वीवो ने काही दिवसांपूर्वी आॅफिशियल केले होते की कंपनी येत्या 19 जुलै ला भारतात आपला लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन वीवो नेक्स लॉन्च करणार आहे. कंपनी ने फोन ची लॉन्च डेट तसेच या संबधी इतर माहिती सांगितली नव्हती पण एका लीक मधून फोन च्या लॉन्च आधी याची किंमत आणि इतर माहिती मिळाली आहे.
माय स्मार्ट प्राइस ने आपल्या रिपोर्ट मध्ये वीवो नेक्स च्या किंमतीचा खुलासा केला आहे. या वेबसाइट ने सांगितले आहे की 19 जुलै ला लॉन्च होणारा वीवो नेक्स स्मार्टफोन अमेजॉन इंडिया एक्सक्लूसिव असेल आणि कंपनी याला 48,990 रुपयांमध्ये लॉन्च करेल. या लीक मधून ही माहिती पण समोर आली आहे की वीवो 19 जुलै ला आपला स्मार्टफोन अमेजॉन वर प्री-आॅर्डर साठी सादर करेल जो नंतर सेल साठी उपलब्ध होईल.
काही दिवसांपूर्वी चीन मध्ये वीवो नेक्स आणि वीवो नेक्स अल्टिमेट स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले होते. वीवो नेक्स च्या या दोन्ही मॉडेल्स ची सर्वात मोठी खासियत यांचा फ्रंट कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी साठी वीवो ने फोन च्या वरच्या पॅनल वर फ्रंट कॅमेरा सेटअप आहे जो फोन च्या बॉडी मध्ये आहे पण सेल्फी क्लिक करताना फोन च्या बॉडी बाहेर येतो. समोर आलेली किंमत पाहता दाट शक्यता आहे की भारतात वीवो नेक्स मॉडेलच लॉन्च केला जाईल.
फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19.3:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला गेला आहे ज्यात चारी बाजूला खुपच बारीक बेजल्स आहेत. या फोन मध्ये 2316 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 6.59-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. वीवो ने वीवो नेक्स 6जीबी रॅम मेमरी आणि 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो तसेच प्रोसेसिंग साठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात वर्टिकल शेप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा आहेत. तसेच फोन च्या बॉडी मधील फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे. वीवो नेक्स अल्टिमेट मध्ये अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे तर वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर फिंरगप्रिंट सेंसर आहे. वीवो च्या या फोन मध्ये स्पीकर्स फोन च्या बॉडी मध्ये आहेत आणि म्यूजिक व सांउड फोन च्या बॉडी मधूनच निघतात. या दोन्ही स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
वीवो नेक्स ची ठोस किंमत आणि स्पेसिफिकेशन्स साठी 19 जुलै ची वाट बघावी लागेल.
