टेक ब्रँड टेक्नोनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन मोबाइल फोन TECNO CAMON 19 Pro 5G लाँच केला आहे. 64MP Camera, MediaTek Dimensity 810 चिपसेट आणि 33W Flash Charging पावर असलेला हा स्मार्टफोन टेक्नोनं 21,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात सादर केला आहे जो 13GB RAM ला सपोर्ट करतो. कंपनीनं स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट बाजारात सादर केला आहे. या प्राइस सेगमेंटमध्ये सॅमसंग, रेडमी, रियलमी सारख्या दिग्गज ब्रँड्ससह मोटोरोला आणि इनफिनिक्स सारख्या ब्रँड्सचे स्मार्टफोन्स देखील उपलब्ध आहेत. हा फोन 12 ऑगस्टपासून रिटेल स्टोर्सवर उपलब्ध होईल.
TECNO CAMON 19 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
- 6.8” FHD+ 120Hz डिस्प्ले
- 13GB RAM MediaTek Dimensity 810 चिपसेट
- 64MP Triple Camera with RGBW+(G+P) sensor
- 33W 5,000mAh Battery
टेक्नो कॅमोन 19 प्रो 5जी फोन 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 94.26 टक्के आहे. हा टेक्नो स्मार्टफोन Eco Black आणि Cedar Green कलरमध्ये विकत घेता येईल. फोनचा बॅक पॅनल ड्युअल टोन डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. टेक्नोचा हा लेटेस्ट हँडसेट Android 12 आधारित HiOS 8.6 वर चालतो. हे देखील वाचा: 150W फास्ट चार्जिंग आणि 16GB RAM सह दणकट OnePlus Ace Pro लाँच, पाहा याची पावर
TECNO CAMON 19 Pro 5G मध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 810 5जी चिपसेट देण्यात आला आहे जो मीडियाटेक हायपरइंजिन 2.0 सह चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी57 जीपीयू आहे. हा फोन 12 5G बँड्सना सपोर्ट करतो. हा टेक्नो मोबाइल 8GB रॅमला सपोर्ट करतो परंतु वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं एकूण 13जीबी रॅम पावर मिळवता येते. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी 512जीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी TECNO CAMON 19 Pro 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा OIS सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. जोडीला 2MP चा पोट्रेट सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी या टेक्नो मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. हे देखील वाचा: सर्व टॉप फिचर स्वस्तात! 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह येतोय Redmi चा किफायतशीर फोन
