वीवो ने भारतीय बाजारात नॉच डिस्प्ले ची सुरवात कंपनी ने हाईएंड स्मार्टफोन वी9 सोबत केली होती. वीवो वी9 नंतर कंपनी ने देशात वी9 यूथ पण लॉन्च केला आहे. तसेच आता नॉच डिस्प्ले स्मार्टफोन सीरीज पुढे नेत कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन बाजारात घेऊन येणार आहे. वीवो चा अजून एक नवीन स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे ज्यातून नवीन फोन चे स्पेसिफिकेशन्स आणि यासंबंधी महत्वाची माहिती समोर आली आहे.
वीवो चा नवीन स्मार्टफोन गीकबेंच वर वीवो 1850 मॉडल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोन च्या रॅम व प्रोसेसर संबधित माहिती देण्यात आली आहे. लिस्टिंग नुसार वीवो च्या या आगामी स्मार्टफोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी देण्यात येईल. गीकबेंच नुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 7.1.2 नुगट आधारित असेल तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालेल.
वीवो 1850 ला गीकबेंच च्या या लिस्टिंग मध्ये सिंगल-कोर मध्ये 760 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोन ला 3873 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच ने फोन च्या डिस्प्ले, बॅटरी व अन्य स्पेसिफिकेशन्स ची माहिती दिली नाही पण लिस्टिंग वरून इतके स्पष्ट झाले आहे की कंपनी लवकरच अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपला हा नवीन फोन सादर करेल. मीडिया रिपोर्ट नुसार हा फोन वीवो वी9 चा नवीन वर्जन असू शकतो.
वीवो वी9 पाहता गेल्या महिन्यात कंपनी ने इंडोनेशियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन 6जीबी रॅम सह लॉन्च केला आहे. वी9 चा बेस वेरिएंट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 626 चिपसेट सह सादर झाले आहे तर फोन चा 6जीबी रॅम वेरिएंट क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. सोबतच नवीन वेरिएंट मध्ये फनटच ओएस 4.0 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो देण्यात आला आहे.
आशा प्रकारे वीवो वी9 चा जुना मॉडेल 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा आणि 24-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेरा ला सपोर्ट करतो. तर नवीन 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा आणि 12-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. वीवो वी9 चे स्पेसिफिकेशन्स पाहता मोठया स्क्रीन आणि स्टाइलिश डिजाइन सह सादर करण्यात आलेल्या या वीवो वी9 मध्ये पण 2280×1080 पिक्सल रेजल्यूशन वाली 6.3-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल मेमरी तसेच पावर बॅकअप साठी 3,260 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
