भारतीय मोबाइल बाजारासाठी सप्टेंबर महिना खूप आनंदाचा ठरला आहे. या कालावधीत एन्ट्री लेव्हल डिव्हाईसेसपासून ते प्रीमियम फ्लॅगशिप फोनपर्यंत सर्व काही बाजारात लाँच झाले आहेत. आता या महिन्याचा शेवटचा आठवडा 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत अनेक नवीन स्मार्टफोन्सचा साक्षीदार बनणार आहे. या आठवड्यात Samsung आपला प्रीमियम फोन आणणार आहे, Tecno 10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये नवीन भागीदार आणणार आहे आणि Vivo V सीरीज देखील आपली जादू दाखवेल. या सर्व आगामी फोनचे तपशील तुम्ही पुढे वाचू शकता.
भारतातील आगामी मोबाईल फोन
Samsung Galaxy M55s 5G
लाँच तारीख – 23 सप्टेंबर
किंमत – 23,999 रुपये (अंदाजे)
Samsung Galaxy M55S स्मार्टफोन 23 सप्टेंबर रोजी मिड-बजेट सेगमेंटमध्ये प्रवेश करेल. यात 6.7 इंचाचा एफएचडी+ sAMOLED+ डिस्प्ले मिळेल जो 120Hz रिफ्रेश रेटवर काम करेल. हा मोबाईल 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलच्या ओआयएस बॅक कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीकवर विश्वास ठेवला तर सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट दिला जाऊ शकतो ज्यासोबत 8 जीबी रॅम मिळेल. तर पॉवर बॅकअपसाठी 45 वॉट चार्जिंगने सुसज्ज असलेली 5,000 एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.
Tecno POP 9 5G
लाँच तारीख – 24 सप्टेंबर
किंमत – 9,499 रुपये (अंदाजे)
Techno Pop 9 5G फोन 24 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होईल, ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी राहील. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, हा मोबाईल मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेटवर काम करेल ज्यामध्ये 4 जीबी रॅम सोबत 4 जीबी व्हर्चुअल रॅम देखील मिळेल. तर फोटोग्राफीसाठी यात 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला जाईल. समोर आलेल्या माहितीनुसार TECNO POP 9 5G फोन 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या एचडी+ स्क्रीनवर लाँच होईल.
Vivo V40e
लाँच तारीख – 25 सप्टेंबर
किंमत – 25,999 रुपये (अंदाजे)
Vivo V40e 25 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होईल, जो V40 आणि V40 Pro नंतर या सीरीजमधील तिसरा मोबाईल असेल. आपल्या कॅमेऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या Vivo स्मार्टफोन सीरीज V40e मध्ये देखील 50 मेगापिक्सेलचा एक मजबूत फ्रंट कॅमेरा देण्यात येणार आहे. यासोबत बॅक पॅनलवर ओआयएस+ ईआयएस फिचर्स असलेला 50 मेगापिक्सेलचा एआय कॅमेरा मिळेल. चर्चा आहे की हा मोबाईल मीडियाटेक डायमेंसिटी 7300 chipset वर लाँच होऊ शकतो. तर पॉवर बॅकअपसाठी यात 5,500 एमएएच ची बॅटरी दिली जाईल जी 80 वॉट फास्ट चार्जिंगसह काम करेल.
