मोबाईल मार्केट डेटा आणि ऍनालिटिक्स फर्म ऍप यांनी काही दिवसांपूर्वी (2010 ते 2019) या दशकात लोकप्रिय ठरलेल्या ऍप्सची लिस्ट प्रसिद्ध केली होती, ज्यात वीडियो मेकिंग ऍप टीकटॉक सातव्या नंबर वर होता. आता याच्या यूजर्ससाठी खुशखबर आहे. Tiktok संबंधित बातमी समोर आली आहे, ज्यानुसार साल 2019 मध्ये हा ऍप जगातील दुसरा सर्वात जास्त डाउनलोड केला गेलेला मोबाईल ऍप्लिकेशन बनला आहे.
Sensor Tower च्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी Whatsapp नंतर जगात सर्वात जास्त टिक-टॉक डाउनलोड केला गेला आहे. टिक-टॉक ऍपने फेसबुक सारख्या ऍपला मागे टाकत दुसरा नंबर मिळवला आहे. फेसबुक आणि मेसेंजर ऍप क्रमश: तिसऱ्या आणि चौथ्या नंबर वर होते. रिपोर्टनुसार साल 2019 च्या चौथ्या तिमाहीत या ऍपला 220 मिलियन डाउनलोड्स मिळाले आहेत, जे याआधीच्या तिमाहीचे तुलनेत 24 टक्के जास्त आहेत. रिपोर्ट मध्ये असे सांगण्यात आले आहे कि टिक-टॉकच्या कमाईत 540 टक्क्यांची वृद्धी दिसली आहे.
विशेष म्हणजे 2019 मध्ये या ऍप वर बंदी आली होती. पण काही दिवसांनी हा पुन्हा प्ले स्टोर वर डाउनलोडसाठी उपलब्ध करण्यात आला होता. ByteDance या कंपनीने TikTok साल 2017 मध्ये लॉन्च केला गेला होता. त्यामुळे कमी काळात दुसरे स्थान पटकावणे मोठी बाब आहे. TikTok चा वापर जगभरात सर्वात जास्त भारतात केला जातो. भारतीयांना TikTok इतका आवडतो कि त्यांनी TikTok च्या होम मार्केट म्हणजे चीन मधील मागणीला मागे टाकले आहे.
गेल्या वर्षी TikTok च्या पॅरेंट कंपनी ByteDance ने आपला स्वतःचा स्मार्टफोन बाजारात सादर केला होता. कंपनीने हा स्मार्टफोन Jianguo Pro 3 नावाने अधिकृतपणे सादर केला होता. हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये Nut Pro 3 नावाने प्रेजेंट केला गेला होता.
फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Jianguo Pro 3 म्हणजे Nut Pro 3 वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो बेजल लेस डिस्प्ले सह ‘यू’ शेप नॉचला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.39 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन सिक्योरिटी व अनलॉकिंगसाठी Jianguo Pro 3 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सह येतो.
