Home बातम्या टेक्नो घेऊन येत आहे आपला पहिला नॉच डिस्प्ले वाला फोन, डुअल रियर कॅमेरा असेल यात

टेक्नो घेऊन येत आहे आपला पहिला नॉच डिस्प्ले वाला फोन, डुअल रियर कॅमेरा असेल यात

कमी किंमत आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या स्मार्टफोन्स बद्दल बोलायचे झाले तर या यादीत टेक कंपनी टेक्नो चे नाव सर्वात वर येते. टेक्नो ने गेल्या महिन्यात आपल्या कॅमोन आई सीरीज मध्ये एक साथ दोन स्मार्टफोन कॅमोन आई ऐस आणि कॅमोन आई स्काई2 स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे फोन क्रमश: 6,799 रुपये तसेच 7,499 रुपयांमध्ये बाजारत सेल साठी उपलब्ध आहेत. तसेच टेक्नो कंपनी आता पुन्हा एकदा आपल्या यूजर्स साठी नवीन भेट घेऊन येत आहे आणि ही भेट असेल कंपनीचा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन.

91मोबाईल्सला बातमी मिळाली आहे की टेक्नो लवकरच भारतीय बाजारात आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन कंपनी द्वारा लॉन्च केला जाणारा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन असेल जो ​एका नवीन स्मार्टफोन सीरीज अंतर्गत लॉन्च केला जाईल. जरी कंपनी ने अजून या फोनचे नाव सांगितले नसले तरी आम्हाला टेक्नो च्या या आगामी स्मार्टफोन चे फोटो मिळाले आहे ज्यावरून फोनच्या लुक व डिजाईन ची माहिती मिळाली आहे. हा फोन आयफोन 10 प्रमाणे बेजल लेस नॉच डिस्प्ले सह येईल.

टेक्नो च्या या आगामी फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल जो वर्टिकल शेप मध्ये असेल. या रियर कॅमेरा सेटअप च्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर असेल तसेच या सेंसर च्या खाली टेक्नो चा ब्रँड लोगो असेल. फोनचा डिस्प्ले पाहता यात बेजल लेस डिस्प्ले असेल ज्यावर नॉच ​देण्यात येईल. या फोनचे तिन्ही बाजू पूर्णपणे बेजल लेस असतील आणि खालच्या बाजूला बॉडी पार्ट देण्यात आला आहे.

टेक्नो फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात येईल तसेच खालच्या पॅनल वर हेडफोन जॅक आहे. टेक्नो कडून अजूनतरी फोन ची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत टेक्नो आपला हा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये आॅफिशियली लॉन्च करेल. आशा आहे की टेक्नो चा हा आगामी स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च होईल.