Home बातम्या डुअल डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सह येत आहे वीवो नेक्स 2, 11 डिसेंबरला होऊ शकतो लॉन्च

डुअल डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सह येत आहे वीवो नेक्स 2, 11 डिसेंबरला होऊ शकतो लॉन्च

नुकतीच बातमी आली होती की लवकरच वीवो नेक्स सीरीज मध्ये आपले दुसरा फोन लॉन्च करणार आहे ज्यात डुअल स्क्रीन असेल. अजूनपर्यंत कंपनी ने याबाबत काहीच सांगितले नव्हते पण आज वीवोच्या आॅफिशियल अकाउंट वरून या फोनची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. जरी कंपनीने फोनचे नाव सांगितले नसले तरी डुअल स्क्रीनची माहिती दिली आहे. त्याचबरोबर अजूनही काही माहिती उपलब्द आहे. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार या फोनला नेक्स 2 असे नाव देण्यात आले आहे.

वीवो ने आपल्या सोशल नेटवर्किंग साइट वीबो वर नेक्सच्या नवीन फोनचे काही पोस्टर पोस्ट केले आहेत. या पोस्टर सोबत एक छोटा वीडियो पण आहे. या वीडियो मध्ये तुम्ही वीवोच्या नवीन नेक्सचा समोरील लुक तुम्ही बघू शकता. तसेच वीडियो मध्ये एक साथ दोन फोन जोडले जाताना दाखवण्यात आले आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कंपनी डुअल स्क्रीन बद्दल बोलत आहे.

Vivo Nex 2

तसेच अजून एक पोस्टर पण आहे ज्यात कॅमेऱ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार वीवो नेक्स 2 च्या रियर पॅनल मध्ये 3 कॅमेरा असतील. त्याचबरोबर नाइट मोड सारख्या फीचर्सचा पण उल्लेख आहे. आम्हाला जी माहित मिळाली आहे त्यानुसार वीवो नेक्स्ट 2 कंपनी 11 डिसेंबरला चीन मध्ये सादर करू शकते.

अन्य स्पेसिफिकेशन पाहता वीवो नेक्स 2 मध्ये तुम्हाला मुख्य स्क्रीन 19.5:9 आसपेक्ट रेेशियो सह मिळू शकते तर मागील पॅनल मध्ये 16:9 आसपेक्ट रेशियो असेलला हँडसेट असू शकतो. जुन्या वीवो नेक्स की प्रमाणे नवीन फोन मध्ये पण स्लाइड आउट सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. आता पर्यन्त जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कंपनी हा फोन 6.69 इंचाच्या फुल एचडी+ स्क्रीन सह सादर करू शकते. तसेच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट आधारित असू शकतो आणि फोन मध्ये 8जीबी रॅम सह 128जीबी मेमरी असू शकते.