टेक्नोने आपले स्पार्क सीरीज उत्पादन पोर्टफोलिओ ला पुढे घेऊन एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Tecno Spark Go 1 या नावाने याला बजेट रेंजमध्ये जागतिक स्तरावर प्रवेश मिळाला आहे. फोनमध्ये वापरकर्त्यांना 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, Unisoc T615 प्रोसेसर, व्हर्च्युअल तंत्रज्ञानाच्या मदतीने 8GB पर्यंतची रॅम, 5000mAh ची बॅटरी असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. चला, पुढे मोबाईलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Tecno Spark Go 1 चे स्पेसिफिकेशन
- 6.67 इंचाचा HD+ डिस्प्ले
- Unisoc T615 चिपसेट
- 4GB रॅम +4GB व्हर्च्युअल रॅम
- 128GB इंटरनल स्टोरेज
- 13 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा
- 5000mAh बॅटरी
- IP54 रेटिंग
डिस्प्ले: Techno Spark Go 1 फोनमध्ये 6.67 इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला गेला आहे. त्यावर पंच-होल कटआऊट डिझाईन मिळत आहे. ही स्क्रीन ग्राहकांना HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट देत आहे. एवढेच नाही तर या डिव्हाईसमध्ये डायनॅमिक पोर्ट फीचर देखील आहे. ज्याच्या मदतीने नोटिफिकेशन्स, चार्जिंग स्टेटस आणि इतर महत्त्वाची माहिती पाहता येईल.
चिपसेट: Tecno Spark Go 1 एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन मध्ये ब्रँडने Unisoc T615 चिपसेट ऑफर केला आहे. हे स्वस्त बजेटमध्ये चांगले मानले जाते. याच्या मदतीने तुम्ही मल्टी टास्किंगसह गेमिंगचाही आनंद घेऊ शकता.
स्टोरेज आणि रॅम: मोबाईलमध्ये कंपनीने 4GB RAM + 4GB व्हर्च्युअल रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेजची सुविधा दिली आहे. एकूणच वापरकर्त्यांना कमी किमतीत 8GB पर्यंत रॅम वापरण्याची संधी मिळेल. यासोबतच फोटो आणि व्हिडिओसह फाईल्स जतन करण्यासाठी आणि ॲप्ससाठी चांगली मेमरी दिली गेली आहे.
कॅमेरा: कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Tecno Spark Go 1 एलईडी फ्लॅशसह मागील पॅनेलवर 13 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. त्याचवेळी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा लावण्यात आला आहे.
बॅटरी: फोनला चालवण्यासाठी कंपनीने यात 5000mAh ची मोठी बॅटरी वापरली आहे. तर तिला चार्ज करण्यासाठी 15 वॉट चार्जिंग सपोर्ट दिला जात आहे. युजर्स टाईप सी-पोर्टद्वारे फोन चार्ज करु शकतील.
इतर: इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Tecno Spark Go 1 मध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, पाणी आणि धूळ प्रतिरोधक IP54 रेटिंग सारखे अनेक फिचर्स मिळतात. ब्रँडचा दावा आहे की हा फोन 4 वर्षांपर्यंत उत्कृष्ट कार्यक्षमतेसह चालवता येऊ शकतो.
Tecno Spark Go 1 ची किंमत आणि रंग
Tecno Spark Go 1 डिव्हाईसला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर सूचीबद्ध केले गेले आहे. त्याची किंमत लवकरच शेअर केली जाऊ शकते. तथापि फिचर्स पाहता हे स्वस्तात लाँच केले जाऊ शकते असे दिसत आहे. कलर पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर मोबाईल स्टारट्रेल ब्लॅक आणि ग्लिटरी व्हाईट अशा दोन पर्यायांमध्ये विकला जाईल.
