चिनी स्मार्टफोन कंपनी विवोनं अनपेक्षितरित्या Vivo S17e स्मार्टफोन चीनमध्ये सादर केला आहे. याआधी कंपनीनं आपल्या एस सीरिजचे सर्व फोन्स एकत्र लाँच केले आहेत. या नव्या मिडरेंज स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले, 64MP कॅमेरा, MediaTek Dimensity 7200 चिपसेट, 66W फास्ट चार्जिंग आणि 12GB RAM देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
विवो एस17ई ची किंमत
Vivo’s S17e स्मार्टफोन सध्या ऑर्डर करता येईल आणि हा फोन 20 मे पासून चीनमध्ये उपलब्ध होईल. फोन क्विक सँड गोल्ड, सनी ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 2099 युआन (सुमारे 24,823 रुपये) आहे तर 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज मॉडेल 2299 युआन (सुमारे 27,188 रुपये) मध्ये विकत घेता येईल. फोनचा 12जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 2499 युआन (सुमारे 29,553 रुपये) ठेवण्यात आली आहे. हे देखील वाचा: घर बसल्या उघडा बँक अकाऊंट, काही क्लिक्समध्ये सुरु करा बचत खातं
विवो एस17ई चे स्पेसिफिकेशन
- 6.78” FHD+ Display
- In-display Fingerprint Sensor
हा स्मार्टफोन गेल्यावर्षी आलेल्या विवो एस16ई ची जागा घेईल आणि मोठ्याप्रमाणात हा व्ही27 सारखा आहे. फोनमध्ये 6.78 इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट देण्यात आला आहे जो एक 60° 3डी कर्व अॅमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. ह्या डिवाइसचे डायमेन्शन 164.20×74.90×7.4एमएम आणि वजन 178ग्राम आहे.
- MediaTek Dimensity 7200 SoC
- 12GB LPDDR4X RAM with 256GB UFS2.2 storage
प्रोसेसिंगसाठी कंपनीनं मीडियाटेक डायमेन्सिटी 7200 चिपसेटचा वापर केला आहे. तसेच यात अँड्रॉइड 13 आधाराती ओरिजिन ओएस 3 देण्यात आलं आहे. फोनमध्ये 12जीबी पर्यंत LPDDR4X रॅम मिळतो तर जोडीला 256जीबी पर्यंतची UFS2.2 स्टोरेज देण्यात आली आहे.
- 64MP primary camera with OIS
- 16MP front camera
विवो एस17ई मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यातील मुख्य सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे जो ओआयएसला सपोर्ट करतो, तर जोडीला 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये वर्तुळाकार फ्लॅश देण्यात आला आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन
- 4600mAh battery, 66W fast charging
- 5G support
फोनमध्ये 4600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 66वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. तसेच स्टिरियो स्पिकर्स आणि हाय रेज ऑडिओ सपोर्ट देण्यात आला आहे कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी सी पोर्ट, 5जी एसए/एनएसए, ड्युअल 4जी व्हीओएलटीई, वायफाय 6 802.11 एसी, ब्लूटूथ 5.3, जीपीएस आणि एनएफसी असे ऑप्शन मिळतात.
