शाओमी साजरा करत आहे आपला 8वा वर्धापन दिन, लॉन्च करणार एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन मी 8, अॅप्पल-सॅमसंग ला मिळेल टक्कर

शाओमी कंपनी टेक बाजारात इतक्या वेगाने पुढे जात आहे की काही वर्षांमध्ये मोठया कंपन्यांना पण तिने मागे टाकले आहे. भारतीय मोबाईल बाजार वर अनेक वर्ष राज्य करणार्‍या सॅमसंग ला पण शाओमी ने धक्का दिला आहे. शाओमी अस्तित्वात येऊन 8 वर्ष झाली आणि या 8 वर्षांमध्ये कंपनी ने फक्त इंडियन स्मार्टफोन बाजारात आपले राज्य स्थापन केले नाही तर अंर्तराष्ट्रीय बाजारात पण वेगाने प्रगती केली आहे. आपला 8वा वाढदिवस शाओमी खास पद्धतीने साजरा करणार आहे आणि यानिमित्ताने शाओमी आपला स्पेशल स्मार्टफोन सादर करणार आहे.

शाओमी च्या या स्मार्टफोन बद्दल आता पर्यंत फक्त लीक्स आणि गॉसिप समोर आले होते पण आता शाओमी च्या या एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन ची आॅफिशियल टीजर ईमेज पण समोर आली आहे. शाओमी ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन ची घोषणा केली आहे. शाओमी ने एक ईमेज शेयर केली आहे ज्यात मोठा ‘8’ लिहिण्यात आला आहे. शाओमी च्या या ईमेज वरून स्पष्ट झाले आहे की कंपनी आपला 8वा वर्धापनदिन स्पेशल एडिशन स्मार्टफोन सादर करेल.

शाओमी च्या 8व्या एनिर्वसरी वाल्या स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या इमेज वरून समजले आहे की हा स्मार्टफोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. या फोन मध्ये अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल त्याचबरोबर फोन मध्ये 3डी फेस स्कॅनिंग फीचर असेल. शाओमी ने कंपनी च्या एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन चे नाव सांगितले नाही पण अंदाज लावला जात आहे की हा फोन मी 8 नावाने लॉन्च केला जाईल, तर काही लीक्स मध्ये एनिर्वसरी स्पेशल एडिशन मी 7 प्लस नावाने लॉन्च केला जाण्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे येणार्‍या 23 मे ला शाओमी चीन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मध्ये कंपनी आपला एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन सादर करेल. 23 मे ला चीनी बाजारात सादर केल्यानंतर हा स्मार्टफोन 27 मे पासून तिथे प्री-आॅर्डर साठी उपलब्ध होईल. चर्चा अशी पण आहे की या फोन सोबत शाओमी मी बँड 3 पण सादर करणार आहे आणि एनिर्वसरी सेलिब्रेशन म्हणून कंपनी काही लकी यूजर्सना 100 मी 8 फोन गिफ्ट देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here