काही आठवड्यांपूर्वी बातमी आली होती की मोबाईल फोन निर्माता कंपनी वीवो 6 सप्टेंबरला वी11 प्रो लॉन्च करणारा आहे. त्यानुसार आज कंपनी ने हा फोन जगासमोर ठेवला आहे. फोन मध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. जरी काही दिवसांपासून याच्या जाहिराती टीवी वर येत असल्या तरी याच्या स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती मिळत नव्हती. पण आज कंपनी ने प्राइस सहित सर्व स्पेसिफिकेशन बद्दल सविस्तर सांगितले आहे. वीवो वी11 प्रो 25,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि हा फोन 12 सप्टेंबर पासून सेल साठी स्टोर वर उपलब्ध होईल.
वीवो वी11 प्रो चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन खुप खास आहे. फोन ची बॉडी पॉलीकार्बोनेट ने बनलेली आहे पण ऐक्रेलिक फिनश बॉडी एक वेगळाच अनुभव देते. जरी कंपनी ने वी9 पासून नॉच डिस्प्ले ची सुरवात केली असली तरी वीवो वी11 प्रो मध्ये तुम्हाला वेगळ्या स्टाइलची नॉच मिळेल. या फोन मध्ये 6.41-इंचाची फुल एचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे जिचे स्क्रीन रेजल्यूशन 2340×1080 पिक्सल आहे. कंपनी ने यात 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या वी शेप नॉच चा वापर केला आहे ज्याला हॅले फुल व्यू डिस्प्ले असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे ज्यामुळे ती फक्त मजबूत होत नाही तर स्क्रॅच पासून पण वाचते.
अन्य स्पेसिफिकेशन पाहता वीवो वी11 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह सादर करण्यात आला आहे आणि फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या सोबत 6जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी चा माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता. फोन मध्ये डेडिकेटेड मेमरी कार्ड स्लॉट आहे हाइब्रीड नाही.
कॅमेरा पाहता वीवो वी11 प्रो मध्ये 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा कॅमेरा ब्लर बॅकग्राउंड सह फोटोग्राफी करू शकतो. विशेष म्हणजे कंपनी ने हा एआई अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस सह सादर केला आहे जो कलर टोन आणि प्रकाशच्या दृष्टीने स्वतःहून फोटो इनहांस करतो. सेल्फी साठी कंपनी ने यात 25-मेगापिक्सलचा एआई कॅमेरा आहे.
वीवोचा हा फोन फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 वर आधारित आहे. तसेच ड्यूअल सिम आधारित हा फोन 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो आणि फोन मध्ये वाईफाई, ब्लूटूथ आणि जीपीएस मिळेल.
सिक्योरिटी च्या बाबतीत हा खुप अपडेटेड आहे. या फोन मध्ये आॅन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे, जो वीवो व्यतिरिक्त सध्यातरी दुसर्या कुठल्याही कंपनी कडे नाही. तसेच यात इन्फ्रारेड फेस अनलॉक पण आहे, जो अंधारात पण स्क्रीन अनलॉक करू शकतो. वीवो वी11 प्रो मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी डुअल इंजन फास्ट चार्जिंग सह येते.
कंपनी वीवो वी11 प्रो सोबत अजून एक मॉडेल वी11 पण आणणार आहे जो येत्या 25 सप्टेंबरला देशात लॉन्च केला जाईल. या फोनची किंमत कमी असेल तसेच हा वी11 प्रो चा छोटा वेरिएंट असेल. जरी कंपनी ने या फोनचे स्पेसिफिकेशनस सांगितले नसले तरी बोलले जात आहे की या फोन मध्ये 4जीबी रॅम असू शकते.
वीवो वी11 प्रो च्या खरेदीवर एचडीएफसी ग्राहकांना 2,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे तसेच जियो यूजर्सना 4050 रुपयांचे बेनिफिट मिळतील. वी11 संबंधी माहिती तुम्हाला लवकरच देण्यात येईल.
