Xiaomi Redmi 7A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 06 Aug 2019 13:18:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 7A ऑफलाईन स्टोर्स वर झाला सेल साठी उपलब्ध, हि आहे नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-offline-sale-price-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-offline-sale-price-india/#respond Tue, 06 Aug 2019 13:18:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4983 Xiaomi फॅन्स आता ब्रँडचा स्वस्त स्मार्टफोन Redmi 7A कधीही जवळच्या रिटेल स्टोर्स वरून विकत घेऊ शकतील.

The post Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 7A ऑफलाईन स्टोर्स वर झाला सेल साठी उपलब्ध, हि आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi बद्दल कालच बातमी आली होती थी कि कंपनीची लेटेस्ट फ्लॅगशिप सीरीज Redmi K20 Pro आता भारतात ओपन सेल साठी उपलब्ध होईल. हि सीरीज आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. आणि आता Xiaomi ने आपला अजून एक हिट स्मार्टफोन ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध केला आहे. Xiaomi फॅन्स आता ब्रँडचा स्वस्त स्मार्टफोन Redmi 7A कधीही जवळच्या रिटेल स्टोर्स वरून विकत घेऊ शकतील.

अशी असेल किंमत

Xiaomi Redmi 7A भारतात दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च झाला होता. फोनचा 2जीबी रॅम + 16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपये आणि 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 6,199 रुपयांमध्ये उतरवण्यात आला होता. हे दोन्ही वेरिंएट ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर त्याच किंमतीत विकले जातील पण ऑफलाईन सेल मध्ये फोनच्या 16जीबी मेमरी वेरिएंट साठी 6,199 रुपये आणि 32जीबी स्टोरेज वेरिएंट साठी 6,399 रुपये द्यावे लागतील.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Redmi 7A कंपनीने 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे ज्यात कोणतीही नॉच नाही. स्पेसिफिकेशन पाहता यात 5.45-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 18:9 आहे. तसेच फोन मध्ये 2.0 गीगार्ट्ज क्वॉलकॉम 439 एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच डिवाइस मध्ये 2जीबी रॅम सह 16जीबी आणि 2जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट सादर करण्यात आला आहे. यूजर फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवू शकतात.

तसेच फोटोग्राफी साठी रेडमी 7ए च्या मागे 12 मेगापिक्सलचा सोनी IMX 486 सेंसर आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे जो AI फेस अनलॉक सपॉर्ट सह येतो. ऑपरेटिंग सिस्टम बद्दल बोलायचे तर यात अँड्रॉइड 9 पाई वर बेस्ड MIUI 10 ओएस देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन मॅट ब्लॅक, मॅट ब्लू आणि मॅट गोल्ड कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. तसेच फोन मध्ये वायरलेस एफएम रेडियो सपोर्ट देण्यात आला आहे. फोन स्प्लॅश प्रूफ आहे, ज्याचा अर्थ असा कि पाण्याच्या शिंतोड्यांचा यावर काहीच परिणाम होणार नाही.

Redmi K20 सीरीज

Redmi K20 सीरीज पाहता Redmi K20 Pro चा 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपये आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तर Redmi K20 च्या 6GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच ऑफलाईन किंमत पाहता रिटेल स्टोर्स वर Redmi K20 के 6GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट 22,499 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज वाले वेरिएंट 24,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर Redmi K20 Pro चा 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट दुकानांवर 28,499 रुपयांमध्ये मिळेल.

शाओमी रेडमी 7ए वीडियो

The post Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 7A ऑफलाईन स्टोर्स वर झाला सेल साठी उपलब्ध, हि आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-offline-sale-price-india/feed/ 0
Xiaomi Redmi 7A कि Realme C2, कोणता फोन आवडला तुम्हाला https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-vs-realme-c2-price-specification-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-vs-realme-c2-price-specification-and-features/#respond Tue, 09 Jul 2019 14:00:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4761 एका छोट्याश्या कम्पॅरिजन आपण दोन्ही फोन तपासून बघूया कि डिजाइन आणि स्पेसिफिकेशनच्या आधारावर कोण आहे बेस्ट.

The post Xiaomi Redmi 7A कि Realme C2, कोणता फोन आवडला तुम्हाला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आज भारतात Redmi 7A मॉडेल सादर केला आहे. हा फोन गेल्याच महिन्यात चीन मध्ये लॉन्च केला गेला होता पण आता हा भारतात आला आहे. जरी फोनचे स्पेसिफिकेशन आणि किंमत चांगली असली तरी ज्याप्रकारचे दावे कंपनी आधी करत होती ते खरे ठरले नाहीत. कारण कंपनी म्हणत होती कि या फोन मध्ये असे फीचर्स आहेत जे 20,000 रुपयांच्या फोन मध्ये उपलब्ध आहेत पण लॉन्च नंतर असे काहीच दिसले नाही. हा एक साधारण फोन आहे जो चांगल्या स्पेसिफिकेशन सह उपलब्ध आहे. तसेच भारतीय बाजारात काही फोन आधीच उपलब्ध आहेत जे याला चांगलीच टक्कर देऊ शकतात ज्यात सर्वात आधी Realme C2 चे नाव येते. याच कारणामुळे Xiaomi Redmi 7A लॉन्च होताच Realme च्या सीईओ ने त्या फोन मधील दोष दाखवलाय सुरवात केली.त्यामुळे खरंच Realme C2 बेस्ट आहे कि Redmi 7A वरच विश्वास ठेवावा असा प्रश्न उद्भवतो! चाल तर मग एका छोट्याश्या कम्पॅरिजन आपण दोन्ही फोन तपासून बघूया कि डिजाइन आणि स्पेसिफिकेशनच्या आधारावर कोण आहे बेस्ट.

डिजाइन

Xiaomi Redmi 7A कंपनीने पॉलीकार्बोनेट बॉडी सह सादर केला आहे. जुन्या फोनची डिजाइन पण काहीशी अशीच होती. तसेच अलीकडेच लॉन्च झालेला रेडमी गो फोन पण असाच होता. बिल्ट क्वालिटी चांगली आहे पण डिजाइन मध्ये नावीन्य नाही. फोन कॉम्पॅक्ट आहे आणि सहज हातात बसतो.

तसेच Realme C2 पाहता हा दिसायला खूप स्मार्ट आहे. फोनची बॉडी पॉलीकार्बोनेटची आहे पण ग्लास फिनिश मध्ये आहे त्यामुळे हा तुम्हाला जास्त चांगला वाटेल. इतकेच नव्हे तर मागील डायमंट कट पॅटर्न मुळे हा दुसऱ्या फोन पेक्षा वेगळा दिसतो. एकंदरीत डिजाइनच्या बाबतीत हा जास्त चांगला आहे.

डिस्प्ले

Xiaomi Redmi 7A मध्ये 5.45-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे आणि कंपनीने हा 18:9 आसपेक्ट रेशियो वाले फुल व्यू डिस्प्ले सह सादर केला आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 720 x 1440 पिक्सल आहे आणि डेंसिटी 295 पीपीआई आहे. डिस्प्ले बद्दल कोणतीही तक्रार नाही. या रेंज मध्ये हे रेजल्यूशन खूप चांगले आहे.

Realme C2 मध्ये 6.1-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 720 x 1560 पिक्सल आहे आणि हा 282 पीपीआई पिक्सल डेंसिटीला सपोर्ट करतो. सर्वात मोठी बाब अशी कि कंपनीने हा 19:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि या फोन मध्ये तुम्हाला वाटर ड्रॉप नॉच मिळेल जी सध्या या रेंज मध्ये नाही. त्यामुळे असे म्हणता येईल डिस्प्लेच्या बाबतीत पण रियलमी पुढे गेली आहे.

हार्डवेयर

Redmi 7A क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर सादर केला गेला आहे. सोबतच फोन मध्ये 2.0 गीगाहर्ट्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. कंपनीने हा 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी आणि 2जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये सादर केला आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी पर्यंत हि वाढवू शकता.

C2 मीडियाटेकच्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 2 गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. हा फोन 2जीबी आणि 3जीबी रॅम मेमरी सह येतो. तसेच डेटा स्टोरेज साठी 16जीबी आणि 32जीबी ची स्टोरेज आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे.

इथे दोन्ही फोन जवळपास एकसारखे दिसतात पण आपल्या स्टेबल परफॉर्मेंसमुळे क्वालकॉम चिपसेट जास्त चांगला म्हणता येईल. त्यामुळे रेडमी 7ए पुढे जातो.

कॅमेरा

फोटोग्राफी साठी Redmi 7A च्या रियर पॅनल वर 12 मेगापिक्सलचा सोनीIMX 486 सेंसर आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे जो AI फेस अनलॉक सपॉर्ट सह येतो.

Realme C2 डुअल रियर कॅमेऱ्यासह सादर केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फी साठी या फोन मध्ये 5मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

रियलमी सी2 मध्ये जरी डुअल कॅमेरा सेटअप दिला गेला असेल तरी कॅमेरा सेंसर रेडमीचा बेस्ट आहे. सोनीच्या या सेंसरचा वापर महाग फोन मध्ये केला जातो. त्यामुळे इथे रेडमी पुढे गेली आहे.

ऑपरेटिंग सिस्टम

दोन्ही फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर चालतात पण यूआई वेगळा आहे. रियमली सी2 मध्ये तुम्हाला कलरओएस 6.0 मिळेल तर रेडमी 7ए MIUI 10 वर आधारित आहे. मीयूआई कलरओएस पेक्षा खूप पुढे आहे यात शंकाच नाही. त्यामुळे इथेपण रेडमी 7ए जिंकत आहे.

कनेक्टिविटी

दोन्ही फोन मध्ये 4जी सपोर्ट आहे आणि डुअल सिम देण्यात आला आहे. सोबतच वाईफाई ब्लूटूथ पण मिळेल. तसेच डेटा डाटा ट्रांसफर व चार्जिंग साठी माइक्रो यूएसबी 2.0 आहे. दोन्ही पैकी कोणत्याही फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नाही पण फेस अनलॉक आहे. त्यामुळे कोणीही पुढे किंवा मागे नाही असे म्हणता येईल.

बॅटरी

पावर बॅकअप साठी शाओमी रेडमी 7ए मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही.

रियलमी सी2 मध्ये पण तुम्हाला 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल.

प्राइस

शाओमी रेडमी 7ए चा 2जीबी + 16जीबी वाल्या मॉडेलची किंमत 5,999 रुपये आहे. तर 2जीबी 32जीबी वाला फोन 6,199 रुपयांचा आहे. तसेच जून पर्यंत हे 200 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येतील. अर्थात 5,999 रुपयांचा फोन 5,799 रुपयांमध्ये आणि 6,199 रुपयांचा फोन 5,999 रुपयांमध्ये .

रियलमी सी2 ची सुरवाती किंमत 5,999 रुपये आहे तर 3जीबी + 32जीबी वाला मॉडेल 6,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या प्राइस मध्ये हा चांगला फोन आहे. परंतु माझ्या मते बेस्ट दिल रेडमी 7ए 2जीबी + 32जीबी ची आहे. 6,199 रुपयांमध्ये याची बरोबरी कोणी करू शकत नाही.

The post Xiaomi Redmi 7A कि Realme C2, कोणता फोन आवडला तुम्हाला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-vs-realme-c2-price-specification-and-features/feed/ 0
फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला शाओमीचा अजून एक स्वस्त फोन Redmi 7A, फीचर्स आहेत शानदार https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-launched-in-india-price-start/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-launched-in-india-price-start/#respond Thu, 04 Jul 2019 12:07:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4727 हा फोन जुलै मध्ये विकत घेतला तर 2जीबी+16जीबी 5,799 आणि 2जीबी+32जीबी स्टोरेज 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला शाओमीचा अजून एक स्वस्त फोन Redmi 7A, फीचर्स आहेत शानदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आज भारतात Redmi 7A अधिकृतपणे लॉन्च केला आहे. शाओमीचा हा बजेट स्मार्टफोन चीन मध्ये दोन महिन्यांपूर्वी लॉन्च केला गेला आहे. चीन मध्ये लॉन्च झाल्यानंतर अंदाज लावला जात होता कि कंपनी हा लवकरच भारतात लॉन्च करू शकते. शाओमी रेडमी ए सीरीजला मिळणार शानदार प्रतिसाद पाहून हा स्मार्टफोन सादर केला गेला आहे.

किंमत आणि उपलब्धता

Redmi 7A च्या 2जीबी रॅम आणि 16जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,999 रुपये आणि 2जीबी रॅम व 32जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,199 रुपये आहे. फोनचा सेल 11 जुलै पासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट सोबतच कंपनीच्या वेबसाइट आणि मी होम स्टोर वर होईल. तसेच जर तुम्ही हा फोन जुलै मध्ये विकत घेतला तर 2जीबी+16जीबी 5,799 आणि 2जीबी+32जीबी स्टोरेज 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन पाहता यात 5.45-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 18:9 आहे. तसेच फोन मध्ये 2.0 गीगार्ट्ज क्वॉलकॉम 439 एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच डिवाइस मध्ये 2जीबी रॅम सह 16जीबी आणि 2जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट सादर करण्यात आला आहे. यूजर फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवू शकतात.

तसेच फोटोग्राफी साठी रेडमी 7ए च्या मागे 12 मेगापिक्सलचा सोनी IMX 486 सेंसर आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे जो AI फेस अनलॉक सपॉर्ट सह येतो.

ऑपरेटिंग सिस्टम बद्दल बोलायचे तर यात अँड्रॉइड 9 पाई वर बेस्ड MIUI 10 ओएस देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन मॅट ब्लॅक, मॅट ब्लू आणि मॅट गोल्ड कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. तसेच फोन मध्ये वायरलेस एफएम रेडियो सपोर्ट देण्यात आला आहे. फोन स्प्लॅश प्रूफ आहे, ज्याचा अर्थ असा कि पाण्याच्या शिंतोड्यांचा यावर काहीच परिणाम होणार नाही.

The post फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला शाओमीचा अजून एक स्वस्त फोन Redmi 7A, फीचर्स आहेत शानदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-launched-in-india-price-start/feed/ 0
Xiaomi Redmi 7A: लॉन्च्या आधी जाणून घ्या कसा असेल हा फोन आणि कोणाला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/is-xiaomi-redmi-7a-best-deal-know-every-thing-before-the-launch/ https://www.91mobiles.com/marathi/is-xiaomi-redmi-7a-best-deal-know-every-thing-before-the-launch/#respond Tue, 02 Jul 2019 14:16:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4722 शाओमी Redmi 7A साठी यावेळी रस्ता सोप्पा नाही.

The post Xiaomi Redmi 7A: लॉन्च्या आधी जाणून घ्या कसा असेल हा फोन आणि कोणाला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वीच आम्ही माहिती दिली होती कि Xiaomi Redmi 7A डिवाइस लवकरच भारतात येणार आहे. पण तेव्हा शाओमीच्या अधिकाऱ्यांनी 91मोबाईल्सला सांगितले होते कि कंपनी Redmi K20 सीरीज सोबत किंवा त्यानंतर हा भारतात लॉन्च करणार आहे. पण आता असे बोलले जात आहे कि कंपनीने आज आपल्या ट्विटर अकाउंटवरून अशी घोषणा केली कि 4 जुलैला हा फोन भारतात लॉन्च केला जाईल.

लॉन्च बद्दल ऐकताच तुमची उत्सुकता वाढली असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल कि कसा असेल हा फोन, जुन्या फोनपेक्षा किती अपग्रेडड आहे आणि यावेळी पण हा तितकाच यशस्वी होईल जितका Redmi 5A आणि 6A? चला तर मग या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

कसा असेल Redmi 7A

हा फोन चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे त्यामुळे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन आधीच माहित आहेत. या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाली 5.45-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीने आईपीएस एलसीडी डिस्प्लेचा वापर केला आहे जो एचडी+ रेजल्यूशनला सपोर्ट करतो.

Xiaomi Redmi 7A एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर चालतो आणि कपंनीने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर सादर केला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रीनो 505 जीपीयू आहे.

कंपनीने याला 2 जीबी रॅमची ताकद दिली आहे तर स्टोरेज साठी 16जीबी मेमरी आणि 32जीबी चा ऑप्शन आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी साठी 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी यात 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

फोन मध्ये 4जी सपोर्ट आहे आणि फेस अनलॉक देण्यात आला आहे. तसेच वाईफाई आणि ब्लूटूथ पण आहे. पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. बातमी अशी आहे कि भारतीय बाजारात Redmi 7A यूएसबी टाइप सी पोर्ट सह उपलब्ध होईल. तसेच कदाचित कंपनी भारतात 3जीबी रॅम मॉडेल पण सादर करेल.

अपग्रेड काय आहे

नवीन फोन आल्यांनतर पहिल्यांदा आपण हेच विचारतो कि यात अपग्रेड काय आहे. अर्थात जुन्या फोनपेक्षा किती बदलला आहे. शाओमी रेडमी 6ए आणि Redmi 7A मध्ये तुलना केली तर भरपूर फरक दिसतील. मुख्य फरक बॅटरी आणि प्रोसेसरचा आहे. तसेच वजन कॅमेरा आणि काही छोटे छोटे बदल आहेत. बाकी स्क्रीन आणि कॅमेरा सेंसर इत्यादी सारखे आहेत.

सर्वात आधी वजनात थोडा फरक दिसेल. नवीन फोन जवळपास 20 ग्राम जड झाला आहे. रेडमी 6ए चे वजन 145 ग्राम होते तर Redmi 7A 165 ग्रामचा आहे. याचे कारण आहे बॅटरी. जुना मॉडेल 3,000 एमएएच बॅटरी सह येत होता तर चीन मध्ये Redmi 7A 4,000 एमएएच बॅटरी सह सादर केला गेला आहे आणि आशा आहे कि भारतात पण हीच येईल.

तसेच रेडमी 6ए कंपनी ने मीडियाटेक हेलिया ए22 चिपसेट वर सादर केला होता तर यावेळी क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर असेल. रॅम आणि रोम तोच असू शकतो. कॅमेरा सेंसर पण 6ए सारखे असतील पण यावेळी कंपनी माइक्रोन पिक्सलचा वापर करू शकते ज्यामुळे फोटो सुधारतील .

अलीकडेच बातमी आली होती कि भारतात लॉन्च होणाऱ्या मॉडेल मध्ये यूएसबी टाइप-सी दिला जाऊ शकतो उलट चीन मध्ये हा फोन माइक्रो यूएसबी 2.0 सह आला आहे.

सौदा आहे का फायद्याचा

शेवटी प्रश्न येतो कि Redmi 7A ची किंमत काय असेल आणि हा विकत घेणे फायद्याचे असेल का. भारतीय बाजारात शाओमी Redmi 7A ची किंमत 5,999 रुपयांपासून सुरु होऊ शकते. या प्राइस मध्ये हा चांगला फोन म्हणता येईल पण याला टक्कर देण्यासाठी रियलमी सी2 आधीपासूनच उपलब्ध आहे. मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट आधारित या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत वॉटर ड्रॉप नॉच आहे. त्यामुळे शाओमी Redmi 7A साठी यावेळी रस्ता सोप्पा नाही.

The post Xiaomi Redmi 7A: लॉन्च्या आधी जाणून घ्या कसा असेल हा फोन आणि कोणाला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/is-xiaomi-redmi-7a-best-deal-know-every-thing-before-the-launch/feed/ 0
4 जुलैला भारतात येत आहे Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 7A, पुन्हा करेल का नवीन रेकॉर्ड ? https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-to-launch-in-india-4-july-price-specifications-desh-ka-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-to-launch-in-india-4-july-price-specifications-desh-ka-smartphone/#respond Mon, 01 Jul 2019 10:34:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4702 या आठवड्याच्या 4 तारखेला कंपनी Redmi 7A स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल.

The post 4 जुलैला भारतात येत आहे Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 7A, पुन्हा करेल का नवीन रेकॉर्ड ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्याच आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले होते कि Xiaomi आपल्या रेडमी सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन Redmi 7A भारतात लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे आणि हा स्मार्टफोन खूप स्वस्त किंमतीत बाजारात येईल. आज कंपनीने आपल्या या फोनची लॉन्च डेट सांगितली आहे. Xiaomi ने सांगितले आहे कि या आठवड्याच्या 4 तारखेला कंपनी Redmi 7A स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल.

Xiaomi इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्वीटर हँडल वरून एक ट्वीट करत Redmi 7A च्या लॉन्च डेटचा खुलासा केला आहे. मनु जैन यांनी सांगितले आहे कि Redmi 7A येत्या 4 जुलैला भारतीय बाजारात येईल. विशेष म्हणजे Redmi 7A स्मार्टफोन कंपनी ‘Smart Desh Ka Smartphone’ टॅग लाईन सह प्रोमोट करत आहे. म्हणजे हा स्मार्टफोन इंडियन यूजर्स साठी बनलेला असेल ज्यात अनेक क्षेत्रिय भाषा आणि भारतीय कॅलेंडर सारखे फीचर्स असतील. विशेष म्हणजे Redmi 7A बद्दल शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे म्हणजे हा स्मार्टफोन याच वेबसाइट वर सेल साठी उपलब्ध होईल.

डिजाईन

Redmi 7A शाओमी लो बजेट स्मार्टफोन आहे. कंपनीने हा फोन चालू नॉच डिस्प्ले वाल्या ट्रेंड पासून दूर ठेवत बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा फोन पॉलिकार्बोनेट बॉडी वर बनला आहे. डिस्प्ले चे वरच्या आणि खालच्या बाजूला मोठे बेजल्स देण्यात आले आहेत. वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा आहे तर खालच्या बाजूला Redmi ब्रांडिंग देण्यात आली आहे. हा फोन सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तिथे एका कॅमेरा सेंसर सह फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Redmi 7A 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे जो 720 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या आईपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर सादर करण्यात आला आहे जो ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 505 जीपीयू आहे.

कंपनीने Redmi 7A चीन मध्ये 2 जीबी रॅम मेमरी वर सादर करण्यात आला आहे जो 16जीबी मेमरी आणि 32जीबी स्टोरेजच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये विकला जात आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi 7A एक डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये कोणताही फिंगरप्रिंट स्कॅनर नाही त्यामुळे फोन अनलॉक करण्यासाठी यूजर्स पिन आणि फेस अनलॉकचा वापर करू शकतात. पावर बॅकअप साठी Redmi 7A मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Xiaomi Redmi 7A ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शन मध्ये सादर झाला आहे. कंपनीने फोनचा 16जीबी मेमरी वेरिएंट आणि 32जीबी मेमरी वेरिएंट इंडियन करंसी नुसार जवळपास 5,500 रुपये आणि 6,000 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post 4 जुलैला भारतात येत आहे Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 7A, पुन्हा करेल का नवीन रेकॉर्ड ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-to-launch-in-india-4-july-price-specifications-desh-ka-smartphone/feed/ 0
Xiaomi घेऊन येत आहे अजून एक स्वस्त फोन Redmi 7A, पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-m1903c3ei-to-launch-in-india-specs-feature/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-m1903c3ei-to-launch-in-india-specs-feature/#respond Wed, 19 Jun 2019 11:57:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4604 Redmi 7A जुलै महिन्यात इंडियन मार्केट मध्ये येऊ शकतो.

The post Xiaomi घेऊन येत आहे अजून एक स्वस्त फोन Redmi 7A, पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्याच महिन्यात आपल्या होम मार्केट चीन मध्ये Redmi K सीरीजची सुरवात कारण्यासोबतच Redmi 7 सिरीज पण वाढवली होती. कंपनीने एकीकडे पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला हाईएंड डिवाईस Redmi K20 आणि K20 Pro लॉन्च केले होते तर यांच्यासोबत शाओमी ने Redmi 7A स्मार्टफोन ऑफिशियल केला होता. आता बातमी येत आहे कि शाओमीचा रेडमी 7ए स्मार्टफोन लवकरच भारतात पण येणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये Xiaomi Redmi 7A च्या इंडिया लॉन्चची माहिती देत याच्या इंडियन मॉडेल नंबरचा पण खुलासा करण्यात आला आहे.

Redmi 7A च्या इंडिया लॉन्चची बातमी एक्सडीए डेवलेपर्स ने आपल्या रिपोर्ट मध्ये दिली आहे. रिपोर्ट मध्ये दावा करत या वेबसाइट ने म्हटले आहे कि Xiaomi Redmi 7A चीन बाहेर आणण्याची तयारी करत आहे आणि हा फोन भारत तसेच युरोपात लॉन्च केला जाईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Redmi 7A भारतात M1903C3EI मॉडेल नंबर सह लॉन्च केला जाईल. सोबतच फोनचे दुसरे दोन मॉडेल M1903C3EG तसेच M1903C3EH पण याइतया काही दिवसांत ग्लोबल मंचावर येतील. रिपोर्ट मध्ये अंदाज लावण्यात आला आहे कि Redmi 7A जुलै महिन्यात इंडियन मार्केट मध्ये येऊ शकतो.

डिजाईन

Redmi 7A शाओमी लो बजेट स्मार्टफोन आहे. कंपनीने हा फोन चालू नॉच डिस्प्ले वाल्या ट्रेंड पासून दूर ठेवत बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा फोन पॉलिकार्बोनेट बॉडी वर बनला आहे. डिस्प्ले चे वरच्या आणि खालच्या बाजूला मोठे बेजल्स देण्यात आले आहेत. वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा आहे तर खालच्या बाजूला Redmi ब्रांडिंग देण्यात आली आहे. हा फोन सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तिथे एका कॅमेरा सेंसर सह फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Redmi 7A 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे जो 720 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या आईपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर सादर करण्यात आला आहे जो ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 505 जीपीयू आहे.

कंपनीने Redmi 7A चीन मध्ये 2 जीबी रॅम मेमरी वर सादर करण्यात आला आहे जो 16जीबी मेमरी आणि 32जीबी स्टोरेजच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये विकला जात आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi 7A एक डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये कोणताही फिंगरप्रिंट स्कॅनर नाही त्यामुळे फोन अनलॉक करण्यासाठी यूजर्स पिन आणि फेस अनलॉकचा वापर करू शकतात. पावर बॅकअप साठी Redmi 7A मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Xiaomi Redmi 7A ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शन मध्ये सादर झाला आहे. कंपनीने फोनचा 16जीबी मेमरी वेरिएंट आणि 32जीबी मेमरी वेरिएंट इंडियन करंसी नुसार जवळपास 5,500 रुपये आणि 6,000 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post Xiaomi घेऊन येत आहे अजून एक स्वस्त फोन Redmi 7A, पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-m1903c3ei-to-launch-in-india-specs-feature/feed/ 0
टेना वर लिस्ट झाला Xiaomi Redmi 7A, लवकरच होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-isted-on-teena-can-be-launched-soon/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-isted-on-teena-can-be-launched-soon/#respond Fri, 17 May 2019 13:42:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4335 फोनच्या डिजाइन वरून अंदाज लावला जात आहे कि फोन बजेट कॅटगरी मध्ये सादर केला जाईल

The post टेना वर लिस्ट झाला Xiaomi Redmi 7A, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने भारतात रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोन नंतर आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी केली आहे. भारतात लॉन्च होणारा फोन Redmi Note 7S असेल. आता टेना वर काही फोटो समोर आले आहेत, जे बघून वाटत आहे कि कंपनी आपला नवीन बजेट डिवाइस पण सादर करण्याची योजना बनवत आहे.

चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर शाओमीचे तीन डिवाइस लिस्ट झाले आहेत. लिस्टिंग मध्ये तीन मॉडेल नंबर M1903C3EC, M1903C3EE आणि M1903F11C स्पॉट करण्यात आले आहेत. या तिन्हीपैकी M1903C3EC, आणि M1903C3EE मॉडेल नंबर बघून असे वाटत आहे कि हा फोन Redmi 7a असेल. तर M1903F11C बद्दल सध्या काहीच सांगता येत नाही.

समोर आलेल्या फोटोज नुसार M1903C3EC आणि M1903C3EE मॉडेल मध्ये सिंगल रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश सह दिला जाईल. तसेच फोन मध्ये कोणतीही नॉच नसेल. तसेच रियर कॅमेरा एआई पॉवर्ड असेल. फोनच्या डिजाइन वरून अंदाज लावला जात आहे कि फोन बजेट कॅटगरी मध्ये सादर केला जाईल. टेना लिस्टिंग मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही. पण अशा आहे कि येत्या काळात या फोनची अजून माहिती समोर येईल. सध्या कंपनीने डिवाइस बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Redmi 6a बद्दल बोलायचे तर हा फोन दोन मेमरी वेरियंट सह लॉन्च केला गेला होता त्यांची किंमत क्रमश: 5,999 रुपये आणि 6,999 रुपये होती. रेडमी 6ए के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल ​लेस डिस्प्ले सह 720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सादर झाला आहे सोबत 2.0गीगाहर्ट्ज मीडियाटेक हेलियो ए22 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी 6ए मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. तसेच फास्ट फोकस साठी यात पीडीएएफ सपोर्ट आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा 5मेगापिक्सलचा आहे आणि यात पण तुम्हाला एफ/2.2 अपर्चर मिळेल. डेटा व कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर शाओमी रेडमी 6ए मध्ये डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. सोबत वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. पावर बॅकअप साठी यात 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सोर्स

The post टेना वर लिस्ट झाला Xiaomi Redmi 7A, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-isted-on-teena-can-be-launched-soon/feed/ 0
शाओमीच्या स्वस्त फोन रेडमी 7 प्रो मध्ये असेल वॉटर ड्रॉप नॉच, माहिती झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-to-launch-with-water-drop-notch-and-dual-camera-setup-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-to-launch-with-water-drop-notch-and-dual-camera-setup-in-marathi/#respond Mon, 17 Dec 2018 07:20:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3163 हा टेना वर पण आला आहे जिथे फोनचे काही स्पेसिफिकेशन उपलब्ध आहेत.

The post शाओमीच्या स्वस्त फोन रेडमी 7 प्रो मध्ये असेल वॉटर ड्रॉप नॉच, माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो—वीवो नंतर आता शाओमी पण वॉटर ड्रॉप नॉच असलेला फोन आणण्याची तयारी करत आहे. खास बाब अशी की कंपनी आपल्या वाटर ड्रॉप असलेल्या नॉच फोनची सुरवात कमी रेंजच्या फोनपासून करू शकते. हा फोन चीनी सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला आहे. शाओमी ने हा फोन एम1901एफ7सी नावाने लिस्ट केला आहे. याआधी हा फोन ​3सी साइट वर सर्टिफिकेशन साठी आला होता. कंपनी एम1901एफ7ई, एम1901एफ7टी आणि एम1901एफ7सी नावाने लिस्ट केला गेला होता आता हा टेना वर पण आला आहे जिथे फोनचे काही स्पेसिफिकेशन उपलब्ध आहेत.

लीक्सनुसार कंपनी हा शाओमी रेडमी 7 प्रो नावाने सादर करू शकते. तसेच रेडमी 7ए आणि रेडमी 7 नावाने पण येऊ शकतो. लिस्ट केल्या गेलेल्या फोनचे डायमेंशन 147.76×71.89×7.8 एमएम आहे. फोन मध्ये 5.84-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. पण स्क्रीन रेजल्यूशनचा उल्लेख नाही. कंपनी यात 2900 एमएएच ची बॅटरीचा उल्लेख केला आहे. कदाचित फोन झाल्यावर जास्त बॅटरी दिसू शकते. हि बातमी सर्वात आधी फोन अरीना ने दिली आहे.

फोनच्या मागील पॅनल वर डुअल कॅमेरासह फ्लॅश देण्यात आला आहे. सोबत यात फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. काळ्या रंगात हा फोन उपलब्ध आहे आणि खाली मी चा लोगो उपलब्ध आहे. पण यावेळी डिजाइन थोडी वेगळी आहे. बॉडी ग्लासची वाटत आहे.

काही महिन्यांपूर्वी शाओमी ने भारतात शओमी रेडमी 6ए, रेडमी 6 आणि रेडमी 6 प्रो मॉडेल सादर केले आहेत. हे फोन चीन मध्ये आधी लॉन्च झाले होते. हे सर्व मॉडेल कमी रेंजचे आहेत ज्यात थोडी छोटी छोटी स्क्रीन आणि साधारण स्पेसिफिकेशन आहेत. हे फोन बघून अशीच अशा आहे.

शाओमी रेडमी 6 प्रो पाहता या फोन मध्ये 2280 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.84-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला गेला आहे ज्यात नॉच आहे. हा फोन मीयूआई 9 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओ​रियो वर आधारित आहे.

प्रोसेसिंग साठी हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 625 चिपसेट वर चालतो आणि यात 2.0गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर थोडा जुना झाला आहे पण परफॉर्मेंसच्या बाबतीत चांगला आहे. शाओमी रेडमी 6 प्रो 3जीबी आणि 4जीबी रॅम सह उपलब्ध आहे. हा फोन 32जीबी आणि 64जीबी स्टोरेज वेरियंट मध्ये मिळेल.

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर नॉच च्या वर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी आहे.

The post शाओमीच्या स्वस्त फोन रेडमी 7 प्रो मध्ये असेल वॉटर ड्रॉप नॉच, माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-to-launch-with-water-drop-notch-and-dual-camera-setup-in-marathi/feed/ 0