Vivo V17 Pro हिट झाल्यानंतर आज वीवोने भारतात आपल्या ‘वी सीरीज’ चा अजून एक नवीन डिवाईस लॉन्च केला आहे. कंपनीने Vivo V17 स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे ज्याने मीड बजेट मध्ये एंट्री घेतली आहे. पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह हा फोन शानदार डिजाईन वर बनला आहे. Vivo फॅन्ससाठी हा नवीन प्रोडक्ट येत्या 17 डिसेंबर पासून भारतात विक्री साठी उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया कसा आहे Vivo V17 चा लुक आणि किती दमदार आहेत याचे स्पेसिफिकेशन्स.
लुक व डिजाईन
Vivo V17 पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. हा होल डिस्प्लेच्या वरच्या बाजूला डावीकडे उजवीकडे आहे तसेच या होल मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Vivo V17 स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात येईल. हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेरा वर लॉन्च केला गेला आहे. Vivo V17 चा हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला आहे.
Vivo V17 चा रियर कॅमेरा सेटअप L-शेप आहे ज्यात तीन कॅमेरा सेंसर एकाच लाईन मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहेत तर चौथा कॅमेरा सेंसर उजव्याबाजूला आहे. या चौथ्या सेंसरच्या वर फ्लॅश लाईट आहे. Vivo V17 कॅमेरा सेटअपच्या खाली सेंसर डिटेल पण आहेत. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. फोनच्या लोवर पॅनल वर 3.5एमएम जॅक, यूएसबी टाईप सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे.
कॅमेरा डिटेल
Vivo V17 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Vivo V17 मध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन्स
Vivo V17 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो सह लॉन्च झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ ई3 सुपर एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या फोनच्या पंच-होलला जगातील सर्वात छोटी साईज म्हटले आहे. कंपनीने वी17 च्या स्क्रीन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो.
Vivo V17 एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9.2 सह लॉन्च झाला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 एआईई चिपसेट वर चालतो. Vivo V17 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या डिवाईस मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Vivo V17 मीडनाईट ओशियन आणि ग्लेशियर आइस कलर मध्ये 22,990 रुपयांमध्ये लॉन्च झालं आहे तसेच येत्या 17 डिसेंबर पासून विकत घेता येईल. हा स्मार्टफोन ऑफलाईन रिटेल स्टोर्स सोबत ऑनलाईन शॉपिंग साइट वर सेल साठी उपलब्ध होईल.
