Home बातम्या 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी असलेला स्वस्त 5 जी फोन Vivo T3 Lite लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी असलेला स्वस्त 5 जी फोन Vivo T3 Lite लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

विवोने भारतीय युजर्ससाठी एक नवीन आणि स्वस्त 5G डिव्हाईस लाँच केला आहे. याला T3 सीरीज अंतर्गत Vivo T3 Lite नावने आणले गेले आहे. मोबाईलमध्ये युजर्सना 50 मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा, 6.56 इंचाचा मोठा डिस्प्ले, एक्सटेंटेड रॅम टेक्नॉलॉजीच्या मदतीने 12 जीबी पर्यंतची पावर, 5000mAh बॅटरी सारखे अनेक स्पेसिफिकेशन मिळतील.चला, पुढे किंमत आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Vivo T3 Lite ची किंमत

Vivo T3 Lite चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

6.56 इंचाचा डिस्प्ले
90Hz रिफ्रेश रेट

Vivo T3 Lite 5G मोबाईलमध्ये जबरदस्त स्क्रीन अनुभवसाठी कंपनीने 6.56 इंचाची मोठी स्क्रीन दिली आहे. यावर युजर्सना 1612 x 720 पिक्सल रिजॉल्यूशन, एलसीडी पॅनल, 90Hz रिफ्रेश रेट आणि 840 निट्स पीक ब्राईटनेस मिळते.

प्रोसेसर

डायमेंसिटी 6300 चिपसेट

दमदार परफॉर्मन्ससाठी ब्रँडने युजर्सना मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट दिली आहे. हा प्रोएसर गेमिंगसह इतर ऑपरेशन मध्ये चांगला एक्सपीरियंस देतो.

रॅम आणि स्टोरेज

4GB, 6GB रॅम
128GB स्टोरेज

डाटा स्टोर करण्यासाठी Vivo T3 Lite 5G दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच झाला आहे. ज्यात 6GB पर्यंत रॅम +128 जीबी पर्यंत स्टोरेजचा समावेश आहे यात एक्सटेंडेडला सपोर्टच्या मदतीने 12 जीबी पर्यंत रॅम वाढवता येईल.

कॅमेरा

रिअर कॅमेरा: 50MP Sony IMX852 AI सेन्सर
फ्रंट कॅमेरा: 8MP HD सेल्फी कॅमेरा

कॅमेरा फिचर्स पाहता विवोचा नवीन Vivo T3 Lite 5G ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह आहे. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी Sony IMX852 कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची इतर लेन्स लावली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी युजर्सना 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

बॅटरी

5000mAh बॅटरी
15W फास्ट चार्जिंग सपोर्ट

Vivo T3 Lite स्मार्टफोन 5000mAh ची मोठी बॅटरी असलेला आहे. ही बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 15 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

ऑपरेटिंग सिस्टम

अँड्रॉईड 14

ऑपरेटिंग सिस्टम पाहता Vivo T3 Lite मोबाइल लेटेस्ट अँड्रॉईड 14 आधारित Funtouch OS 14 वर चालतो.

इतर फिचर्स

साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर
IP64 वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस

इतर फिचर्सच्या बाबतीत Vivo T3 Lite डिव्हाईसमध्ये ड्युअल सिम 5G, 4G, वाय-फाय, पाणी आणि धूळीपासून वाचणारी आयपी 64 रेटिंग, ब्लूटूथ, वाय-फाय सारखे अनेक पर्याय आहेत.