ऑनलाइन फसवणुकीची अजून एक शिकार, अमेझॉनवरून मागवला होता Xiaomi Redmi 7, फोन न मिळताच दाखवला Delivered

image courtesy: News18

कालच एक बातमी समोर आली होती ज्यात ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून 27,500 रुपयांचा कॅमेरा मागवणाऱ्या व्यक्तीच्या बॉक्स मध्ये विटा डिलीवर केल्या गेल्या. ऑनलाइन फसवणुकीची शिकार हा व्यक्ती अजूनही आपल्या महाग प्रोडक्टची वाट बघत आहे, कि कधी कंपनी त्याचा कॅमेरा देईल. असेच अजून एक प्रकरण प्रकाशात आले आहे ज्यात शॉपिंग साइट अमेझॉन वरून Xiaomi Redmi 7 स्मार्टफोन मागितल्यावर तरुणाचे पैसे तर कट केले पण फोन त्याच्याकडे डिलीवरच झाला नाही. प्रकरण तेव्हा वाढले जेव्हा अमेझॉनने स्पष्ट म्हटले कि त्यांनी फोन डिलीवर केला आहे आणि ते याबाबतीत कोणतीही मदत करू शकत नाहीत.

बदलत्या काळात आणि ट्रेंडसह चालताना काहीजण आपल्या कमाईचा काही भाग फक्त इंटरनेट कनेक्शनद्वारे असे लोकांना देतात ज्यांच्यबद्दल त्यांना माहित नसते. पैसे देऊन सामान्य माणूस आपला हक्क मिळण्याची वाट बघत असतो परंतु ना त्याचे सामान मिळते ना त्याचे पैसे. अशीच फसवणूक झाली आहे हरियाणा मधील हिसार जिल्ह्यातील प्रवीण कुमार सोबत.

Xiaomi Redmi 7 विकत घेणे पडले महाग

प्रवीण कुमार याने Xiaomi चा लो बजेट स्मार्टफोन Redmi 7 अमेझॉन वरून विकत घेतला होता. Xiaomi Redmi 7 च्या सेल मध्ये प्रवीणने प्रीपेड पेमेंट करून अमेझॉन वर फोन ऑर्डर केला होता. फोन विकत घेताना प्रवीणने 5,399 रुपये दिले होते. पेमेंट झाल्यावर अमेझॉन कडून ऑर्डर यशस्वी झाल्याचा मेसेज आला आणि डिलीवरीची तारीख सांगण्यात आली. प्रवीण कुमारने Xiaomi Redmi 7 चा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 3 ऑक्टोबरला ऑर्डर केला होता जो 9 ऑक्टोबरला डिलीवरी होणार होता.

एक दिवस आधीच आला ‘Phone Delivered’ चा मेसेज

नवीन Xiaomi Redmi 7 फोन 9 ऑक्टोबरला डिलीवर होणार होता, पण एक दिवस आधीच म्हणजे 8 ऑक्टोबरला प्रवीणला ईमेल आला कि, ‘तुमचा फोन यशस्वीरीत्या डिलीवर झाला आहे.’ हा मेसेज पाहून प्रवीणला धक्का बसला आणि त्याने अमेझॉन इंडियाच्या कस्टमर केयर नंबर वर कॉल केला. अमेझॉनने सांगितले कि, ‘हा मेल चुकून पाठवला गेला आहे. प्रतीक्षा करा, तुमचा फोन 10 ऑक्टोबरला डिलीवर केला जाईल.’

मेल चुकून सेंड झालेला सांगून अमेझॉनने दोन दिवसानंतर फोन डिलीवर करणार असल्याचे सांगितले. पण जेव्हा सांगितलेल्या तारखेला पण Xiaomi Redmi 7 फोन आला नाही तेव्हा ग्राहकाने पुन्हा अमेझॉनला फोन केला आणि तेव्हा ते म्हणाले कि, ’14 ऑक्टोबर पर्यंत प्रतीक्षा करा, आम्ही प्रकरणाची चौकशी करू.’ पण 14 ऑक्टोबरला अमेझॉनने काबुल केले कि प्रवीणचा फोन ‘हरवला’ आहे तसेच कंपनी 18 ऑक्टोबर पर्यंत त्याचे पैसे परत देईल.

मिळाली फक्त तारीख पे तारीख

फोन ऑर्डर केल्यानंतर दोन आठवडे होऊनही जेव्हा 18 ऑक्टोबरला पैसे परत मिळाले नाहीत तेव्हा प्रवीणने अमेझॉनला पुन्हा फोन लावला. यावेळी त्याला सांगण्यात आले कि, ‘तुम्हाला चुकीची माहिती देण्यात आली आहे, तुमचे पैसे 23 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये क्रेडिट होतील.’ पैशांची वाट बघण्यात 23 ऑक्टोबरचा दिवस गेला आणि मग प्रवीणने 24 ऑक्टोबरला पुन्हा अमेझॉनला कॉल केला. पण यावेळी अमेझॉनचे उत्तर होते कि, ‘तुमचा फोन 8 ऑक्टोबरलाच डिलीवर केला गेला आहे.’

अमेझॉनने प्रवीण कुमारला उद्धटपणे उत्तर दिले कि तुमचा फोन आम्ही डिलीवर केला आहे आणि आमच्याकडे डिलीवर डिटेल्स सोबतच तुमची सही पण आहे. प्रवीणला पहिला झटका या गोष्टीचा लागला कि त्याचे पैसे पाण्यात गेले आहेत, तर दुसरा झटका फोन न मिळता अमेझॉनकडे त्याची सही जाण्याचा लागला. तसेच जेव्हा अमेझॉनला सही दाखवण्यास सांगण्यात आले तेच कंपनीला स्पष्ट नकार दिला.

Xiaomi भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रांड आहे आणि Amazon इंडियन ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी. Xiaomi स्मार्टफोन डिलीवरीच्या नावावर कंपनीच्या नाकाखाली रॅकेट चालू आहे, याची माहिती क्वचितच स्वतः Xiaomi ला असेल. पण Amazon ने असे प्रकरण गांभीर्याने न घेणे कंपनीप्रति नकरात्मक विचार करण्यास भाग पाडते तसेच ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली होत असलेल्या अश्या फसवणुकीमुळे सामान्यांच्या खिश्याला कात्री लागते. Xiaomi Redmi 7 ऑर्डर करणाऱ्या प्रवीण कुमारने Amazon द्वारा करण्यात आलेल्या या फसवणुकीच्या विरोधात ग्राहक न्यायालयात केस दाखल केली आहे.

प्रथमदर्शनी हे प्रकरण स्थानिक गडबडीचे वाटते. पण तरीही या प्रकरणी अमेझॉनच्या उत्तराची वाट बघितली जात आहे, जे मिळताच दुसरी बाजू पण अपडेट केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here