टेना वर लिस्ट झाला Xiaomi Redmi 7A, लवकरच होऊ शकतो लॉन्च

Xiaomi ने भारतात रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोन नंतर आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी केली आहे. भारतात लॉन्च होणारा फोन Redmi Note 7S असेल. आता टेना वर काही फोटो समोर आले आहेत, जे बघून वाटत आहे कि कंपनी आपला नवीन बजेट डिवाइस पण सादर करण्याची योजना बनवत आहे.

चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर शाओमीचे तीन डिवाइस लिस्ट झाले आहेत. लिस्टिंग मध्ये तीन मॉडेल नंबर M1903C3EC, M1903C3EE आणि M1903F11C स्पॉट करण्यात आले आहेत. या तिन्हीपैकी M1903C3EC, आणि M1903C3EE मॉडेल नंबर बघून असे वाटत आहे कि हा फोन Redmi 7a असेल. तर M1903F11C बद्दल सध्या काहीच सांगता येत नाही.

समोर आलेल्या फोटोज नुसार M1903C3EC आणि M1903C3EE मॉडेल मध्ये सिंगल रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश सह दिला जाईल. तसेच फोन मध्ये कोणतीही नॉच नसेल. तसेच रियर कॅमेरा एआई पॉवर्ड असेल. फोनच्या डिजाइन वरून अंदाज लावला जात आहे कि फोन बजेट कॅटगरी मध्ये सादर केला जाईल. टेना लिस्टिंग मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही. पण अशा आहे कि येत्या काळात या फोनची अजून माहिती समोर येईल. सध्या कंपनीने डिवाइस बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Redmi 6a बद्दल बोलायचे तर हा फोन दोन मेमरी वेरियंट सह लॉन्च केला गेला होता त्यांची किंमत क्रमश: 5,999 रुपये आणि 6,999 रुपये होती. रेडमी 6ए के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल ​लेस डिस्प्ले सह 720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सादर झाला आहे सोबत 2.0गीगाहर्ट्ज मीडियाटेक हेलियो ए22 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी 6ए मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. तसेच फास्ट फोकस साठी यात पीडीएएफ सपोर्ट आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा 5मेगापिक्सलचा आहे आणि यात पण तुम्हाला एफ/2.2 अपर्चर मिळेल. डेटा व कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर शाओमी रेडमी 6ए मध्ये डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. सोबत वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. पावर बॅकअप साठी यात 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सोर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here