Home बातम्या Vodafone Idea 3 महिन्यासाठी मोफत देत आहे Disney Plus Hotstar सब्सक्रिप्शन, प्लॅनमध्ये केला बदल

Vodafone Idea 3 महिन्यासाठी मोफत देत आहे Disney Plus Hotstar सब्सक्रिप्शन, प्लॅनमध्ये केला बदल

Highlights
  • 839 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल झाला आहे.
  • प्लॅनमध्ये Vi अ‍ॅपच्या एक्सक्लूसिव्ह बेनेफिट्सचा समावेश करण्यात आला आहे.
  • ह्या रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा मिळतो.

जर तुम्ही वोडाफोन आयडियाचे युजर असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कंपनीनं आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शानदार ऑफर सादर केली आहे. आता वी आपल्या 839 रुपयांच्या रिचार्जसह मोफत 3 महिन्यांसाठी Disney Plus Hotstar चं सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे. पुढे तुम्हाला ऑफर आणि प्लॅनची माहिती मिळेल.

वोडाफोन आयडियाचा 839 रुपयांचा प्लॅन कोणताही नवीन रिचार्ज नाही तर कंपनीनं आपल्या जुन्या अनलिमिटेड रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत. त्यानंतर त्याच किंमतीत ग्राहकांना जास्त बेनेफिट्स दिले जात आहेत. ह्या प्लॅनमध्ये कंपनीनं आता 3 महिन्यासाठी Disney Plus Hotstar चं फ्री सब्सक्रिप्शन देखील जोडलं आहे.

असं मिळेल फ्री Disney Plus Hotstar

ह्या प्लॅनचा फायदा तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही VI ऑफिशियल अ‍ॅपवरून 839 रुपयांचा रिचार्ज कराल. हा प्लॅन Vi अ‍ॅप मध्ये मिळणाऱ्या एक्सक्लूसिव्ह बेनेफिट्समध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्स बाबत सर्वकाही.