मोबाईल फोन्सचे विश्व बदलण्यासाठी येत आहे फोल्डेबल iPhone, यात असेल 8-इंचाचा मोठा डिस्प्ले, जाणून घ्या कधी येईल बाजारात

Apple च्या फोल्डेबल iPhone बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि कंपनी यावर काम करत आहे. काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात सांगण्यात आले होते कि कंपनी Samsung Galazy Z Flip सारख्या clamshell डिजाइनवर नवीन iPhone सादर करेल आणि फोल्डेबल iPhone stylus सपोर्टसह येईल. आता पॉपुलर अनॅलिस्ट मिंग-ची कुओ (Ming-Chi Kuo) ने दावा केला आहे कि कंपनी साल 2023 मध्ये 7.5-8 इंचाच्या डिस्प्ले असलेला फोन लॉन्च केला जाईल. तसेच कंपनी 2023 मध्ये एक हाई-एन्ड iPhone मॉडेल notch-less, ऑल-स्क्रीन डिस्प्लेसह सादर करेल. बोलले जात आहे कि हा iPhone 11 चा उत्तराधिकारी पण असू शकतो, ज्याचा कंपनीला येणार खर्च $ 600 पेक्षा कमी असेल आणि यात 5G नेटवर्क सपोर्ट मिळेल. (apple foldable iphone punch hole iphone launch on 2023 ming chi kuo)

Apple Foldable iPhone

Kuo नुसार, जर ऍप्पल फोल्डेबल स्क्रीनचे मोठ्याप्रमाणात उत्पादन आणि टेक्नोलॉजीचे काही प्रश्न सोडवण्यास सक्षम आहे, त्यामुळे ऍप्पल वर्ष 2023 पर्यंत 8 इंचाच्या फोल्डेबल iPhone ची घोषणा करू शकते. फोल्डेबल स्क्रीनच्या आयफोनची हि काही पहिले बातमी नाही. अश्या अफवा यावर्षीच्या सुरुवातीला पण समोर आल्या होत्या. फोल्डेबल iPhone कोणत्या डिजाइनसह येईल हे मात्र अजून समजले नाही.

हे देखील वाचा : 8GB रॅम असलेला Xiaomi Mi 11 Lite वेबसाइटवर लिस्ट, 5G च्या ताकदीसह लवकरच होईल लॉन्च

Samsung ला देईल टक्कर

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार ऍप्पलचा फोल्डेबल स्मार्टफोन इतर ब्रँड्सच्या तुलनेत कमी किंमतीत येईल याचा लॉन्च थोडा लेट होईल. तसेच बोलले जात आहे कि जेव्हा Apple चा नवीन फोल्डेबल फोन मार्केट मध्ये येईल, तेव्हा सॅमसंगच्या गॅलेक्सी फोल्ड 2 सह याची टक्कर होईल.

पंच-होल असलेला iPhone

Kuo नुसार कंपनी ऑल-स्क्रीन नो-नॉच आयफोन पण सादर करू शकते. त्यांच्या मते हा डिवाइस 2023 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, फक्त याचे काम वेळेवर सुरु झाले पाहिजे. 2023 लाइन-अप मध्ये हा हाई-एन्ड iPhone एका अंडर-डिस्प्ले टच आयडी आणि एका पेरिस्कोप कॅमेऱ्यासह येईल. ऍप्पल 2022 मध्ये iPhone 13 प्रो मध्ये पंच-होल डिस्प्लेचा वापर करण्याची पण शक्यता आहे.

हे देखील वाचा : OPPO F19 सीरीज 8 मार्चला होईल भारतात लॉन्च, प्री-ऑर्डर झाली सुरु

iPhone 13 सीरीज मध्ये असतील 4 मॉडेल

तुम्हाला सांगू इच्छितो कि काही दिवसांपूर्वी टेक अनॅलिस्ट Ming-Chi Kuo यांनी माहिती दिली होती कि यावर्षी आयफोन 13 सीरीज मध्ये iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max सारखे स्मार्टफोन्स लॉन्च होतील, ज्यांच्या डिजाइन्स आणि स्पेसिफिकेशन्स खूप खास असतील.

ऍप्पल आयफोन 12 मिनी व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here