याची इंटरनल स्टोरेज 128जीबी आहे. शाओमी मी 7 चा हा वेरिएंट 2.8गीगाहर्ट्ज आॅक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो.

शाओमी मी 7 च्या काही लीक्स बद्दल बोलायचे तर कंपनी या फोन चा एक वेरिएंट 8जीबी रॅम वर सादर करेल आणि या वेरिएंट मध्ये 256जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. लीक नुसार फोन 6.01-इंचाच्या फुलएचडी+ डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. फोन मध्ये 20-मेगापिक्सल + 12-मेगापिक्सल चा डुअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी यात 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल. तर पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी मिळू शकते. पण शाओमी मी 7 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी कंपनी च्या अधिकृत माहितीची तसेच फोन लॉन्च ची वाट बघितली जात आहे.

The post शाओमी मी 7 चा 6जीबी रॅम वेरिएंट आला समोर, लॉन्च च्या आधी फोटो झाले वायरल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-7-6gb-ram-live-photos-features-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी चा सर्वात ताकदवान स्मार्टफोन मी 7 होईल 23 मे ला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-7-might-launch-on-23-may-with-notch-display-powerful-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-7-might-launch-on-23-may-with-notch-display-powerful-specifications-in-marathi/#respond Tue, 01 May 2018 10:27:14 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=198 शाओमी मी 7 च्या लॉन्च ची ही माहिती चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर केली आहे.

The post शाओमी चा सर्वात ताकदवान स्मार्टफोन मी 7 होईल 23 मे ला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जवळपास चार महीने झाले शाओमी च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन मी 7 च्या बाबतीत लागोपाठ बातम्या लीक्स समोर येत आहेत. दरम्यान शाओमी ने अनेक फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात आणले पण मी 7 काही समोर आला नाही. पण आता असे वाटते आहे की लवकरच शाओमी फॅन्स ची प्रतीक्षा संपणार आहे. इंटरनेट वर एक पोस्ट वायरल झाली आहे ज्यात शाओमी मी 7 च्या लॉन्च ची माहिती दिली आहे. या पोस्ट नुसार मे महिन्याच्या 23 तारखेला शाओमी आपला हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस मी 7 टेक जगासमोर घेऊन येईल.

शाओमी मी 7 च्या लॉन्च ची ही माहिती चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर केली आहे. या पोस्ट मध्ये ही टीजर ईमेज दाखविण्यात आली आहे ज्यात शाओमी लोगो वाला एक फोटो आहे आणि या फोटो वर मोठा ‘7’ लिहीलेला आहे. या फोटो मध्ये 23 मे तारखेचा उल्लेख आहे. या इमेज वरून समजत आहे की शाओमी मी 7 23 मे ला अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला जाईल.

शाओमी कडून मी 7 च्या बाबतीत कोणतीही आॅफिशियल माहिती मिळाली नाही. कंपनी ने फोन लॉन्च ची कोणतीही सूचना दिली नाही आणि फोन चे स्पेसिफिकेशन्स पण सांगितले नाहीत. त्यामुळे 23 मे ला पण मी 7 लॉन्च होईल की नाही ते निश्चित नाही. पण टेक वर्ल्ड मध्ये चर्चा आहे की शाओमी मी 7 सोबत मी 7 प्लस पण कंपनी लॉन्च करू शकते.

तसेच शाओमी मी 7 बद्दल आता पर्यन्त आलेल्या लीक्स नुसार हा फोन पण अॅप्पल आयफोन 10 प्रमाणे बेजल लेस नॉच डिसप्ले सह येईल तसेच हा 6.01-इंचाच्या फुलएचडी+ डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. फोन मध्ये 6जीबी ची रॅम व 64जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल आणि हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह येईल.

फोन मध्ये 20-मेगापिक्सल + 12-मेगापिक्सल चा डुअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी यात 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल. तर पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी मिळू शकते. पण शाओमी मी 7 च्या स्पेसिफिकेशन्स साठी कंपनी च्या अधिकृत माहितीसाठी तसेच फोन लॉन्च ची वाट बघावी लागेल.
   

The post शाओमी चा सर्वात ताकदवान स्मार्टफोन मी 7 होईल 23 मे ला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-7-might-launch-on-23-may-with-notch-display-powerful-specifications-in-marathi/feed/ 0