इंडियन स्मार्टफोन बाजारात सध्या लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये 4,000 एमएएच बॅटरी नेहमीचीच झाली आहे. लो बजेट स्मार्टफोन्स मध्ये पण 4,000एमएएच आणि त्यापेक्षा जास्त बॅटरी मिळते. पण आज मोठ्या बॅटरीच्या चाहत्यांसाठी भारतीय बाजारात नवीन भेट आली आहे. टेक कंपनी TECNO ने भारतात नवीन स्मार्टफोन सादर केला आहे जो 6000mAh च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो. फोनची बॅटरी जितकी जास्त आहे, याची किंमत तेवढीच कमी आहे. टेक्नो कंपनीने हा नवीन फोन Tecno Spark Power नावाने फक्त 8,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.
Tecno Spark Power ची सर्वात मोठी यूएसपी या फोनची मोठी बॅटरीच आहे. कंपनीने हा डिवाईस 6,000एमएएच च्या दमदार बॅटरी सह बाजारात आणला आहे. फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी मोठी माइक्रो यूएसबी पोर्ट आहे जो ओटीजी चे पण काम करतो. Tecno Spark Power मध्ये कोणताही फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही. यूएसबी पोर्ट सह फोनच्या लोवर पॅनल वर स्पीकर आणि 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे.
ट्रिपल रियर कॅमेरा
Tecno Spark Power चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Tecno Spark Power 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा: Exclusive: पंच-होल डिस्प्ले डिजाइन सह भारतात लॉन्च होईल Vivo V17
Tecno Spark Power
फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता Tecno Spark Power 720 x 1548 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.35 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले सह सादर केला गेला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा स्मार्टफोन हाईओएस 5.5 आधारित एंडरॉयड 9 पाई सह लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.
Tecno Spark Power भारतात 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. Spark Power एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा डिवाईस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.
हे देखील वाचा: Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट
Tecno Spark Power कंपनीने 8,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा डिवाईस शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर लिस्ट करण्यात आला आहे तसेच फोन येत्या 1 डिसेंबर पासून या वेबसाइट वर सेल साठी उपलब्ध होईल. Tecno Spark Power Dawn Blue आणि Alphenglow Gold कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.
