Vivo भारतात आपल्या ‘यू सीरीज’ चा विस्तार करणार आहे. कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे कि येत्या 22 नोव्हेंबरला Vivo चा हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात येईल आणि हा फोन Vivo U20 नावाने लॉन्च केला जाईल. Vivo U20 कंपनीने गेल्या महिन्यात लॉन्च केलेल्या Vivo U10 चा अपग्रेडेड वर्जन असेल. Vivo U20 शॉपिंग साइट अमेझॉन वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोनच्या लुक आणि डिजाईन सोबत याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा करण्यात आला आहे.
असा असेल लुक
Vivo U20 च्या अमेझॉन लिस्टिंग वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. Vivo U20 अमेझॉनच्या प्रोडक्ट पेज वर वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्यात स्क्रीनच्या वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Vivo U20 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
फोनचा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली ‘AI Triple Camera’ लिहिण्यात आले आहे. फोनच्या रियर पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर आहे तर खालच्या बाजूला Vivo ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. Vivo U20 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.
5,000एमएएच बॅटरी
अमेझॉन वर लाईव झालेल्या प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहे कि Vivo U20 स्मार्टफोन 5,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाईल. सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीच्या दाव्यानुसार Vivo U20 फुल चार्ज केल्यानंतर 273 तासांचा स्टॅण्डबाय टाईम, 21 तासांचा इंस्टाग्राम ऍक्सेस, 17 तासांचा फेसबुक आणि 11 तासांचा यूट्यूब ऍक्सेस देऊ शकतो.
Vivo U20 स्पेसिफिकेशन्स
फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता अमेझॉन लिस्टिंग मध्ये समजले आहे कि Vivo U20 भारतात 6 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला जाईल. हा फोन UFS 2.1 स्टोरेज क्षमतेसह येईल. तसेच प्रोसेसिंग साठी Vivo U20 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट मिळेल. आशा आहे कि Vivo U20 इंडियन मार्केट मध्ये एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.
Vivo U10
या सीरीज मधील स्मार्टफोन Vivo U10 बद्दल बोलायचे तर हा फोन भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जो 8,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. सोबत Vivo U10 च्या दुसऱ्या वेरिएंटची किंमत 9,990 रुपये आहे जो 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरीला सपोर्ट करतो. Vivo U10 च्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जो 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.
Vivo U10 मध्ये 6.35-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो वॉटर ड्रॉप नॉच स्टाइल सह येतो. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर आहे. तसेच फोनची स्टोरेज को 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी फोन मध्ये मागे 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर सुपर वाइड ऍंगल लेंस आहे. फोन मध्ये तीसरा 2-मेगापिक्सलचा tertiary सेंसर आहे. तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा फोन पण 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
