Home बातम्या वीवोचा अनोखा फोन अपेक्स 2019 होत आहे 24 जानेवारीला लॉन्च, हा करेल नव्या टेक्नॉलॉजीची सुरवात

वीवोचा अनोखा फोन अपेक्स 2019 होत आहे 24 जानेवारीला लॉन्च, हा करेल नव्या टेक्नॉलॉजीची सुरवात

टेक कंपनी वीवो ने या आठवड्यात सोशल प्लॅटफॉर्म वर पोस्ट करून सांगितले होते ​कि कंपनी येत्या 24 जानेवारीला एक यूनिक आणि अनोखा स्मार्टफोन टेक विश्वासमोर सादर करणार आहे. वीवो ने या लॉन्चची ईमेज टीजर शेयर केली होती पण कंपनी ने फोनचे नाव गुलदस्त्यात ठेवले होते. पण आज याच माइक्रोब्लागिंग साइट वर अजून एक पोस्ट शेयर करत वीवो ने सांगितले आहे कि 24 जानेवारीला लॉन्च होणार हा शानदार स्मार्टफोन ‘वीवो अपेक्स 2019’ असेल.

वीवो ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून आगामी स्मार्टफोनचे नाव सार्वजनिक केले आहे. वीवो येत्या 24 तारखेला अपेक्स 2019 नावाने नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. हा फोन गेल्यावर्षी सादर केलेल्या अपेक्स फोनचा नवीन वर्जन असेल जो आधीच्या मॉडेल पेक्षा जास्त एडवांस आणि स्मार्ट असेल. सर्वात आधी तुम्हाला वीवो अपेक्स बद्दल सांगायचे तर हा फोन पॉप-अप कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला होता.

अपेक्स 2019 मध्ये पण हीच टेक्नॉलॉजी असू शकते जी जुन्या मॉडेलपेक्षा पण एडवांस असेल. अपेक्स 2019 मध्ये डुअल फ्रंट कॅमेरा जो सेल्फी कमांड देताच फोनच्या बॉडीतून बाहेर येईल असे होऊ शकते. वीवो द्वारा शेयर केल्या गेलेल्या अपेक्स 2019 च्या फोटो मध्ये फोन पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला आहे. फोनच्या चारही किनारे कर्व्ड आहेत तसेच फ्रंट पॅनल वर इतर कोणताही बॉडी पार्ट दिसत नाही.

वीवो द्वारा आधी शेयर केल्या गेलेल्या ईमेज टीजर मध्ये वॉटर ड्रॉप दाखवण्यात आली होती. पण फोनच्या टीजर ईमेज मध्ये फुल व्यू डिस्प्ले पण दाखवण्यात आला आहे त्यामुळे बोलले जात आहे कि या फोन मध्ये कोणतीही नॉच नसेल तसेच हा फोन वॉटरप्रूफ असेल. वीवो नेक्स पाहता या फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला होता. या फोनचा हा सेंसर डिस्प्लेच्या खालच्या भागात होता, त्यामुळे स्क्रीन वर कुठेही टच करताच हा अनलॉक होत होता.

वीवो अपेक्स 2019 मध्ये पण कंपनी आपली हि टेक्नोलॉजी पुन्हा आणू शकते. अपेक्स 2019 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल वीवो ने अजूनतरी कोणतीही माहिती दिली नाही पण बोलले जात आहे कि कपंनी आपला हा अनोखा डिवाईस पण कॉसेप्ट फोन म्हणून सादर करेल. अपेक्स 2019 मध्ये सर्व आधुनिक फीचर्स व टेक्नॉलॉजी असेल तसेच या फोनचे फीचर्स वीवोच्या आगामी स्मार्टफोन्स मध्ये पण दिसतील.