स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आणि 8 जीबी रॅम सह लिस्ट झाला Redmi K30 Pro, हा असेल Xiaomi चा सर्वात पावरफुल फोन

काही दिवसांपूर्वी भारतीय सर्टिफिकेशन्स साइट ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) वर Xiaomi चा एक नवीन स्मार्टफोन Redmi K30 दिसला होता. बीआईएस वर लिस्ट झाल्यांनतर चर्चेला उधाण आले होते कि शाओमी भारतात पण आपल्या ‘रेडमी के’ सीरीजच्या विस्ताराची योजना बनावट आहे आणि सीरीजचा नवीन डिवाईस Redmi K30 येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात येईल. आता शाओमीच्या या सीरीजचा अजून एक फोन Redmi K30 Pro बेंचमार्किंग साइट वर आला आहे. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला आहे कि Xiaomi Redmi K30 Pro क्वॉलकॉमच्या आगामी सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 सह लॉन्च केला जाईल.

Xiaomi Redmi K30 Pro चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 21 जानेवारीची आहे ज्यात फोन शाओमी रेडमी के30 प्रो नावाने सबमिट केला केला गेला आहे. गीकबेंच लिस्टिंगने Redmi K30 Pro च्या लॉन्चची स्थिती स्पष्ट केली आहे तसेच या वेबसाइट वर फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Redmi K30 Pro

शाओमी रेडमी के30 प्रो गीकबेंच वर क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल आणि ऍडव्हान्स चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 सह दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे रेडमी के30 प्रो शाओमीचा पहिला फोन असू शकतो जो या ताकदवान चिपसेट वर लॉन्च होईल. त्याचबरोबर या फोन मध्ये एंडरॉयडचा नवीन ओएस एंडरॉयड 10 मिळेल. गीकबेंच वर Redmi K30 Pro 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह दाखवण्यात आला आहे जो 8 जीबी च्या दमदार रॅम सह येईल. स्कोर पाहता रेडमी के30 प्रो ला सिंगल-कोर मध्ये 903 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 3362 स्कोर मिळाला आहे.

Redmi K30

शाओमी रेडमी के30 बद्दल बोलायचे तर हा डिवाईस M2001G7AI मॉडेल नंबर सह ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड वर सर्टिफाइड केला गेला आहे. विशेष म्हणजे Redmi K30 दोनदा बीआईएस वर लिस्ट झाला आहे. डिसेंबर मध्ये लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 4G मॉडेल होता तर 9 जानेवारीला लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 5G मॉडेल असल्याचे बोलले जात आहे. भारतात 5G सर्विस अधिकृतपणे लॉन्च झाली नाही तर हि आता टेस्टिंग स्टेज वर आहे. पण जर Xiaomi ने Redmi K30 5G भारतात लॉन्च केला तर हा भारतातील पहिला 5जी स्मार्टफोन ठरेल.

Redmi K30 स्पेसिफिकेशन्स

Redmi K20 च्या अपग्रेड वर्जन रेडमी के30 मध्ये कंपनीने 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे जो होल-पंच डिजाइन सह येतो. Redmi K30 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 765 5जी प्रोसेसर सह येतो. या नवीन प्रोसेसरला 5जी सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर रेडमी के30 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स686 प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ ऑफ फिल्ड आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॉम्बिनेशन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

Redmi K30 4G मध्ये 64MP+2MP+2MP+8MP कॅमेरा सेटअप आहे. Redmi K30 मध्ये 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन चा 5जी मॉडेल 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येतो तर 4जी मॉडेल मध्ये 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येतो. Redmi K30 कधी भारतात येईल हे सांगता येत नाही. तर काही रिपोर्ट्स मध्ये अंदाज लावला जात आहे कि रेडमी के30 स्मार्टफोन भारतात POCO ब्रँडच्या अंतर्गत लॉन्च केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here