Xiaomi Redmi 7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ऑनलाइन फसवणुकीची अजून एक शिकार, अमेझॉनवरून मागवला होता Xiaomi Redmi 7, फोन न मिळताच दाखवला Delivered https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-online-fraud-fake-delivery-by-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-online-fraud-fake-delivery-by-amazon-india/#respond Tue, 03 Dec 2019 18:59:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5955 प्रकरण तेव्हा वाढले जेव्हा अमेझॉनने स्पष्ट म्हटले कि त्यांनी फोन डिलीवर केला आहे आणि ते याबाबतीत कोणतीही मदत करू शकत नाहीत.

The post ऑनलाइन फसवणुकीची अजून एक शिकार, अमेझॉनवरून मागवला होता Xiaomi Redmi 7, फोन न मिळताच दाखवला Delivered first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कालच एक बातमी समोर आली होती ज्यात ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून 27,500 रुपयांचा कॅमेरा मागवणाऱ्या व्यक्तीच्या बॉक्स मध्ये विटा डिलीवर केल्या गेल्या. ऑनलाइन फसवणुकीची शिकार हा व्यक्ती अजूनही आपल्या महाग प्रोडक्टची वाट बघत आहे, कि कधी कंपनी त्याचा कॅमेरा देईल. असेच अजून एक प्रकरण प्रकाशात आले आहे ज्यात शॉपिंग साइट अमेझॉन वरून Xiaomi Redmi 7 स्मार्टफोन मागितल्यावर तरुणाचे पैसे तर कट केले पण फोन त्याच्याकडे डिलीवरच झाला नाही. प्रकरण तेव्हा वाढले जेव्हा अमेझॉनने स्पष्ट म्हटले कि त्यांनी फोन डिलीवर केला आहे आणि ते याबाबतीत कोणतीही मदत करू शकत नाहीत.

बदलत्या काळात आणि ट्रेंडसह चालताना काहीजण आपल्या कमाईचा काही भाग फक्त इंटरनेट कनेक्शनद्वारे असे लोकांना देतात ज्यांच्यबद्दल त्यांना माहित नसते. पैसे देऊन सामान्य माणूस आपला हक्क मिळण्याची वाट बघत असतो परंतु ना त्याचे सामान मिळते ना त्याचे पैसे. अशीच फसवणूक झाली आहे हरियाणा मधील हिसार जिल्ह्यातील प्रवीण कुमार सोबत.

Xiaomi Redmi 7 विकत घेणे पडले महाग

प्रवीण कुमार याने Xiaomi चा लो बजेट स्मार्टफोन Redmi 7 अमेझॉन वरून विकत घेतला होता. Xiaomi Redmi 7 च्या सेल मध्ये प्रवीणने प्रीपेड पेमेंट करून अमेझॉन वर फोन ऑर्डर केला होता. फोन विकत घेताना प्रवीणने 5,399 रुपये दिले होते. पेमेंट झाल्यावर अमेझॉन कडून ऑर्डर यशस्वी झाल्याचा मेसेज आला आणि डिलीवरीची तारीख सांगण्यात आली. प्रवीण कुमारने Xiaomi Redmi 7 चा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 3 ऑक्टोबरला ऑर्डर केला होता जो 9 ऑक्टोबरला डिलीवरी होणार होता.

एक दिवस आधीच आला ‘Phone Delivered’ चा मेसेज

नवीन Xiaomi Redmi 7 फोन 9 ऑक्टोबरला डिलीवर होणार होता, पण एक दिवस आधीच म्हणजे 8 ऑक्टोबरला प्रवीणला ईमेल आला कि, ‘तुमचा फोन यशस्वीरीत्या डिलीवर झाला आहे.’ हा मेसेज पाहून प्रवीणला धक्का बसला आणि त्याने अमेझॉन इंडियाच्या कस्टमर केयर नंबर वर कॉल केला. अमेझॉनने सांगितले कि, ‘हा मेल चुकून पाठवला गेला आहे. प्रतीक्षा करा, तुमचा फोन 10 ऑक्टोबरला डिलीवर केला जाईल.’

मेल चुकून सेंड झालेला सांगून अमेझॉनने दोन दिवसानंतर फोन डिलीवर करणार असल्याचे सांगितले. पण जेव्हा सांगितलेल्या तारखेला पण Xiaomi Redmi 7 फोन आला नाही तेव्हा ग्राहकाने पुन्हा अमेझॉनला फोन केला आणि तेव्हा ते म्हणाले कि, ’14 ऑक्टोबर पर्यंत प्रतीक्षा करा, आम्ही प्रकरणाची चौकशी करू.’ पण 14 ऑक्टोबरला अमेझॉनने काबुल केले कि प्रवीणचा फोन ‘हरवला’ आहे तसेच कंपनी 18 ऑक्टोबर पर्यंत त्याचे पैसे परत देईल.

मिळाली फक्त तारीख पे तारीख

फोन ऑर्डर केल्यानंतर दोन आठवडे होऊनही जेव्हा 18 ऑक्टोबरला पैसे परत मिळाले नाहीत तेव्हा प्रवीणने अमेझॉनला पुन्हा फोन लावला. यावेळी त्याला सांगण्यात आले कि, ‘तुम्हाला चुकीची माहिती देण्यात आली आहे, तुमचे पैसे 23 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये क्रेडिट होतील.’ पैशांची वाट बघण्यात 23 ऑक्टोबरचा दिवस गेला आणि मग प्रवीणने 24 ऑक्टोबरला पुन्हा अमेझॉनला कॉल केला. पण यावेळी अमेझॉनचे उत्तर होते कि, ‘तुमचा फोन 8 ऑक्टोबरलाच डिलीवर केला गेला आहे.’

अमेझॉनने प्रवीण कुमारला उद्धटपणे उत्तर दिले कि तुमचा फोन आम्ही डिलीवर केला आहे आणि आमच्याकडे डिलीवर डिटेल्स सोबतच तुमची सही पण आहे. प्रवीणला पहिला झटका या गोष्टीचा लागला कि त्याचे पैसे पाण्यात गेले आहेत, तर दुसरा झटका फोन न मिळता अमेझॉनकडे त्याची सही जाण्याचा लागला. तसेच जेव्हा अमेझॉनला सही दाखवण्यास सांगण्यात आले तेच कंपनीला स्पष्ट नकार दिला.

Xiaomi भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रांड आहे आणि Amazon इंडियन ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी. Xiaomi स्मार्टफोन डिलीवरीच्या नावावर कंपनीच्या नाकाखाली रॅकेट चालू आहे, याची माहिती क्वचितच स्वतः Xiaomi ला असेल. पण Amazon ने असे प्रकरण गांभीर्याने न घेणे कंपनीप्रति नकरात्मक विचार करण्यास भाग पाडते तसेच ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली होत असलेल्या अश्या फसवणुकीमुळे सामान्यांच्या खिश्याला कात्री लागते. Xiaomi Redmi 7 ऑर्डर करणाऱ्या प्रवीण कुमारने Amazon द्वारा करण्यात आलेल्या या फसवणुकीच्या विरोधात ग्राहक न्यायालयात केस दाखल केली आहे.

प्रथमदर्शनी हे प्रकरण स्थानिक गडबडीचे वाटते. पण तरीही या प्रकरणी अमेझॉनच्या उत्तराची वाट बघितली जात आहे, जे मिळताच दुसरी बाजू पण अपडेट केली जाईल.

The post ऑनलाइन फसवणुकीची अजून एक शिकार, अमेझॉनवरून मागवला होता Xiaomi Redmi 7, फोन न मिळताच दाखवला Delivered first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-online-fraud-fake-delivery-by-amazon-india/feed/ 0
आता Redmi 7 साठी बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, आज पासून मिळेल ओपन सेल मध्ये https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-available-on-open-sale-now/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-available-on-open-sale-now/#respond Mon, 20 May 2019 13:27:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4347 डिवाइसचा 2जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 7,999 रुपये आणि 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये मिळेल.

The post आता Redmi 7 साठी बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, आज पासून मिळेल ओपन सेल मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात शाओमीने आपला नवीन बजेट रेडमी सीरीज स्मार्टफोन Redmi 7 लॉन्च केला होता. लॉन्चच्या दिवसापासूनच डिवाइस जवळपास प्रत्त्येक आठवड्यात फ्लॅश सेल साठी अमेझॉन इंडिया, मी.कॉम आणि मी होम स्टोर वर येत होता. आता एक महिन्यांनंतर डिवाइस ओपन सेल साठी सादर करण्यात आला आहे.

Xiaomi फॅन्स रंगांच्या बाबतीत चूजी असतात आणि म्हणूनच शाओमी आपले स्मार्टफोन्स अनेक आर्कषक रंगात लॉन्च करते. Redmi 7 को इक्लिप्स ब्लॅक, लुनार रेड आणि कॉमेट ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल. तसेच डिवाइसचा 2जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 7,999 रुपये आणि 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये मिळेल.

स्पेसिपिकेशन्स पाहता Redmi 7 डॉटनॉच डिस्प्ले वर सादर करण्यात आले आहेत. या फोन मध्ये 2.5डी कर्व्ड ग्लास कोटेड 19:9 आस्पेक्ट रेशियो वाली 6.26-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शन साठी शाओमी ने आपला हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला आहे.

Redmi 7 शाओमीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केले आहेत जे मीयूआई 10 आधारित आहेत. हे दोन्ही फोन 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतात. तसेच ग्राफिक्स साठी Redmi 7 मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू देण्यात आला आहे.

Redmi 7 चा सर्वात छोटा वेरिएंट 2जीबी रॅम मेमरी सह 32जीबी इंटरनल मेमरी सपोर्ट करतो. तर रेडमी 7 च्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

शाओमीने Redmi 7 Redmi 7 स्मार्टफोन डुअल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला आहे. फोन एआई टेक्नॉलॉजी सह येतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये सेकेंडरी रियर कॅमेरा 2-मेगापिक्सलचा आहे जो डेफ्थ सेंसिंगला सपोर्ट करतो.

Redmi 7 फोन मध्ये सिक्योरिटी आणि फोन अनलॉकिंग साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच सोबत फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो. तसेच फोन डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबत ब्लूटूथ, वाईफाई व आईआर ब्लास्टर सारख्या फीचर्स सह येतो.

शाओमी ने आपल्या यूजर्सची काळजी घेत Redmi 7 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी दिली आहे. पण कंपनी ने आपल्या नवीन फोन्स मध्ये फास्ट चार्जिंग दिली नाही. त्यामुळे फोनची हि पावरफुल बॅटरी माइक्रो यूएसबीने चार्ज कारवी लागेल.

The post आता Redmi 7 साठी बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, आज पासून मिळेल ओपन सेल मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-available-on-open-sale-now/feed/ 0
शाओमी रेडमी 7 लॉन्च, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह शानदार स्टाईल व दमदार स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-officially-launched-feature-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-officially-launched-feature-price-specifications/#respond Mon, 18 Mar 2019 12:06:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3883 शाओमी ने रेडमी 7 सध्या चीनी बाजारात लॉन्च केला आहे जो येत्या काळात भारतासहित जगभरातील मार्केट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमी रेडमी 7 लॉन्च, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह शानदार स्टाईल व दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने काही दिवसांपूर्वी इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला होता. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात हिट झाले आहेत. विशेष म्हणजे भारताआधी रेडमी नोट 7 चीन मध्ये लॉन्च केला गेला होता जो यशाचे विक्रम करून भारतात आला होता. आज शाओमी ने अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला अजून एक नवीन प्रोडक्ट सादर करत रेडमी 7 आणला आहे. शाओमी ने रेडमी 7 सध्या चीनी बाजारात लॉन्च केला आहे जो येत्या काळात भारतासहित जगभरातील मार्केट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

शाओमी रेडमी 7 चा लुक
रेडमी 7 पण शाओमी ने रेडमी नोट 7 प्रमाणे डॉट-ड्रॉप नॉच वर सादर केला आहे. फोनच्या तिन्ही कडांवर बारीक बेजल्स दिसत वाईट तर खालच्या बाजूला मोठा बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेवर नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आहे. रेडमी 7 च्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्सना गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट करण्यात आले आहे. बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये ​डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्याखाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. रेडमी 7 च्या बॅक पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. यूएसबी पोर्ट खालच्या पॅनल वर दिला जाईल.

शाओमी रेडमी 7 चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी 7 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे जो 1520 × 720 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.26-इंचाच्या एचडीप्लस टीएफटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शन साठी या फोन मध्ये कोर्निंग गोरिल्ला 5 चा वापर करण्यात आले आहे. रेडमी 7 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 सह बाजारात आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू देण्यात आला आहे.

एक्सक्लूसिव: 2019 मध्ये वीवो करत आहे मोठा प्लान, वाय3, वाय5, एस1 आणि आईक्यू सहित अनके नवीन डिवाइस होतील लॉन्च

चीन मध्ये रेडमी 7 तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यात 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी, 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या तिन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रेडमी 7 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी रेडमी 7 च्या नॉच मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

रेडमी 7 मध्ये 4जी एलटीई व डुअल सिम तसेच अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. शाओमीने रेडमी 7 3.5एमएम जॅक सह बाजारात आणला आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. चीनी बाजारात हा फोन येत्या 26 मार्च पासून ब्लू, रेड आणि ब्लॅक कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

रेडमी 7 ची किंमत
2जीबी रॅम / 16जीबी मेमरी = 699 युआन (जवळपास 7,150 रुपये)
3जीबी रॅम / 32जीबी मेमरी = 799 युआन (जवळपास 8,200 रुपये)
4जीबी रॅम / 64जीबी मेमरी = 999 युआन (जवळपास 10,200 रुपये)

रेडमी नोट 7 प्रो चाइना लॉन्च
रेडमी 7 सोबत शाओमी ने चीन मध्ये रेडमी नोट 7 प्रो पण लॉन्च केला आहे. चीन मध्ये हा फोन 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डॉट-नॉच वर लॉन्च केला आहे. चीन मध्ये हा फोन 6जीबी रॅम/128जीबी मेमरी वर लॉन्च झाला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर आणि 5-मेगापिक्सल सेकेंडरी डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post शाओमी रेडमी 7 लॉन्च, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह शानदार स्टाईल व दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-officially-launched-feature-price-specifications/feed/ 0
शाओमीचा स्वस्तातला फोन रेडमी 7, 18 मार्चला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-to-launch-on-18-march-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-to-launch-on-18-march-specifications-price/#respond Tue, 12 Mar 2019 14:24:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3840 आशा आहे कि चीन मध्ये हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल.

The post शाओमीचा स्वस्तातला फोन रेडमी 7, 18 मार्चला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी बद्दल आधीच समजले आहेत कि कंपनी आपल्या रेडमी सीरीजच्या आगामी स्मार्टफोन रेडमी 7 वर काम करत आहे. रेडमी नोट 7 च्या यशानंतर आता रेडमी 7 च्या लॉन्चची वाट बघितली जात आहे. रेडमी 7 बद्दल आता अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनचा लुक, फीचर आणि डिजाईन बद्दल बरीच माहिती मिळाली आहे. तसेच आता रेडमी 7 संबंधित अजून एक ताजा माहिती समोर आली ज्यात फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा झाला आहे. हा खुलासा इतर कोणी केला नसून स्वतः रेडमीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. रेडमी 7 च्या लॉन्च डेटची माहिती देत ब्रँडच्या जीएम नी सांगितले कि येत्या 18 मार्चला रेडमी 7 जागतिक मंचावर लॉन्च केला जाईल.

रेडमी 7 लॉन्च डिटेल
शाओमी कंपनीच्या रेडमी ब्रँडच्या जनरल मॅनेजर लू वेईबिंग ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून रेडमी 7 च्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. लू ने वेईबो वर रेडमी 7 चा लॉन्च पोस्टर अधिकृतपणे शेयर केला आहे. या पोस्टर मध्ये रेडमी 7 च्या फोटो सोबत 18 मार्चची लॉन्च डेट पण लिहिण्यात आली आहे. या पोस्ट वरून स्पष्ट झाले आहे कि 18 मार्चला रेडमी 7 चीनी मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच रेडमी 7 च्या इंडिया लॉन्च मध्ये थोडा वेळ लागू शकतो. आशा आहे कि चीन मध्ये हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल.

रेडमी 7 डिजाईन
रेडमीचे जनरल मॅनेजर लू वेईबिंग ने आपल्या पोस्ट मधून रेडमी 7 ची लॉन्च डेट सांगितलीच आहे सोबत फोनचा फोटो शेयर करत याच्या लुक आणि डिजाईनची माहिती पण सार्वजनिक केली आहे. हा फोन रेडमी नोट 7 प्रमाणे डॉट-ड्रॉप नॉच सह सादर केला जाईल. फोनच्या तुम्ही कडांवर बारीक बेजल्स दिसत आहेत तर खालच्या बाजूला अपेक्षेप्रमाणे मोठी चीन आहे. डिस्प्लेच्या वर नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आहे.

रेडमी 7 चा बॅक पॅनल शाइनी दिसत आहे ज्यावर दुसऱ्या फोनची सावली दिसत आहे. बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये ​डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्याच्या खाली फ्लॅश लाईट आहे. रेडमी 7 च्या बॅक पॅनल वरच सेंटर मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आले आहेत. तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. यूएसबी पोर्ट फोनच्या खालच्या पॅनल वर दिला जाईल.

रेडमी 7 स्पेसिफिकेशन्स
शाओमीने रेडमी 7 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण समोर आलेल्या लीक्सनुसार हा फोन 6.26-इंचाच्या एचडीप्लस टीएफटी डिस्प्ले वर सादर केला जाईल. रेडमी 7 एंडरॉयड ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 सह बाजारात येईल. तसेच फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टा-कोर प्रोसेसर मिळेल सोबतच हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालेल.

समोर आलेल्या लीक्सनुसार रेडमी 7 तीन वेरिंएट्स मध्ये लॉन्च केला जाईल. ज्यात 2जीबी रॅम, 3जीबी रॅम आणि 4जीबी रॅम सह 16जीबी मेमरी, 32जीबी मेमरी आणि 64जीबी की मेमरी मिळेल. लीकनुसार फोटोग्राफी साठी रेडमी 7 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा मिळू शकतो.

रेडमी 7 मध्ये 3.5एमएम जॅक दिसत आहे जो फोनच्या वरच्या पॅनल वर आहे. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत रेडमी 7 मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल. विशेष म्हणजे शाओमीने अजूनतरी रेडमी 7 च्या लॉन्च डेट व्यतिरिक्त इतर कोणतीही आफिशियल माहिती दिली नाही. त्यामुळे समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स वर 18 मार्च पर्यंत विश्वास ठेवता येणार नाही.

सोर्स

The post शाओमीचा स्वस्तातला फोन रेडमी 7, 18 मार्चला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-to-launch-on-18-march-specifications-price/feed/ 0
शाओमी घेऊन येत आहे अजून एक स्वस्त फोन रेडमी 7, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-listed-on-tenaa-specifications-feature-full-detail-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-listed-on-tenaa-specifications-feature-full-detail-in-marathi/#respond Tue, 05 Mar 2019 13:18:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3772 टेना नुसार रेडमी 7 ब्लॅक, रेड, ब्लू, पिंक, सफेद, ग्रीन, पर्पल आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो.

The post शाओमी घेऊन येत आहे अजून एक स्वस्त फोन रेडमी 7, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनची ऍप्पल म्हणून ओळखली जाणाऱ्या शाओमी ने अलीकडेच भारतात आपली रेडमी नोट सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो लॉन्च केले आहेत. यातील रेडमी नोट 7 प्रो जगात पहिल्यांदा भारतातच लॉन्च केला गेला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अजून भारतात सेल साठी उपलब्ध पण झाले अहित इतक्यात शाओमीच्या अजून एका रेडमी फोनची माहिती समोर आली आहे. चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर शाओमीचा रेडमी 7 स्मार्टफोन दिसला आहे. ज्यावरून बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन पण लवकरच टेक मंचावर येईल.

शाओमी रेडमी 7​ ची टेना लिस्टिंग
चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर शाओमी रेडमी 7 एम1810एफ6एलई मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये रेडमी 7 चा डिस्प्ले आणि डिजाईन संबंधीत आकडे शेयर केले गेले आहेत. टेना लिस्टिंग नुसार रेडमी 7 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.26-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. टेना वर सांगण्यात आले आहे कि रेडमी 7 चे डायमेंशन 158.6एमएम x 76.4एमएम x 8.9एमएम असतील तसेच फोनचे वजन 180ग्राम असेल. टेना नुसार रेडमी 7 ब्लॅक, रेड, ब्लू, पिंक, सफेद, ग्रीन, पर्पल आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो.

32एमपी सेल्फी कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह येईल सॅमसंग गॅलेक्सी ए60 स्मार्टफोन

शाओमी रेडमी 7 चे स्पेसिफिकेशन्स
टेना व्यतिरिक्त इतर अनेक लीक्स मध्ये रेडमी 7 चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार रेडमी 7 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल तसेच हा फोन रेग्यूलर नॉचला सपोर्ट करेल. लीक्स नुसार रेडमी 7 तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. या वेरिएंट्स मध्ये 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी, 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी मिळू शकते. या तिन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येईल.

लीक्स नुसार रेडमी 7 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात प्राइमरी कॅमेरा सेंसर 12-मेगापिक्सलचा असेल. तसेच सेल्फी साठी रेडमी 7 मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीक नुसार रेडमी 7 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल तसेच हा फोन आईआर ब्लास्टरला पण सपोर्ट करेल. चर्चा अशी आहे कि रेडमी 7 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. पण जोपर्यंत शाओमी रेडमी 7 बद्दल एखादी घोषणा करत नाही तोपर्यंत उपरोक्त स्पेसिफिकेशन्स म्हणजे फक्त लीक आहे.

रेडमी नोट 7 व नोट 7 प्रो
जाता जाता तुम्हाला भारतात लॉन्च झालेल्या रेडमी नोट 7 आणि नोट 7 प्रो च्या किंमती आणि सेल संबंधित माहिती पण देतो. रेडमी नोट 7 उद्या म्हणजे 6 मार्च पासून भारतात आपल्या पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध होणार आहे. तसेच रेडमी नोट 7 प्रो 13 मार्च पासून विकत घेता येईल. किंमत पाहता रेडमी नोट 7 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तसेच 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तर रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तसेच 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

वाया : रिपोर्ट

The post शाओमी घेऊन येत आहे अजून एक स्वस्त फोन रेडमी 7, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-listed-on-tenaa-specifications-feature-full-detail-in-marathi/feed/ 0