Home बातम्या लॉन्च झाला भारतातील पहिला डुअल पॉप-अप कॅमेरा असेलला फोन Vivo V17 Pro, 8 जीबी रॅम सह आहे 4100एमएएच बॅटरी

लॉन्च झाला भारतातील पहिला डुअल पॉप-अप कॅमेरा असेलला फोन Vivo V17 Pro, 8 जीबी रॅम सह आहे 4100एमएएच बॅटरी

Vivo ने आज इंडियन टेक बाजारातील पहिला डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. वीवो ‘वी सीरीज’ मध्ये आलेला हा स्मार्टफोन देशात लॉन्च झालेला पहिला असा स्मार्टफोन आहे ज्याच्या पॉप-अप सेटअप वर दोन कॅमेरा सेंसर आहेत. Vivo V17 Pro कंपनीने एकाच वेरिएंट मध्ये आणला आहे जो 27 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनची प्री-बुकिंग कालच सुरु झाली आहे आणि चांगली बाब अशी कि Vivo V17 Pro देशात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर विकत घेता येईल.

किंमत व ऑफर्स

Vivo V17 Pro 8 जीबी रॅम सह 128 जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि हा 29,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. Vivo V17 Pro प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांनी फोनचे पेमेंट HDFC, ICICI, आणि HDB बँकेच्या कार्डने केले तर त्यांना 10 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच Bajaj Finserv ने ईएमआई वर फोन प्री-बुक केल्यास स्क्रॅच कूपन मिळेल. या कूपनच्या मदतीने Vivo V17 Pro/ Y90 किंवा 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. त्याचबरोबर कंपनी आपल्या ग्राहकांना एक फ्री गिफ्ट पण दिवाळीची भेट म्हणून देईल.

डिजाईन

Vivo V17 Pro च्या लुक बद्दल बोलायचे तर हा फोन फुलव्यू बेजल लेस डिजाईन वर बनलेला आहे. डिस्प्ले वर कोणतीही नॉच किंवा दुसरा सेंसर नाही. डिस्प्लेच्या चारही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत. सेल्फी साठी फोन मध्ये पॉप-अप मॅकॅनिज्म देण्यात आले आहे ज्यावर दोन सेंसर्स आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत सिंगल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि शार्कफिन पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेले फोन बाजारात आले आहेत. डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च होणारा Vivo V17 Pro पहिला स्मार्टफोन आहे. तसेच Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. हा कॅमेरा सेटअप फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट असेल. दोन सेंसर फ्लॅशच्या वर असतील तर दोन कॅमेरा सेंसर फ्लॅश लाईटच्या खाली आहेत.

कॅमेरा सेग्मेंट

Vivo V17 Pro ची सर्वात मोठी यूएसपी फोनचा कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर आहेत तर बॅक पॅनल वर 4 सेंसर वाला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा पाहता इथे दोन्ही सेंसर पॉप-अप मेकॅनिज्म वर असतील. प्राइमरी सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.0 अपर्चर वाला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फोनचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.5 अपर्चर वाला 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/2.2 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा तिसरा सेंसर आणि एफ/2.5 अपर्चर वाला 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

Vivo V17 Pro चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2440 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. Vivo V17 Pro च्या स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Vivo V17 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल.

हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी Vivo V17 Pro मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलेली 4100एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप सी पोर्ट द्वारे चार्ज करता येईल. Vivo V17 Pro ग्लेशियर आइस आणि मीडनाईट ओशियन कलर मध्ये 27 सप्टेंबर पासून विकत घेता येईल.