एक्सक्लूसिव: 2019 मध्ये वीवो करत आहे मोठा प्लान, वाय3, वाय5, एस1 आणि आईक्यू सहित अनके नवीन डिवाइस होतील लॉन्च

भारतीय मोबाईल बाजार आधीपासून खूप स्पर्धात्मक राहिला आहे. इथे थोड्या रुपयांच्या फरकाने मोठा परिणाम होतो आणि याच कारणामुळे शाओमी ने सुरवातीपासूनच किंमतीला माध्यम बनवले आणि काही वर्षांतच नंबर एक स्मार्टफोन निर्माता म्हणून समोर आली. शाओमी कडून शिकत सॅमसंग ने पण आपली रणनीति बदलली आणि 2019 मध्ये कंपनी ने ‘गॅलेक्सी एम’ सीरीज आणि ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मध्ये दमदार फोन सादर केले. शाओमी आणि सॅमसंगच्या बदलांमुळे इतर निर्मात्यांना पण याकडे लक्ष दयावे लागले आहे. यात नवीन नाव वीवोचे आहे. येत्या काही महिन्यांत वीवो पूर्णपणे बदलून जाईल. अलीकडेच तुमच्या लक्षात आले असेल कि कंपनी ने आपला लोगो बदलला आहे पण आता संपूर्ण प्रोडक्ट पोर्टफोलियो बदलणार आहे. वीवो भारतात नवीन वाय, एस, झेड आणि आईक्यू सीरीजचे फोन सादर करणार आहे. 91मोबाईल्सला याची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे ज्यात कंपनीचा 2019 च्या रोडमॅप समजला आहे. आम्हाला हि माहिती वीवोच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

कंपनीचा प्लान काय आहे?

भारतात सॅमसंगने नंबर एक स्मार्टफोन निर्मात्याचे स्थान गमावले आहे. पंरतु आता कंपनी पूर्ण जोर लावत आहे पुन्हा ते मिळवण्यासाठी. याचमुळे सॅमसंग ने गॅलेक्सी एम आणि गॅलेक्सी ए सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च केले आहेत. परंतु आता कंपनीला नंबर 2 वर पण आव्हान मिळणार आहे. याबाबत वीवोच्या अधिकाऱ्यांनी म्हटले कि “वीवो 2019 मध्ये सर्वात जास्त सॅमसंगशी भिडणार आहे. प्रत्येक सेग्मेंट मध्ये कंपनी ने सॅमसंगला आव्हान देण्याचे ठरवले आहे. कमी बजेट मध्ये वाय3 फोन असतील. तर मध्यम रेंज मध्ये वाय5 आणि झेड सीरीज द्वारे वीवो सॅमसंगला टक्कर देणार आहे. आणि वरच्या सेग्मेंट मध्ये कंपनी सॅमसंग सोबतच वनप्लस समोर पण उभी राहणार आहे. यासाठी आईक्यू फोन भारतात लॉन्च केला जाईल.”

प्रोडक्ट कसे असतील?

त्यांनी सांगितले कि “यावेळी वीवो ऑफलाइन ते ऑनलाइन प्रत्येक सेग्मेंट मध्ये येणार आहे. ऑनलाइन मध्ये मध्यम बजेट सेग्मेंट मध्ये कंपनी येणार आहे आणि याअंतर्गत एस1 मॉडेल लॉन्च केला जाईल. तर वाय3 आणि वाय5 सारखे मॉडेल ऑफलाइन स्टोर साठी असतील. पण झेड सीरीज बद्दल स्पष्ट माहिती मिळाली नाही. आईक्यू मॉडेल मध्ये प्रीमियम फोन असतील.”

एस1 मॉडेल कसा असेल

अलीकडेच वीवो एस1 बद्दल एक लीक आला होता ज्यात दावा करण्यात आला आहे कि या फोनचे स्पेसिफिकेशन वीवो वी15 सारखे आहेत आणि भारतात पण या फोन बद्दल अशीच आशा केली जात आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार एस1 ची किंमत खूप अग्रेसिव असेल. भारतात हा फोन 15,000 पेक्षा खालील बजेट मध्ये सादर केला जाईल आणि हा ऑनलाइन एक्सक्लूसिव असू शकतो.

वीवो वाय3 आणि वाय5

वीवो वाय3 आणि वाय5 कंपनी थेट सॅमसंग गॅलेक्सी एम आणि गॅलेक्सी ए सीरीज समोर ठेवणार आहे. सुरवातीला दोन्ही मॉडेलचे दोन दोन मेमरी वेरियंट सादर केले जातील. प्राप्त माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी वाय3 कंपनी 10,000 रुपयांपासुन 15,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च करणार आहे तर वाय5 थोडा महाग असेल. वीवो वाय5 ची किंमत 15,000 ते 20,000 रूपांच्या दरम्यान असेल. स्पेसिफिकेशन पाट याबद्दल जास्त माहिती नाही पण आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार वीवोच्या या फोन्स मध्ये ट्रिपल कॅमेरा मिळू शकतो. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कदाचित कंपनी भारतात हा आईपीएल दरम्यान लॉन्च करेल.

गेमिंग फोन आईक्यू

अलीकडेच चीन मध्ये वीवो ने आपला सब ब्रँड आईक्यू सादर केला आहे. याअंतर्गत कंपनी ने दमदार स्पेसिफिकेशन असलेले गेमिंग फोन सादर केले आहेत. आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आईक्यू फोन भारतात पण लॉन्च केला जाईल. हा फोन मे च्या शेवटी किंवा जून मध्ये भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. राहिला प्रश्न किंमतीचा तर भारतात आईक्यू मॉडेलची सुरवात 30,000 रुपयांपासून होऊ शकते.

जुन्या मॉडेलचे काय होईल

आम्ही सांगितल्याप्रमाणे कंपनी संपूर्ण पोर्टफोलियो बदलणार आहे त्यामुळे जुने मॉडेल किंवा जे मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत त्यांची किंमत कमी करणार आहे. तुम्ही लक्ष दिलेच असेल कि अलीकडेच वाय95 आणि वाय83 जैसे मॉडेलच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. परंतु आम्हाला जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार येत्या काही दिवसांत इतर मॉडेलची किंमत पण ड्रॉप होईल आणि कंपनी भारी डिस्काउंट देऊन हे मॉडेल बंद करेल. अलीकडेच आम्हाला माहिती मिळाली आहे कि वीवो वी11 प्रो चे प्रोडक्शन कंपनी ने बंद केले आहे आणि काही राज्यांत स्टोर्स वर आता हा फोन उपलब्ध नाही.

सोर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here