Home बातम्या टेक्नो ने लॉन्च केले दोन नवीन फोन, 3जीबी रॅम सोबत डुअल कॅमेरा, किंमत 6699 रुपयांपासून सुरू

टेक्नो ने लॉन्च केले दोन नवीन फोन, 3जीबी रॅम सोबत डुअल कॅमेरा, किंमत 6699 रुपयांपासून सुरू

टेक कंपनी टेक्नो ने इंडियन मार्केट मध्ये आपले स्मार्टफोन्स वाढवत आज एक साथ दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. टेक्नो ने कॅमोन आईऐस 2 आणि आईऐस 2एक्स बाजारात आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स लो बजेट सेग्मेंट मध्ये आले आहेत. कमी किंमतीत टेक्नोचे स्मार्टफोन डुअल कॅमेरा आणि शानदार फीचर्स देत आहेत. टेक्नो ने कॅमोन आईऐस 2 6,699 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर कॅमोन आईऐस 2एक्स 7,599 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. चला एक नजर या दोन्ही स्वस्त स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स वर टाकूया:

टेक्नो कॅमोन आईएस 2
टेक्नो ने आपला हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटण नाही. फोन मध्ये 1440 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.5-इंचाचा एचडी+ फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. कंपनी ने हा फोन हाईओएस 4.1 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम दिला आहे. हा फोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंन्त वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टेक्नो चा हा स्मार्टफोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि सेकेंडरी वीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

कॅमोन आईएस 2 एक 4जी फोन आहे तसेच यात एक साथ 2 सिम कार्ड सह 1मेमरी कार्ड वापरता येतो. फोन मध्ये सिक्योरिटी साठी फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3050एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

टेक्नो कॅमोन आईएस 2एक्स
कॅमोन आईएस 2एक्स कंपनी ने आईएस 2 सारख्याच डिस्प्ले आणि कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला आहे. कॅमोन आईएस 2एक्स कंपनी ने 3जीबी रॅम सह आणला आहे. या फोनची इंटरनल स्टोरेज पण 32जीबी आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. कॅमोन आईएस 2 मध्ये फक्त ​फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे पण कॅमोन आईएस 2एक्स मध्ये फेस अनलॉक व्यतिरिक्त ​रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.

टेक्नो कॅमोन आईएस 2 मीडनाइट ब्लॅक, शेंपेन गोल्ड आणि सिटी ब्लू कलर मध्ये विकत गेट येईल तर कॅमोन आईएस 2एक्स कंपनी ने मीडनाइट ब्लॅक आणि शेंपेन गोल्ड सह नेबुला ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला आहे.