Home बातम्या एयरटेल यूजर्सच्या अडचणी वाढल्या, कंपनीने वाढवली या पॅकची किंमत

एयरटेल यूजर्सच्या अडचणी वाढल्या, कंपनीने वाढवली या पॅकची किंमत

भारती एयरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. कंपनीने आपल्या दोन ऍड-ऑन कनेक्शन्सची किंमत वाढवली आहे. 149 रुपये दरमहा किंमत असलेल्या ऍड-ऑनची किंमत आता वाढून 249 रुपये झाली आहे. कंपनीची किंमतवाढ एयरटेलच्या अधिकृत वेबसाइट वर पण लाइव झाली आहे. याचा परिणाम पोस्टपेड कस्टमर्स वर होईल.

विशेष म्हणजे फक्त रेग्युलर ऍड-ऑन प्लान्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. हि किंमत 249 रुपये दरमहा पासून सुरु होईल आणि डेटा ऍड-ऑन अधिप्रमाणे 99 रुपये दरमहा पासून सुरु होतील. एयरटेल रेग्युलर आणि डेटा ऍड-ऑन पोस्टपेड यूजर्ससाठी ऑफर करत आहे आणि हे प्लान्स 749 रुपये दरमहा पासून सुरु होतात.

अलीकडेच कंपनीने चार नवीन 648 रुपये, 755 रुपये, 799 रुपये आणि 1,199 रुपयांचे इंटरनेशनल रोमिंग प्लान सादर केले होते. हे सर्व इंटरनेशनल रोमिंग प्लान एयरटेलच्या वेबसाइट वर लिस्टेड आहेत. या प्लान मध्ये हाई-स्पीड डेटा आणि एसएमएस चा लाभ मिळेल. 648 रुपयांच्या रिचार्ज प्लान बद्दल बोलायचे तर यात 100 मिनिटे इनकमिंग कॉल, 100 मिनिटे वॉयस कॉल (भारतासाठी) आणि 100 फ्री SMS प्रति दिन मिळतील. हा प्लान ब्राजील, ईरान, इराक, जापान, जॉर्डन, नेपाळ, पॅलेस्टाईन, कतार, रशिया आणि सौदी अरेबियासाठी उपलब्ध होईल.

तर अल्बानिया, बेल्जियम, चीन, इजिप्त, फ्रांस, इंडोनेशिया, नॉर्वे, स्पेन, यूके आणि यूएससाठी 649रुपयांचा प्लान आहे, ज्यात 648 रुपयांचे फायदे मिळतात. तसेच एयरटेलच्या 755 रुपयांच्या इंटरनेशनल रोमिंग प्लान मध्ये फक्त इंटरनेट मिळेल. या प्लान मध्ये यूजर्सना पाच दिवसांसाठी 1जीबी डेटा मिळेल. हा प्लान अल्बानिया, बहामास, भूतान, कॅनडा, हॉंगकॉंग, ईराण, इटली, कोरिया, मेक्सिको, नेपाळ, न्युझीलँड, श्रीलंका, थाईलँड, ब्रिटेन आणि अमेरिका सारख्या देशांसाठी उपलब्ध होईल.

तसेच एयरटेलच्या 799 रुपयांच्या प्लान मध्ये 100 मिनिटे लोकल आउटगोइंग आणि इनकमिंग कॉलसाठी मिळतील. हा प्लान अल्बानिया, बहामास, भूतान, कॅनडा, हॉंगकॉंग, ईराण , इटली, कोरिया, मेक्सिको, नेपाळ, न्युझीलँड, श्रीलंका, थाईलँड, ब्रिटेन आणि अमेरिका सारख्या देशांसाठी उपलब्ध होईल. तर 1,199 रुपयांच्या इंटरनेशनल रोमिंग प्लान मध्ये यूजर्सना 1GB डेटा आणि 100 मिनिटे लोकल आउटगोइंग कॉल आणि इनकमिंग कॉल्स मिळतील. हा प्लान 755 आणि 799 रुपयांच्या प्लान मधील देशांमध्ये वैध असेल.