काही दिवसांपूर्वीच वीवो च्या एका अशा स्मार्टफोनचा फोटो समोर आला होता ज्यात डुअल डिस्प्ले दाखवण्यात आला होता. या फोनच्या फ्रंट तसेच बॅक दोन्ही पॅनल पर स्क्रीन देण्यात आली होती. वीवोच्या या आगामी स्मार्टफोनचा फोटो वायरल झाल्यानंतर आता या डुअल डिस्प्ले वाल्या फोनचा अनबॉक्सिंग वीडियो पण समोर आला आहे जो यूट्यूब वर शेयर करण्यात आला आहे. या वीडियो मध्ये फोनचा ब्रँड यूट्यूबर ने लपवला आहे, पण बोलले जात आहे कि हा फोन वीवो च्या नेक्स सीरीजचा आगामी डिवाईस नेक्स एस2 च आहे.
वीवो नेक्स एस2 च्या या वीडियो मध्ये फोन मध्ये दोन डिस्प्ले असल्याचे समोर आले आहे. वीडियो मध्ये दाखवण्यात आलेल्या फोनच्या फ्रंट पॅनल वर वीवो नेक्स प्रमाणे कोणतेही फिजिकल बटण व नॉच नाही. वीडियो मध्ये फोन पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला ज्याच्या डिस्प्लेच्या चारही बाजूला बारीक बॉडी पार्ट आहेत. वीडियो मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनच्या फ्रंट पॅनल सह बॅक पॅनल वर पण डिस्प्ले असेल.
वीडियो मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनच्या बॅक पॅनल वर तीन रियर कॅमेरा सेंसर दिले जातील. फोनच्या बॅक पॅनल वर दोन कॅमेरा सेंसर गोलाकार रिंग मध्ये असतील तसेच एक कॅमेरा सेंसर या रिंगच्या बाहेर डावीकडे असेल कॅमेरा रिंग च्या उजवीकडील फ्लॅश लाईट पण या वीडियो मध्ये दिसली आहे. वीवो नेक्स प्रमाणे या फोन मध्ये पण पॉप-अप फ्रंट कॅमेरा असेल जो फोनच्या वरच्या पॅनल वर बॉडीच्या आत असेल. हा कॅमेरा सेल्फी ची कमांड देताच फोन बॉडीच्या बाहेर येईल.
वीवो नेक्स एस2 मध्ये सीरीजच्या पहिल्या मॉडेल प्रमाणे अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण असेल. वीवो नेक्स एस2 च्या पहिल्या लीक झालेल्या फोन मध्ये फोनच्या बॅक पॅनल वरील डिस्प्लेच्या खाली वीवोचा लोगो पण दाखवण्यात आला होता. लीक झालेल्या फोटो मध्ये फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर तसेच सोबत पावर बटण दिसला होता. वीवो ने अजूनतरी नेक्स सीरीजच्या कोणत्याही आगामी फोन बद्दल घोषणा केली नाही, त्यामुळे नेक्स एस2 ची रियर ईमेज व अन्य स्पेसिफिकेशन्सची वाट बघितली जात आहे.
