Xiaomi Redmi Note 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 29 Apr 2021 10:45:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi ने Redmi Note 10 ची वाढवली किंमत, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-price-hike-in-india-check-new-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-price-hike-in-india-check-new-price-and-specifications/#respond Thu, 29 Apr 2021 10:45:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10764 Redmi Note 10 स्मार्टफोनची नवीन किंमत पाहता या फोनचा बेस वेरिएंट आता 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यापूर्वी या फोनची किंमत 11,999 रुपये होती. त्याचबरोबर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल आता 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Xiaomi ने Redmi Note 10 ची वाढवली किंमत, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने Redmi Note 10 स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत 500 रुपयांची वृद्धी केली आहे. हि वाढलेली किंमत आज 29 एप्रिलपासून ऑफलाइन आणि ऑनलाइन मार्केटमध्ये लागू होईल. 91mobiles ला हि माहिती ऑफलाइन रिटेल सोर्सकडून मिळाली आहे. चायनीज स्मार्टफोन कंपनी शाओमीने Redmi Note 10 सीरीज मार्चमध्ये सादर केली आहे. कंपनीने या सीरीजचे तीन स्मार्टफोन Redmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max लॉन्च केले आहेत. शाओमीने Redmi Note 10 स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह 11,999 रुपयांमध्ये सादर केला होता. कंपनीने 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 13,999 रुपयांमध्ये सादर केला होता. स्मार्टफोनच्या वाढलेल्या किंमती Amazon वर पण लिस्ट करण्यात आले आहेत. शाओमीने Redmi Note 10 स्मार्टफोन AMOLED डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जला सपोर्ट आणि Qualcomm Snapdragon 678 SoC सह सादर केला आहे. (Xiaomi Redmi Note 10 Price hike in India check new price and specifications)

Redmi Note 10 ची नवीन किंमत

Redmi Note 10 स्मार्टफोनची नवीन किंमत पाहता या फोनचा बेस वेरिएंट आता 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यापूर्वी या फोनची किंमत 11,999 रुपये होती. त्याचबरोबर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल आता 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा : Apple iPhone 11 वर मिळत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, तरीही आहे हा तोट्याचा सौदा

Redmi Note 10 स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 10 स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz, मॅक्सिमम ब्राइटनेस 1100 निट्स आणि Corning Gorilla Glass 3 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. शाओमीच्या या फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी Qualcomm Snapdragon 678 SoC देण्यात आला आहे. फोनची इंटरनल स्टोरेज microSD कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, डुअल-बँड Wi-Fi, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Vivo V21 5G स्मार्टफोन शानदार डिजाइन, 44MP सेल्फी कॅमेरा आणि 4000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Redmi Note 10 स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये प्राइमरी कॅमेरा 48MP Sony IMX582 सेंसरसह 8MP अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 2MP चा मॅक्रो आणि डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13MP चा कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.

शाओमी रेडमी नोट 10 व्हिडीओ

The post Xiaomi ने Redmi Note 10 ची वाढवली किंमत, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-price-hike-in-india-check-new-price-and-specifications/feed/ 0
Redmi Note 10 फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च, यात आहे 48MP कॅमेरा, 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-price-in-india-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-price-in-india-specs-sale-offer/#respond Thu, 04 Mar 2021 11:54:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10261 Redmi Note 10 भारतात दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 11,999 रुपये आहे.

The post Redmi Note 10 फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च, यात आहे 48MP कॅमेरा, 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी Xiaomi ने आज मोबाईल बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एकसाथ तीन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. रेडमी नोट 10 सीरीजमधील हे स्मार्टफोन Redmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max नावाने लॉन्च झाले आहेत. सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेल मध्ये 108 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा देण्यात आला आहे तर सर्वात छोटा मॉडेल रेडमी नोट 10 48 मेगापिक्सल क्वॉड कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम आहे तसेच Redmi Note 10 ची किंमत फक्त 11,999 रुपयांपासून सुरु होत आहे. (redmi note 10 price in india specs sale offer)

Redmi Note 10

शाओमी रेडमी नोट 10 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 2400 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. त्याचबरोबर हा फोन 1100निट्स ब्राइटनेसला पण सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : मोबाईल फोन्सचे विश्व बदलण्यासाठी येत आहे फोल्डेबल iPhone, यात असेल 8-इंचाचा मोठा डिस्प्ले, जाणून घ्या कधी येईल बाजारात

Redmi Note 10 अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला गेला आहे जो मीयुआय 12 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 11एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 678 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 612 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX582 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : OPPO घेऊन येत आहे अजून एक नवीन 5G फोन Reno 5Z, मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरसह होईल लॉन्च

Xiaomi Redmi Note 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी जिथे फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 10 मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट्स व प्राइस

Redmi Note 10 भारतात दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 11,999 रुपये आहे. फोनचा मोठा वेरिएंट 6 जीबी रॅमवर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. याची किंमत 13,999 रुपये आहे. रेडमी नोट 10 येत्या 16 मार्चपासून Aqua Green, Shadow Black आणि Frost White कलर मध्ये विकत घेता येईल.

शाओमी रेडमी नोट 10 व्हिडीओ

The post Redmi Note 10 फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च, यात आहे 48MP कॅमेरा, 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10-price-in-india-specs-sale-offer/feed/ 0
Redmi Note 10 स्मार्टफोन 4,820एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट सह लवकरच होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-with-4820mh-battery-snapdragon-750g-soc-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-with-4820mh-battery-snapdragon-750g-soc-leaked/#respond Fri, 25 Sep 2020 15:14:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8316 Xiaomi संबंधित या मोठ्या लीक मध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे कि कंपनी आपला आगामी Mi 10T Lite स्मार्टफोन पण भारतात Redmi Note 10 नावाने आणू शकते.

The post Redmi Note 10 स्मार्टफोन 4,820एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट सह लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi द्वारे लॉन्च करण्यात आलेल्या Redmi Note 9 फक्त भारतात नाही तर अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये पण हिट झाला आहे. शाओमीने या सीरीज मध्ये Redmi Note 9, Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे मोबाईल यूजर्सना आवडले आहेत. आता शाओमी संबंधित एक नवीन बातमी येत आहे कि कंपनी आता अपनी ‘रेडमी नोट’ जेनरेशनच्या विस्ताराची योजना बनवत आहे कि ज्या अंतर्गत Redmi Note 10 सीरीज लॉन्च केली जाईल.

Redmi Note 10 ची माहिती एका लीकच्या माध्यमातून समोर आली आहे ज्यात या आगामी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर करण्यात आले आहेत. लीकनुसार शाओमी रेडमी नोट 10 मध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट वर लॉन्च केला जाईल. महत्वाची बाब म्हणजे हा चिपसेट 5G कनेक्टिविटी सह येईल. तसेच या फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,820एमएएच ची बॅटरी असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे.

Xiaomi संबंधित या मोठ्या लीक मध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे कि कंपनी आपला आगामी Mi 10T Lite स्मार्टफोन पण भारतात Redmi Note 10 नावाने आणू शकते. लक्षात घ्या, शाओमी येत्या 30 सप्टेंबरला आपली ‘मी 10टी’ सीरीज टेक मंचावर सादर करणार आहे. चर्चा अशी आहे कि या सीरीज मध्ये Xiaomi Mi 10T, Mi 10T Lite आणि Mi 10T Pro लॉन्च केला जाईल. हा ईवेंट भारतात संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी लाईव बघता येईल.

Redmi Note 9

रेडमी नोट 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. यूजर्सला चांगला अनुभव मिळावा म्हणून शाओमीने फोन डिस्प्ले मध्ये रिडिंग मोड 2.0 आणि सनलाईट मोड दिला आहे.

Xiaomi ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Redmi Note 9 मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. टेक मार्केंट मध्ये Redmi Note 9 पहिला फोन होता जो या चिपसेट सह लॉन्च झाला होता.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi Note 9 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. तसेच हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Xiaomi Redmi Note 9 रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 9 स्मार्टफोन मध्ये 22.5वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5020एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 9वॉट रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

The post Redmi Note 10 स्मार्टफोन 4,820एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट सह लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10-with-4820mh-battery-snapdragon-750g-soc-leaked/feed/ 0