Xiaomi द्वारे लॉन्च करण्यात आलेल्या Redmi Note 9 फक्त भारतात नाही तर अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये पण हिट झाला आहे. शाओमीने या सीरीज मध्ये Redmi Note 9, Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे मोबाईल यूजर्सना आवडले आहेत. आता शाओमी संबंधित एक नवीन बातमी येत आहे कि कंपनी आता अपनी ‘रेडमी नोट’ जेनरेशनच्या विस्ताराची योजना बनवत आहे कि ज्या अंतर्गत Redmi Note 10 सीरीज लॉन्च केली जाईल.
Redmi Note 10 ची माहिती एका लीकच्या माध्यमातून समोर आली आहे ज्यात या आगामी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर करण्यात आले आहेत. लीकनुसार शाओमी रेडमी नोट 10 मध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट वर लॉन्च केला जाईल. महत्वाची बाब म्हणजे हा चिपसेट 5G कनेक्टिविटी सह येईल. तसेच या फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,820एमएएच ची बॅटरी असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे.
Redmi Note 10 With Snapdragon 750G 5G & 4820mAh Battery.
Mi 10T Lite (M2007J17G) Will Launch As Redmi Note 10 (M2007J17C) in China & May Be Launch in India ?? As Redmi Note 10 or Note 10 Pro Which is Already BIS Certified.
Source https://t.co/bdgWtB47FC pic.twitter.com/DhSzGZdton— Abhishek Yadav (@yabhishekhd) September 24, 2020
Xiaomi संबंधित या मोठ्या लीक मध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे कि कंपनी आपला आगामी Mi 10T Lite स्मार्टफोन पण भारतात Redmi Note 10 नावाने आणू शकते. लक्षात घ्या, शाओमी येत्या 30 सप्टेंबरला आपली ‘मी 10टी’ सीरीज टेक मंचावर सादर करणार आहे. चर्चा अशी आहे कि या सीरीज मध्ये Xiaomi Mi 10T, Mi 10T Lite आणि Mi 10T Pro लॉन्च केला जाईल. हा ईवेंट भारतात संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी लाईव बघता येईल.
Redmi Note 9
रेडमी नोट 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. यूजर्सला चांगला अनुभव मिळावा म्हणून शाओमीने फोन डिस्प्ले मध्ये रिडिंग मोड 2.0 आणि सनलाईट मोड दिला आहे.
Xiaomi ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Redmi Note 9 मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. टेक मार्केंट मध्ये Redmi Note 9 पहिला फोन होता जो या चिपसेट सह लॉन्च झाला होता.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi Note 9 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. तसेच हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Xiaomi Redmi Note 9 रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 9 स्मार्टफोन मध्ये 22.5वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5020एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 9वॉट रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.















