Home बातम्या रियलमी ला टक्कर देण्यासाठी वीवो घेऊन येत हा नवीन फोन, आॅनलाईन एक्सक्लूसिव होईल सेल

रियलमी ला टक्कर देण्यासाठी वीवो घेऊन येत हा नवीन फोन, आॅनलाईन एक्सक्लूसिव होईल सेल

वीवो ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपला हेलो नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन वी11 प्रो लॉन्च केला आहे. वी11 प्रो चा अजून एक वर्जन वी11 नावाने लवकरच बाजारात येणार आहे ज्याची माहिती कंपनी आधीच दिली आहे. आज 91मोबाईल्सला वीवो संबंधीत अजून एक महत्वाची माहिती मिळाली आहे की कंपनी लवकरच इंडिया मध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे जो फक्त आॅनलाईन प्लॅटफार्म वर सेल साठी उपलब्ध होईल. वीवो आपला हा फोन ‘झेड सीरीज’ अंतर्गत लॉन्च करेल.

91मोबाईल्सला मिळालेल्या माहितीनुसार वीवो येत्या काही दिवसांत हा स्मार्टफोन देशात लॉन्च करेल. झेड सीरीज अंतर्गत हा स्मार्टफोन वीवो झेड1आई नावाने भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. वीवोचा हा फोन एक मीड बजेट स्मार्टफोन असेल जो फक्त आॅनलाईन शॉपिंग साइट वर विकला जाईल. विशेष म्हणजे वीवो झेड1आई स्मार्टफोन चीन मध्ये आधी लॉन्च झाला आहे आणि आता हा फोन इंडिया मध्ये पण येईल. या फोन मध्ये वीवो  एआई स्मार्ट असिस्टेंट जोवी आहे.

वीवो झेड1आई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. कंपनी ने फोन मध्ये 6.26-इंचाची आईपीएस स्क्रीन दिली आहे जी 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करते. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 सह सादर करण्यात आला आहे सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू आहे.

कंपनी ने झेड1आई चीन मध्ये 4जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 128जीबी इंटरनल आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅश असलेला 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

वीवो झेड1आई 4जी फोन आहे ज्यात डुअल सिम सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये ओटीजी सपोर्ट सह 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो झेड1आई चीन मध्ये रेड आणि ब्लू कलर मध्ये सादर करण्यात आला आहे. अशा आहे की वीवो भारतात पण आपला हा स्मार्टफोन त्याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च करेल.