Tecno काही दिवसांपासून स्वस्तात मोठी बॅटरी आणि डिस्प्ले असलेले फोन लॉन्च करत आहे. कंपनीने गेल्या महिन्यात भारतात आपल्या ‘स्पार्क सीरीज’ अंतर्गत Tecno Spark Power 2 लॉन्च केला होता. तर आज कंपनीने या सीरीज मध्ये Spark 6 Air लॉन्च केला आहे. फोन किंमत आणि फीचर्स सह अमेझॉन इंडिया वर लिस्ट झाला आहे. हा डिवाइस 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सपोर्ट सह येतो. फोनच्या लॉन्च आधी कंपनीने यूजर्सची उत्सुकुता कायम ठेवण्यासाठी अधिकृत ट्विटर हँडल वरून पण एक विडियो पोस्ट केला होता.
किंमत आणि उपलब्धता
Tecno Spark Power 2 प्रमाणे कंपनीने Tecno Spark 6 Air पण बजेट कॅटेगरी मध्ये लॉन्च केला आहे. स्पार्क 6 एयरची किंमत 7,999 रुपये आहे, जो कंपनी अमेझॉन इंडिया वर 6 ऑगस्टला विक्रीसाठी सादर करेल. अमेझॉन इंडियाच्या वेबसाइट वर 6 ऑगस्टला Prime Day विक्री आयोजित होणार आहे. ई-कॉमर्स कंपनी Amazon वर आयोजित होणाऱ्या प्राइम डे सेल मध्ये वेगवेगळ्या स्मार्टफोन्स वर 40 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे.
स्पेसिफिकेशन्स
टेक्नो स्पार्क 6 एयर बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.6 टक्के आहे. कंपनीने हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 7 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह येतो. तसेच स्क्रीनच्या वरच्या बाजूला छोटीशी ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे.
Tecno Spark 6 Air कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो हाईओएस वर चालतो. फोन मध्ये Mediatek Helio A22 चिपसेट Quad Core-2GHz CPU देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी सेगमेंट पाहता टेक्नो स्पार्क 6 एयर मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा एआई प्राइमरी सेंसर अपर्चर F1.8 सह आहे. तसेच फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि बोके मोड आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर अपर्चर (f/2.0) सह 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Tecno Spark 6 Air एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.
