4 जुलैला भारतात येत आहे Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 7A, पुन्हा करेल का नवीन रेकॉर्ड ?

91मोबाईल्सने गेल्याच आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले होते कि Xiaomi आपल्या रेडमी सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन Redmi 7A भारतात लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे आणि हा स्मार्टफोन खूप स्वस्त किंमतीत बाजारात येईल. आज कंपनीने आपल्या या फोनची लॉन्च डेट सांगितली आहे. Xiaomi ने सांगितले आहे कि या आठवड्याच्या 4 तारखेला कंपनी Redmi 7A स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल.

Xiaomi इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्वीटर हँडल वरून एक ट्वीट करत Redmi 7A च्या लॉन्च डेटचा खुलासा केला आहे. मनु जैन यांनी सांगितले आहे कि Redmi 7A येत्या 4 जुलैला भारतीय बाजारात येईल. विशेष म्हणजे Redmi 7A स्मार्टफोन कंपनी ‘Smart Desh Ka Smartphone’ टॅग लाईन सह प्रोमोट करत आहे. म्हणजे हा स्मार्टफोन इंडियन यूजर्स साठी बनलेला असेल ज्यात अनेक क्षेत्रिय भाषा आणि भारतीय कॅलेंडर सारखे फीचर्स असतील. विशेष म्हणजे Redmi 7A बद्दल शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे म्हणजे हा स्मार्टफोन याच वेबसाइट वर सेल साठी उपलब्ध होईल.

डिजाईन

Redmi 7A शाओमी लो बजेट स्मार्टफोन आहे. कंपनीने हा फोन चालू नॉच डिस्प्ले वाल्या ट्रेंड पासून दूर ठेवत बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा फोन पॉलिकार्बोनेट बॉडी वर बनला आहे. डिस्प्ले चे वरच्या आणि खालच्या बाजूला मोठे बेजल्स देण्यात आले आहेत. वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा आहे तर खालच्या बाजूला Redmi ब्रांडिंग देण्यात आली आहे. हा फोन सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तिथे एका कॅमेरा सेंसर सह फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Redmi 7A 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे जो 720 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या आईपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर सादर करण्यात आला आहे जो ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 505 जीपीयू आहे.

कंपनीने Redmi 7A चीन मध्ये 2 जीबी रॅम मेमरी वर सादर करण्यात आला आहे जो 16जीबी मेमरी आणि 32जीबी स्टोरेजच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये विकला जात आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi 7A एक डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये कोणताही फिंगरप्रिंट स्कॅनर नाही त्यामुळे फोन अनलॉक करण्यासाठी यूजर्स पिन आणि फेस अनलॉकचा वापर करू शकतात. पावर बॅकअप साठी Redmi 7A मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Xiaomi Redmi 7A ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शन मध्ये सादर झाला आहे. कंपनीने फोनचा 16जीबी मेमरी वेरिएंट आणि 32जीबी मेमरी वेरिएंट इंडियन करंसी नुसार जवळपास 5,500 रुपये आणि 6,000 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here