Home टॉप कलेक्शन Vi चा 107 की Airtel चा 109 रुपयांचा प्लॅन, जाणून घ्या कोणता आहे तुमच्यासाठी बेस्ट

Vi चा 107 की Airtel चा 109 रुपयांचा प्लॅन, जाणून घ्या कोणता आहे तुमच्यासाठी बेस्ट

Airtel नं भारतीय बाजारात 109 रुपयांचा प्लॅन लाॅन्च केल्यावर VI नं त्याला 107 रुपयांचा प्लॅन सादर करून उत्तर दिलं. यावरून भारतीय टेलिकॉम बाजारातील स्पर्धा तुमच्या लक्षात आली असेल. सर्वात खास बाब अशी की या कंपन्यांनी हे प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह लाँच केले आहेत. युजर्स गेली कित्येक वर्ष तक्रार करत होते की, मंथली प्लॅन 28 दिवसांचा नव्हे तर 30 दिवसांचा असावा आणि आता कंपन्यांनी कमी किंमतीत 30 दिवसांचे मंथली प्लॅन लाँच केले आहेत. आता प्रश्न निर्माण होतो की यातील कोणता प्लॅन बेस्ट आहे. Airtel चा 109 रुपयांचा प्लॅन निवडावा की VI चा 107 रुपयांचा प्लॅन घ्यावा. पुढे आम्ही या दोन्ही प्लॅनबाबत सविस्तर माहिती दिली आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःहून ठरवू शकाल की कोणता प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे.

Airtel Rs 109 vs Vi Rs 107 Plan

एयरटेलनं सादर केलेल्या चारही नवीन रिचार्ज प्लॅन्समध्ये 109 रुपयांच्या प्लॅन सर्वात स्वस्त आहे. हा एक Smart Pack आहे जो 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या स्मार्ट पॅकमध्ये 109 रुपयांचा रिचार्ज केल्यावर एयरटेल युजर्सना 99 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. प्लॅनमध्ये कॉलिंग फ्री नाही तसेच लोकल व एसटीडी नंबरवर कॉल केल्यास 2.5 पैसे प्रति सेकंड दराने शुल्क आकारले जाते. हा कॉल रेट 30 दिवस कायम असतो. तसेच कंपनीकडून 200 एमबी डेटा देखील दिला जात आहे.

वोडाफोनचा 107 रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन देखील एयरटेलच्या 109 रुपयांच्या स्मार्ट पॅक प्रमाणे 30 दिवसांची वॅलिडिटी देतो. या वी पॅकचा रिचार्ज केल्यावर युजर्सना 107 रुपयांचा टॉकटाइम मिळतो जो 30 दिवस वापरता येतो. दरम्यान व्हॉइस कॉलिंग रेट 2.5p/sec असेल जो लोकल व एसटीडी दोन्ही प्रकारच्या नंबर्ससाठी असेल. तसेच इंटरनेट यूजसाठी कंपनी एकूण 200MB Data देत आहे. या प्लॅनमध्ये SMS मोफत मिळत नाहीत.

Vi आणि Airtel पैकी कोण पुढे

एयरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या वरील दोन्ही प्लॅन्सची तुलना केल्यास स्पष्ट दिसते की Airtel चा रिचार्ज प्लॅन Vi च्या तुलनेत 2 रुपयांनी महाग आहे. इतकेच नव्हे तर एयरटेल कंपनी युजर्सकडून दोन रुपये जास्त घेत आहे परंतु टॉकटाइमच्या बाबतीत देखील एयरटेल विआयपेक्षा महाग आहे. Airtel मध्ये 109 रुपये देऊन 99 रुपयांचा टॉकटाईम मिळत आहे तर Vi 107 रुपयांमध्ये पूरे 107 रुपयांचा बॅलेन्स देत आहे.

Airtel Rs 111 vs Vi Rs 111 Plan

एयरटेलचा 111 रुपयांचा प्लॅन देखील एक Smart Pack आहे जो 1 महिन्याच्या वॅलिडिटीसह येतो. महिन्याच्या ज्या तारखेला या पॅकचा रिचार्ज केला जाईल तिथून सुरु होईल पुढील महिन्याच्या त्याच तारखेपर्यंत हा अ‍ॅक्टिव्ह असेल. म्हणजे हा पॅक 30 दिवस आणि 31 दिवसांपर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहू शकतो. या स्मार्ट पॅकमध्ये 111 रुपयांच्या रिचार्जवर 99 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. तसेच कॉलिंगसाठी 2.5 पैसे प्रति सेकंड या हिशोबाने शुल्क आकारले जाईल. एयरटेल युजर्सना या पॅकमध्ये 200 एमबी डेटा मिळतो.

वोडाफोन आयडिया म्हणजे विआयचा 111 रुपयांचा प्लॅन मोठ्याप्रमाणावर एयरटेल सारखाच आहे परंतु एका पॉईंटमुळे हा एयरटेलपेक्षा वरचढ आहे. Vi च्या 111 रुपयांचा प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स पाहता यात देखील 31 दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये देखील फ्री कॉलिंग मिळत नाही तसेच व्हॉइस कॉल रेट 2.5p/sec आहे. कंपनीकडून युजर्सना एकूण 200 MB Data दिला जात आहे जो 31 दिवस वापरता येईल.

Airtel की Vi

एयरटेल आणि वोडाफोन आयडिया दोन्ही कंपन्यांनी एकाच किंमतीत आपले रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. दोन्ही कंपन्यांचा प्लॅन 111 रुपयांचा आहे. तसेच दोन्ही प्लॅन्समध्ये वॅलिडिटी देखील 31 दिवसांची मिळते. डेटा बेनिफिट देखील Airtel आणि Vi चे एकसारखे आहेत अर्थात 200एमबी डेटा मिळतो. लेकिन टॉकटाइमच्या बाबतीत वी एयरटेलला मागे टाकते. एयरटेल 111 रुपयांमध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम देत आहे तर वीच्या पॅकमध्ये 111 रुपयांमध्ये 111 रुपयांचा टॉकटाइम मिळत आहे. म्हणजे Airtel च्या तुलनेत 12 रुपये जास्त टॉकटाइम.