Xiaomi Redmi K30 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Feb 2020 14:57:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4,700mAh बॅटरी सह येईल Redmi K30 Pro, समोर आली माहिती https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-come-with-pop-up-selfie-camera-and-oled-display/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-come-with-pop-up-selfie-camera-and-oled-display/#respond Thu, 06 Feb 2020 14:57:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6533 चीनी टिपस्टर Digital Chat Station ने अशी माहिती दिली आहे कि Redmi K30 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,700mAh ची बॅटरी दिली जाईल.

The post पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4,700mAh बॅटरी सह येईल Redmi K30 Pro, समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये आपल्या घरच्या मार्केट मध्ये Redmi K30 स्मार्टफोन सादर केला होता. पण तेव्हा कंपनीने डिवाइसचा प्रो वेरिएंट सादर केला नव्हता. अनेक दिवसांपासून अफवा समोर येत आहे कि कंपनी Redmi K30 Pro यावर्षी मार्च मध्ये सादर करेल. तसेच डिवाइस बाबत लीक्स पण येत आहेत. आता रेडमी के30 प्रो ची नवीन माहिती समोर आली आहे. चीनी माइक्रोब्लागिंग वेबसाइट वर समोर आली आहे.

चीनी टिपस्टर Digital Chat Station ने अशी माहिती दिली आहे कि Redmi K30 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,700mAh ची बॅटरी दिली जाईल. या आधी कंपनीने रेडमी के20 प्रो मध्ये 4,000mAh ची बॅटरी दिली होती. तसेच रेडमी के30 प्रो 33 वॉट फास्ट चार्जिंग सह येईल. तसेच टिप्सटरने माहिती दिली आहे कि फोन कर्व्ड स्क्रीन डिस्प्ले सह येईल.

लीकनुसार Redmi K30 मध्ये एलसीडी पॅनलच्या जागी OLED डिस्प्ले असेल. तसेच फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. तसेच काही दिवसांपूर्वी शाओमी रेडमी के30 प्रो गीकबेंच वर क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल आणि एडवांस चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 सह दिसला होता.

विशेष म्हणजे रेडमी के30 प्रो शाओमीचा पहिला फोन असू शकतो जो या ताकदवान चिपसेट वर लॉन्च होईल. तसेच या फोन मध्ये एंडरॉयडचा नवीन ओएस एंडरॉयड 10 मिळेल. गीकबेंच वर Redmi K30 Pro 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह दिसला आहे जो 8 जीबी च्या दमदार रॅम सह येईल. तसेच स्कोरिंग बद्दल बोलायचे तर रेडमी के30 प्रो ला सिंगल-कोर मध्ये 903 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 3362 स्कोर मिळाला आहे.

रेडमी के30

शाओमी रेडमी के30 पाहता हा डिवाइस M2001G7AI मॉडेल नंबर सह ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड वर सर्टिफाइड केला गेला आहे. Redmi K30 दोनदा बीआईएस वर लिस्ट झाला आहे. डिसेंबर मध्ये लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 4G मॉडेल होता तर 9 जानेवारीला लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 5G मॉडेल असल्याचे बोलले जात आहे. भारतात अजूनही 5G सर्विस अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलेली नाही, अजूनही टेस्टिंग स्टेज वर आहे. पण जर Xiaomi Redmi K30 5G भारतात लॉन्च झाला तर हा भारतातील पहिला 5जी स्मार्टफोन बनेल.

सोर्स

शाओमी रेडमी के30 प्रो वीडियो

The post पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4,700mAh बॅटरी सह येईल Redmi K30 Pro, समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-come-with-pop-up-selfie-camera-and-oled-display/feed/ 0
स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आणि 8 जीबी रॅम सह लिस्ट झाला Redmi K30 Pro, हा असेल Xiaomi चा सर्वात पावरफुल फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-pro-listed-on-geekbench-with-qualcomm-snapdragon-865-chipset-8gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-pro-listed-on-geekbench-with-qualcomm-snapdragon-865-chipset-8gb-ram/#respond Wed, 22 Jan 2020 12:48:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6350 काही रिपोर्ट्स मध्ये अंदाज लावला जात आहे कि रेडमी के30 स्मार्टफोन भारतात POCO ब्रँडच्या अंतर्गत लॉन्च केला जाऊ शकतो.

The post स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आणि 8 जीबी रॅम सह लिस्ट झाला Redmi K30 Pro, हा असेल Xiaomi चा सर्वात पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी भारतीय सर्टिफिकेशन्स साइट ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) वर Xiaomi चा एक नवीन स्मार्टफोन Redmi K30 दिसला होता. बीआईएस वर लिस्ट झाल्यांनतर चर्चेला उधाण आले होते कि शाओमी भारतात पण आपल्या ‘रेडमी के’ सीरीजच्या विस्ताराची योजना बनावट आहे आणि सीरीजचा नवीन डिवाईस Redmi K30 येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात येईल. आता शाओमीच्या या सीरीजचा अजून एक फोन Redmi K30 Pro बेंचमार्किंग साइट वर आला आहे. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला आहे कि Xiaomi Redmi K30 Pro क्वॉलकॉमच्या आगामी सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 सह लॉन्च केला जाईल.

Xiaomi Redmi K30 Pro चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 21 जानेवारीची आहे ज्यात फोन शाओमी रेडमी के30 प्रो नावाने सबमिट केला केला गेला आहे. गीकबेंच लिस्टिंगने Redmi K30 Pro च्या लॉन्चची स्थिती स्पष्ट केली आहे तसेच या वेबसाइट वर फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Redmi K30 Pro

शाओमी रेडमी के30 प्रो गीकबेंच वर क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल आणि ऍडव्हान्स चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 सह दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे रेडमी के30 प्रो शाओमीचा पहिला फोन असू शकतो जो या ताकदवान चिपसेट वर लॉन्च होईल. त्याचबरोबर या फोन मध्ये एंडरॉयडचा नवीन ओएस एंडरॉयड 10 मिळेल. गीकबेंच वर Redmi K30 Pro 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह दाखवण्यात आला आहे जो 8 जीबी च्या दमदार रॅम सह येईल. स्कोर पाहता रेडमी के30 प्रो ला सिंगल-कोर मध्ये 903 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 3362 स्कोर मिळाला आहे.

Redmi K30

शाओमी रेडमी के30 बद्दल बोलायचे तर हा डिवाईस M2001G7AI मॉडेल नंबर सह ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड वर सर्टिफाइड केला गेला आहे. विशेष म्हणजे Redmi K30 दोनदा बीआईएस वर लिस्ट झाला आहे. डिसेंबर मध्ये लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 4G मॉडेल होता तर 9 जानेवारीला लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 5G मॉडेल असल्याचे बोलले जात आहे. भारतात 5G सर्विस अधिकृतपणे लॉन्च झाली नाही तर हि आता टेस्टिंग स्टेज वर आहे. पण जर Xiaomi ने Redmi K30 5G भारतात लॉन्च केला तर हा भारतातील पहिला 5जी स्मार्टफोन ठरेल.

Redmi K30 स्पेसिफिकेशन्स

Redmi K20 च्या अपग्रेड वर्जन रेडमी के30 मध्ये कंपनीने 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे जो होल-पंच डिजाइन सह येतो. Redmi K30 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 765 5जी प्रोसेसर सह येतो. या नवीन प्रोसेसरला 5जी सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर रेडमी के30 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स686 प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ ऑफ फिल्ड आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॉम्बिनेशन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

Redmi K30 4G मध्ये 64MP+2MP+2MP+8MP कॅमेरा सेटअप आहे. Redmi K30 मध्ये 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन चा 5जी मॉडेल 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येतो तर 4जी मॉडेल मध्ये 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येतो. Redmi K30 कधी भारतात येईल हे सांगता येत नाही. तर काही रिपोर्ट्स मध्ये अंदाज लावला जात आहे कि रेडमी के30 स्मार्टफोन भारतात POCO ब्रँडच्या अंतर्गत लॉन्च केला जाऊ शकतो.

The post स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आणि 8 जीबी रॅम सह लिस्ट झाला Redmi K30 Pro, हा असेल Xiaomi चा सर्वात पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-pro-listed-on-geekbench-with-qualcomm-snapdragon-865-chipset-8gb-ram/feed/ 0
Redmi K30 ठरू शकतो भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-5g-listed-on-bis-m2001g7ai-model-number-specs/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-5g-listed-on-bis-m2001g7ai-model-number-specs/#respond Mon, 13 Jan 2020 13:01:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6271 Xiaomi ने Redmi K30 5G भारतात लॉन्च केला तर हा भारतातील पहिला 5जी स्मार्टफोन ठरू शकतो.

The post Redmi K30 ठरू शकतो भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या महिन्यात अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ब्रँडचा 5G स्मार्टफोन Redmi K30 आणि Redmi K30 Pro लॉन्च केले होते. हे स्मार्टफोन्स चीनी बाजारात सेलसाठी उपलब्ध आहेत. Redmi K30 सीरीज चीन मध्ये लॉन्च होण्याआधी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) वर सीरीजचा एक स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला होता. हा फोन अजूनही भारतात लॉन्च झाला नाही पण आता या सीरीजचा अजून एक डिवाईस बीआईएस वर लिस्ट केला गेला आहे. बोलले जात आहे कि लिस्ट झालेला हा फोन Redmi K30 चा 5G फोन आहे जो लवकरच इंडियन मार्केट मध्ये येऊ शकतो.

Redmi K30 सीरीजचा हा डिवाईस M2001G7AI मॉडेल नंबर सह ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड वर सर्टिफाइड केला गेला आहे. हि लिस्टिंग 9 जानेवारीची आहे. डिसेंबर मध्ये बीआईएस वर लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 4जी मॉडेल होता तर आता लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 5जी मॉडेल असल्याचे बोलले जात आहे. भारतात अजूनही 5G सर्विस अधिकृतपणे लॉन्च केली गेली नाही, हि अजूनतरी टेस्टिंग स्टेज वर आहे. पण जर Xiaomi ने Redmi K30 5G भारतात लॉन्च केला तर हा भारतातील पहिला 5जी स्मार्टफोन ठरू शकतो.

Redmi K30 5G

Redmi K20 च्या अपग्रेड वर्जन रेडमी के30 मध्ये कंपनीने 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे जो होल-पंच डिजाइन सह येतो. Redmi K30 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 765 5जी प्रोसेसर सह येतो. या नवीन प्रोसेसरला 5जी सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोन तीन रॅम आणि तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर रेडमी के30 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स686 प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ ऑफ फिल्ड आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॉम्बिनेशन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

रेडमी फोन मध्ये पावरसाठी 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कपनीचा दावा आहे कि Redmi K30 फक्त 60 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. Redmi K30 ला क्विक चार्ज आणि यूएसबी पावर डिलवरी सपोर्ट देण्यात आला आहे.

Redmi K30 4G

Redmi K30 4G चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात जास्त फरक नाही. या वेरिएंट मध्ये कॅमेरा आणि बॅटरी फीचर्सचा फरक आहे. Redmi K30 4G मध्ये 64MP+2MP+2MP+8MP कॅमेरा सेटअप आहे. तर फोन मध्ये 4500एमएएच ची बॅटरी 27वॉट चार्जिंग सपोर्ट सह येते. याव्यतिरिक्त दोन्ही फोन मध्ये बाकी स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. रेडमी के30 सीरीजच्या भारतातील लॉन्चसाठी आता कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Redmi K30 ठरू शकतो भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-5g-listed-on-bis-m2001g7ai-model-number-specs/feed/ 0
Xiaomi चा 5G फोन Redmi K30 झाला लॉन्च, 60MP कॅमेरा आणि 4500mAh ची बॅटरी आहे यात https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-launch-with-64mp-and-4500mah-battery-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-launch-with-64mp-and-4500mah-battery-in-china/#respond Tue, 10 Dec 2019 10:05:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6013 या नवीन प्रोसेसरला 5जी सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोन तीन रॅम आणि तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

The post Xiaomi चा 5G फोन Redmi K30 झाला लॉन्च, 60MP कॅमेरा आणि 4500mAh ची बॅटरी आहे यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने आपल्या Redmi K20 सीरीजचा अपग्रेडेड वेरिएंट Redmi K30 को लॉन्च केला आहे. कंपनीने हा Redmi K30 हँडसेट आपल्या घरच्या मार्केट मध्ये RedmiBook 13 सह लॉन्च केला आहे. Redmi K30 ची खासियत यात देण्यात आलेला 64 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स686 प्राइमरी कॅमेरा सेंसर आणि 5जी सपोर्ट आहे. तसेच हा कंपनीचा पहिला रेडमी फोन आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765 प्रोसेसर आणि 120 हर्ट्ज डिस्प्ले सह आला आहे.

Redmi K20 च्या अपग्रेड वर्जन Redmi K30 मध्ये कंपनीने 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे जो होल-पंच डिजाईन सह येतो. Redmi K30 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 765 5जी प्रोसेसर सह आला आहे. या नवीन प्रोसेसरला 5जी सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोन तीन रॅम आणि तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

फोटोग्राफी पाहता Redmi K30 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स686 प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5 मेगापिक्सल माक्रो लेंस, 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ ऑफ फिल्ड आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॉम्बिनेशन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

तसेच रेडमी फोन मध्ये 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कपनीचा दावा आहे कि Redmi K30 फक्त 60 मिनिटांत फुल चार्ज केला जाऊ शकतो. Redmi K30 ला क्विक चार्ज आणि यूएसबी पावर डिलवरी सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने फोन Deep sea Light / Time Monologue / Flower Shadow / Purple Jade कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे.

शाओमी Redmi K30 वीडियो

The post Xiaomi चा 5G फोन Redmi K30 झाला लॉन्च, 60MP कॅमेरा आणि 4500mAh ची बॅटरी आहे यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-launch-with-64mp-and-4500mah-battery-in-china/feed/ 0
10 डिसेंबरला लॉन्च होईल डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला Xiaomi चा 5G फोन Redmi K30 https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-launch-date-confirmed-10-december-in-china-dual-punch-hole-120hz-display-sa-nsa-5g-support/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-launch-date-confirmed-10-december-in-china-dual-punch-hole-120hz-display-sa-nsa-5g-support/#respond Tue, 26 Nov 2019 13:00:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5872 लक्षात असू दे कि Redmi K30 ब्रँडचा 5G फोन असेल, त्यामुळे 5G फोन भारतीय बाजारात येणे मोठे पाऊल असेल.

The post 10 डिसेंबरला लॉन्च होईल डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला Xiaomi चा 5G फोन Redmi K30 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi सध्या टेक विश्वात चर्चेत आहे. एकीकडे शाओमी इंडियाने कंफर्म केले आहे कि जगातील पहिला 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन Mi Note 10 पुढल्या महिन्यात भारतीय बाजारात लॉन्च केला जात आहे. तर शाओमी चाइनाने कंपनीच्या ‘के सीरीज’ चा आगामी स्मार्टफोन Redmi K30 समोर आणला आहे. कालच Redmi K30 चा खरा फोटो इंटरनेट वर वायरल झाला होता, ज्यात फोनच्या फ्रंट पॅनल सोबतच अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. आता Xiaomi ने अधिकृतपणे Redmi K30 ची लॉन्च डेट सांगितली आहे.

Xiaomi ने घोषणा केली आहे कि Redmi K सीरीज टेक बाजारात विस्तारासाठी तयार आहे आणि सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन पुढल्या महिन्यातच लॉन्च केला जाईल. Xiaomi ने सांगितले आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात डिसेंबरच्या 10 तारखेला चीन मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचा आगामी स्मार्टफोन Redmi K30 जगासमोर सादर केला जाईल. Redmi ब्रँडचे जीएम Lu Weibing यांनी अधिकृत घोषणा केली आहे कि 10 डिसेंबरला Redmi K30 चीनी बाजारात लॉन्च होईल.

विशेष म्हणजे 10 डिसेंबरला कंपनी फक्त Redmi K30 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. तर Redmi K30 Pro कंपनी पुढच्यावर्षीच्या सुरवातीला लॉन्च करेल. 10 डिसेंबरला Redmi K30 फक्त चीनी बाजारातच लॉन्च होईल तसेच हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये कधी येईल याची माहिती मिळाली नाही. लक्षात असू दे कि Redmi K30 ब्रँडचा 5G फोन असेल, त्यामुळे 5G फोन भारतीय बाजारात येणे मोठे पाऊल असेल.

डुअल पंच-होल

Redmi K30 ब्रँडचा पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन असेल. लीक झालेल्या फोटो वरून समजले आहे कि या फोन मध्ये एक नाही तर दोन पंच-होल असतील म्हणजे डिस्प्लेच्या वरच्या बाजूला उजवीकडे स्क्रीन वर दोन होल दिले जातील ज्यात सेल्फी कॅमेरा सेंसर असेल. Redmi K30 ची डुअल पंच-होल डिजाईन आपण Samsung Galaxy S10 Plus स्मार्टफोन मध्ये पण बघितली आहे.

डिस्प्ले

Redmi K30 च्या या फोटो वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.66 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. Redmi K30 चा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल तसेच 395 डीपीआई ला सपोर्ट करेल. एकीकडे या स्मार्टफोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असल्याचे बोलले जात आहे तर इतर काही लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे कि Redmi K30 साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल.

स्टोरेज व प्रोसेसर

फोटो मध्ये Redmi K30 चा जो वेरिएंट दाखवण्यात आला आहे त्यात 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. बोलले जात आहे कि 64जीबी मेमरी असलेला हा वेरिएंट Redmi K30 चा बेस वेरिएंट असू शकतो. तसेच फोटो मध्ये स्पष्ट झाले आहे कि Redmi K30 क्वालकॉमच्या चिपसेट सह लॉन्च केला जाईल तसेच या डिवाईस वेरिएंट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730 या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट मिळू शकतो. Redmi K30 चा हा वेरिएंट एंडरॉयड 9 पाई सह मीयूआई 11 च्या 9.11.18 वर्जन सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन मध्ये ग्राफिक्स साठी एड्रेनो 618 जीपीयू आहे.

The post 10 डिसेंबरला लॉन्च होईल डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला Xiaomi चा 5G फोन Redmi K30 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-launch-date-confirmed-10-december-in-china-dual-punch-hole-120hz-display-sa-nsa-5g-support/feed/ 0
Redmi K30 चे काम सुरु, 5G सपोर्ट सह होईल लॉन्च : Lu Weibing https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-lu-weibing-redmi-k30-is-on-the-road-with-5g-support/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-lu-weibing-redmi-k30-is-on-the-road-with-5g-support/#respond Mon, 09 Sep 2019 12:18:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5259 Redmi K30 20,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल

The post Redmi K30 चे काम सुरु, 5G सपोर्ट सह होईल लॉन्च : Lu Weibing first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने जुलै मध्ये भारतात आपली Redmi सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Redmi K20 Pro आणि Redmi K20 लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन Redmi सीरीजचे पहिले पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेले स्मार्टफोन आहेत. दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले हे स्मार्टफोन्स भारतीय यूजर्सने खूप आवडले. Redmi K20 मॉडेल्सचे यश Xiaomi आता अजून वाढवू पाहत आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि शाओमी रेडमी के सीरीजच्या आगामी स्मार्टफोन Redmi K30 वर काम सुरु केले आहे आणि हा 5G सपोर्ट सह बाजारात येईल.

Redmi K30 संबंधित हि महत्वाची माहिती स्वतः रेडमीचे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी दिली आहे. वेइबिंग ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक पोस्ट करत लिहिले आहे कि, “5G has arrived. Don’t worry, Redmi K30 is already on the road”. या पोस्टच्या माध्यमातून रेडमी जीएम ने म्हणले आहेत कि 5G आला आहे आणि Redmi K30 पण येत आहे. आपल्या पोस्ट मध्ये वेइबिंग ने स्पष्ट केले आहे कि कंपनीने Redmi K30 ची निर्मती सुरु केली आहे आणि लवकरच हा फोन टेक मंचावर सादर केला जाईल.

फोन मध्ये असेल 5G सपोर्ट

एकीकडे Weibing ने Redmi K30 बद्दल सांगतिले आहे तर दुसरीकडे आपल्या पोस्ट द्वारे रेडमी जीएम ने हे पण स्पष्ट केले आहे कि रेडमी के सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन Redmi K30 5G सपोर्ट सह लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे क्वालकॉम ने नुकतेच आपल्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या चिपसेट मध्ये 5G सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे कि Redmi K30 क्वालकॉमच्या याच चिपसेट सह लॉन्च केला जाईल.

अशी असू शकते किंमत

किंमतीबद्दल बोलायचे तर Redmi K30 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा जास्त असेल. वेइबिंगच्या एका पोस्ट वर एका यूजरने Redmi K30 ची अंदाजे किंमत 2000 युआन म्हणजे जवळपास 20,000 रुपये आहे का असे विचारले होते त्याचे उत्तर देताना रेडमी जीएम म्हणाले होते कि 5G चिपसेट अजूनही महागच आहे. म्हणजे Redmi K30 20,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi K20 पण जास्त किंमतीत आल्यामुळे लोकांनी नाराजी दर्शवली होती.

इंडियन मार्केट मध्ये रेडमी के20 सीरीजचे दोन्ही मॉडेल 2 वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. Redmi K20 Pro पाहता हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तसेच फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. तर Redmi K20 चा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वाले वेरिएंटने 23,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली होती.

शाओमी रेडमी के20 प्रो वीडियो

The post Redmi K30 चे काम सुरु, 5G सपोर्ट सह होईल लॉन्च : Lu Weibing first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-lu-weibing-redmi-k30-is-on-the-road-with-5g-support/feed/ 0