Home बातम्या TikTok ला धक्का, गूगल प्लेस्टोर आणि ऍप्पल ऍप स्टोर ने काढून टाकला हा ऍप

TikTok ला धक्का, गूगल प्लेस्टोर आणि ऍप्पल ऍप स्टोर ने काढून टाकला हा ऍप

प्रसिद्ध विडियो मेकिंग ऍप TikTok सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. पण आता समोर वर आलेल्या बातमीने TikTok यूजर्सना धक्का बसू शकतो कारण गूगल आणि ऍप्पल ने आपापल्या प्लॅटफॉर्म वरून हा काढून टाकला आहे. पण ज्या लोकांनी आधीच TikTok ऍप डाउनलोड केला आहे, ते आपल्या स्मार्टफोन वर याचा वापर करू शकतील.

काही दिवसांपूर्वी TikTok वर ​अश्लीलता पसरवण्याचा आरोप करत मद्रास हायकोर्टाने याला बॅन करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली होती. याआधी TikTok ने मद्रास हायकोर्टाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील पण केली होती, जी फेटाळ्यण्यात आली होती. मद्रास हायकोर्टाने निकाल देताना म्हटले होते कि हे ऍप मुलांवर वाईट परिणाम करत असून पॉर्नोग्राफीला प्रोत्साहन देत आहे.

सोबत यूजर्सना लैंगिक हिंसक बनवत आहे. अश्लील कंटेट ऍप वर शेयर करण्याचा आरोप करत या ऍपच्या विरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर कोर्टाने आपला निकाल दिला.

विशेष म्हणजे यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत ऍप स्टोर आणि गूगल प्ले स्टोर मध्ये TikTok जगभरात तिसरा सर्वात जास्त इंस्टॉल केला जाणारा ऍप बनला होता. मागच्या तिमाहीत पण याची रँकिंग इतकीच होती. TikTok ने मार्चच्या तिमाहीत 18.8 कोटी नवीन यूजर मिळवले ज्यात भारताचा वाटा 8.86 कोटी यूजर्सचा होता.

Bytedance Technology ने आधीचा बॅन काढून टाकण्यासाठी कोर्टात अपील केली होती जी फेटाळून देण्यात आली. भारत TikTok ऍप साठी मोठा बाजार आहे, त्यामुळे कंपनीच्या बिजनस वर परिणाम होईल.